वसंत भोईर,वाडा,
विजयगड येथील श्रीजी स्टोन ( ईगल इन्फ्रा) क्रशर केले सील,
तालुक्यातील डोंगस्ते ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विजयगड गावात असलेल्या श्रीजी स्टोन( ईगल इन्फ्रा ) क्रशर संदर्भात केलेल्या तक्रारीची दखल घेत आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पालघर खनिकर्म अधिकाऱ्यांच्या पथकाने सील केली.त्यांच्याकडे परवानगी नसल्याने या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला.
वाडा तालुक्यात अनधिकृत दगडखदानींचे पीक आले आहे.राजरोसपणे बोर ब्लास्ट करून दगडाचे उत्खनन केले जाते.ग्रामस्थ कारवाईची मागणी करतात परंतु, प्रशासनाकडून सर्रास दगड खदान मालकांची पाठराखण केली जात आहॆ.मात्र आज अचानक तक्रारीचे कारण पुढे करून खनीकर्म अधिकाऱ्यांनी क्रशर मशीन सील करण्याची कारवाई केल्याने वाड्यातील दगडखदान मालकांचे धाबे दणाणले आहे.

