Author: दीपक मोहिते

वसंत भोईर,वाडा, विजयगड येथील श्रीजी स्टोन ( ईगल इन्फ्रा) क्रशर केले सील, तालुक्यातील डोंगस्ते ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विजयगड गावात असलेल्या श्रीजी स्टोन( ईगल इन्फ्रा ) क्रशर संदर्भात केलेल्या तक्रारीची दखल घेत आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पालघर खनिकर्म अधिकाऱ्यांच्या पथकाने सील केली.त्यांच्याकडे परवानगी नसल्याने या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला. वाडा तालुक्यात अनधिकृत दगडखदानींचे पीक आले आहे.राजरोसपणे बोर ब्लास्ट करून दगडाचे उत्खनन केले जाते.ग्रामस्थ कारवाईची मागणी करतात परंतु, प्रशासनाकडून सर्रास दगड खदान मालकांची पाठराखण केली जात आहॆ.मात्र आज अचानक तक्रारीचे कारण पुढे करून खनीकर्म अधिकाऱ्यांनी क्रशर मशीन सील करण्याची कारवाई केल्याने वाड्यातील दगडखदान मालकांचे धाबे दणाणले आहे.

Read More

दीपक मोहिते एचएमपीव्ही व्हायरसबाबत लोकांनी घाबरू जाऊ नये- आरोग्य विभाग,जिल्हा परिषद पालघर, चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेल्या ह्युमन मेटान्यूमोव्हायरस ‘एचएमपीव्ही’ व्हायरसचा रुग्ण भारतात आढळला असल्याने राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट झाले असून पालघर जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरुन न जाता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ह्यूमन मेटानिमा वायरस,हा पूर्वीपासून आपल्याकडे सर्क्युलेशनमध्ये आहे.सद्यस्थितीत चीनमध्ये या विषाणूमुळे साथ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. हा विषाणू साधारणतः हिवाळ्याच्या सुरुवातीला सर्कुलेशनमध्ये आढळतो व त्यामुळे सर्दी,ताप व खोकला यासारखे फ्लू सदृश लक्षणे आढळतात. एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्यास तीव्र श्वसन दाह किंवा रुग्णालयात भरती करण्याची गरज शक्यतो भासत नाही. एचएमपीव्ही विषाणूच्या पार्श्वभुमीवर कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण…

Read More

जव्हार,प्रतिनिधी, जव्हार अर्बन बँकेस ” बँको ब्लू रिबन २०२४,” पुरस्कार जाहीर, दि.जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेस त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय स्तरावर ” बँको ब्लू रिबन २०२४,” पुरस्कार जाहीर झाला आहे.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद बा.मुकणे यांनी ही माहिती दिली.हा पुरस्कार २७ ते २९ जाने.२०२५ दरम्यान ॲम्बी व्हॅली,लोणावळा येथे होणाऱ्या राष्ट्रीय सहकारी परिषदेत प्रदान केला जाणार आहे.ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी आणि व्यावसायिकांसाठी आर्थिक आधार बनलेल्या या बँकेने स्थापनेपासूनच उत्कृष्ट कामगिरी केली आहे.बँकेची स्थापना श्रीमंत यशवंतराव मुकणे,महाराजा जव्हार संस्थान यांनी केली असून, बँकेने ७५ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. बँकेचे चेअरमन निलेश ज. पाटील यांनी सांगितले की, बँकेचे मार्गदर्शक व जिजाऊ शैक्षणिक…

Read More

दीपक मोहिते, राजकीय विश्लेषण, भाजप जगात सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला राजकीय पक्ष, भाजप हा आता जगात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.या पक्षाची सदस्य संख्या प्रचंड असून गेल्या बारा वर्षात या पक्षाचा विस्तार हा मनुष्यबळ,आर्थिक बळ व आक्रमक धोरण,इ. कारणामुळे होत गेला.आज या पक्षाकडे असलेली ताकद इतर कोणत्याही पक्षाकडे नाही. भारतीय समाज हा रूढी,परंपरा व जाती-धर्माबाबत अत्यंत संवेदनशील आहे,हे ओळखून भाजपचे तत्कालीन वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी १९८० च्या दशकात स्विकारलेल्या गांधीवादाला मूठमाती देत,यांनी हिंदुत्वाला फुंकर घातली.तत्कालीन विश्वनाथप्रतापसिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्विकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने ” मंडल विरुद्ध कमंडलू,” असे युद्ध छेडले.” राममंदिर हम वही बनाएंगे,” ही गगनभेदी गर्जना भारताच्या आसमंतात…

Read More

जव्हार,प्रतिनिधी, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत हिरडपाडा आश्रमशाळेची गगनभरारी, नुकत्याच नागपूर येथे आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत जव्हार प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हिरडपाडा आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत जव्हार प्रकल्पाला यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे. खो-खो,या खेळात दीपिका बुध्या जाबर,नेहा दिलीप खरपडे,विश्वनी विनायक थोरात,आणि कु.गीता विष्णू औलंबा,यांनी उत्कृष्ट खेळ कौशल्य दाखवत संघाला विजयी बनवले.विद्यार्थ्यांच्या यशामध्ये संस्थेचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.हिरडपाडा शाळेकडून सुसज्ज खेळाचे मैदान,तसेच क्रीडा शिक्षक दराडे,कोकणी आणि मोहडकर यांच्यासह इतर शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. माध्यमिक मुख्याध्यापक जी. एस.उदावंत आणि प्राथमिक मुख्याध्यापक आर.व्ही.मेदगे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या यशानंतर शाळेने भव्य विजय मिरवणूक काढली.संस्थेच्या सचिव ज्योती पटेकर यांनी औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.…

Read More

जव्हार प्रतिनिधी, ग्रामपंचायत दाभलोन व ढाढरी येथे बालकांची मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न, प्रोजेक्ट प्रकाश चॅरिटेबल ट्रस्ट,दिल्ली व एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत दाभलोन व ढाढरी येथे मोफत बालनेत्र तपासणी शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबीरात १०० हून अधिक मुलांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ऑप्टोमेट्रिस्ट असद फुजेल व व्हिजन टेक्निशियन राम सानप यांनी मुलांच्या डोळ्यांचे विकार,मोतीबिंदू,तिरळेपणा यासारख्या समस्यांची तपासणी करून मोफत समुपदेशन केले.याशिवाय नेत्र विकारांबाबत जागरूकता निर्माण करण्यावरही भर देण्यात आला.प्रोजेक्ट प्रकाशचे कार्यक्रम प्रमुख शशिकांत भिसे यांनी भविष्यात आदिवासी भागातील मुलांसाठी मोफत बालनेत्र तपासणी शिबीरे नियमितपणे आयोजित करण्याची घोषणा केली. त्यांनी तपासणी दरम्यान मोतीबिंदूसारखे विकार आढळल्यास…

Read More

संजय लांडगे,वाडा बोअर ब्लास्टींग विरोधात डोंगस्ते ग्रामस्थ आक्रमक; आंदोलनाचा इशारा वाडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत डोंगस्ते हद्दीमध्ये सी.स्क्वेअर कं.लि. ( कॅप्टन इन्फ्रा लि. ) व गुरुकृपा इंटरप्रायझेस या नावे दगडखाण, क्रशर व्यवसाय सुरु असून सदर व्यवसायिकांकडून सातत्याने दिवसरात्र बोअर ब्लास्टींग करण्यात येत आहे.त्यामुळे गावातील शेकडो घरांच्या भिंतींना तडे जाऊन नुकसान झाले आहे. तसेच जिवीतहानी सुध्दा होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. येथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी तहसिल कार्यालय वाडा व इतर कार्यालयात तक्रारी अर्ज केले होते.परंतु गावकऱ्यांची कोणतीही तक्रार शासकीय अधिकाऱ्यांनी ऐकून घेतली नाही व पंचनामेही केले नाहीत.त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहॆ. शासनाकडून कारवाई होत नसल्या कारणाने सर्व ग्रामस्थांनी…

Read More

जव्हार प्रतिनीधी, जव्हार येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त पत्रकारांचा सत्कार, मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जव्हार तालुका पत्रकार संघ, राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय व कोकण मराठी साहित्य परिषद,यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत सार्वजनिक वाचनालयातील सरस्वती दालनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.या कार्यक्रमाचे उद्घाटन जव्हार पोलीस निरीक्षक किशोर मानभाव,हर्षद मेघपुरीया,वाचनालयाचे अध्यक्ष कमलजीत धानमेहेर व उपस्थित पत्रकार बांधवांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप साळवे, सल्लागार हुसेन मेमन,ज्येष्ठ पत्रकार श्याम राऊत, उपाध्यक्ष इमरान कोतवाल, सचिव मनोज कामडी,तसेच सदस्य दीपक भिसे,दीपक काकरा,सोमनाथ टोकरे, सुनील जाबर यांचा विशेष…

Read More

वसंत भोईर,वाडा, प्रिंट मिडीयाचे महत्व भविष्यातही कायम असेल – प्रा. डॉ.किशोरी भगत आज डिजिटल व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे युग असले तरी प्रिंट मिडीया व वृत्तपत्राचे महत्व भविष्यातही कायम राहील,असे प्रतिपादन डॉ.शांतीलाल देवशी कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.किशोरी भगत यांनी केले.डॉ.देवशी महाविद्यालय आणि वाडा तालुका पत्रकार संघातर्फे आज पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अशोक पाटील होते. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कौशल्य शिकता येणार आहे.मुख्य पदवीसोबतच पत्रकारितेचेही शिक्षण घेता आले तर पत्रकारिता क्षेत्राचा करियर म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळू शकेल. पत्रकारितेत असलेल्या उपस्थित पत्रकारांच्या अनुभवाचा विद्यार्थ्यांना फायदा होण्यासाठी महाविद्यालयाने…

Read More

वसंत भोईर,वाडा, डाहे,मांगरुळ येथे महिला मेळाव्याचे आयोजन, डाहे व मांगरूळ ग्रामपंचायत मध्ये दोन वेगवेगळे महिला मेळावे आयोजित करण्यात आले होते.या मेळाव्यात लोकप्रतिनिधी व महिला कायदे विषयक जाणीव जागृती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग,वाडा तसेच जिल्हा महिला व बालकल्याण जिल्हा परिषद विभाग पालघर यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.या महिला मेळाव्यासाठी ग्रामपंचायत डाहे सरपंच,ग्रामपंचायत मांगरुळ व सदस्य उपस्थितीत होते. या महिला मेळाव्यात जिल्हा परिषद शाळेतील मुलींना विविध सांस्कृतिक गाणी व अंगभूत कला व गुणांचे कार्यक्रम सादर केले. अँड.रविंद्र पाटील यांनी महिला कायदेविषयक मार्गदर्शन केले.

Read More