जव्हार,प्रतिनिधी,
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत हिरडपाडा आश्रमशाळेची गगनभरारी,
नुकत्याच नागपूर येथे आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत जव्हार प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हिरडपाडा आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत जव्हार प्रकल्पाला यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे. खो-खो,या खेळात दीपिका बुध्या जाबर,नेहा दिलीप खरपडे,विश्वनी विनायक थोरात,आणि कु.गीता विष्णू औलंबा,यांनी उत्कृष्ट खेळ कौशल्य दाखवत संघाला विजयी बनवले.विद्यार्थ्यांच्या यशामध्ये संस्थेचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.हिरडपाडा शाळेकडून सुसज्ज खेळाचे मैदान,तसेच क्रीडा शिक्षक दराडे,कोकणी आणि मोहडकर यांच्यासह इतर शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. माध्यमिक मुख्याध्यापक जी. एस.उदावंत आणि प्राथमिक मुख्याध्यापक आर.व्ही.मेदगे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या यशानंतर शाळेने भव्य विजय मिरवणूक काढली.संस्थेच्या सचिव ज्योती पटेकर यांनी औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. संस्था सदस्य नकूल पटेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष दिलीप नारायण पटेकर यांनी शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने 26 जाने.२०२५ रोजी भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्याची घोषणा केली.
ग्रामस्थांचा आणि हितचिंतकांचा अभिमान:
या अभूतपूर्व कामगिरीबद्दल ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, आणि हितचिंतकांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे. शाळेच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि स्पर्धात्मक युगात नेहमी अग्रेसर राहण्याचा संदेश दिला गेला आहे.
शाळेच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव!

