जव्हार प्रतिनीधी,
जव्हार येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त पत्रकारांचा सत्कार,
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जव्हार तालुका पत्रकार संघ, राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय व कोकण मराठी साहित्य परिषद,यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत सार्वजनिक वाचनालयातील सरस्वती दालनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.या कार्यक्रमाचे उद्घाटन जव्हार पोलीस निरीक्षक किशोर मानभाव,हर्षद मेघपुरीया,वाचनालयाचे अध्यक्ष कमलजीत धानमेहेर व उपस्थित पत्रकार बांधवांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप साळवे, सल्लागार हुसेन मेमन,ज्येष्ठ पत्रकार श्याम राऊत, उपाध्यक्ष इमरान कोतवाल, सचिव मनोज कामडी,तसेच सदस्य दीपक भिसे,दीपक काकरा,सोमनाथ टोकरे, सुनील जाबर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रत्येक पत्रकाराला पुष्पगुच्छ व डायरी देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी,पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या व पत्रकारितेच्या योगदानाबद्दल प्रशंसा व्यक्त केली.त्यांनी पत्रकार बांधवांना समाजातील समस्या मांडण्यासाठी लेखणीला धारदार ठेवण्याचे आवाहन केले.
राजे यशवंत सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष हर्षद मेघपुरीया यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, पत्रकार बांधवांनी आतापर्यंत केलेल्या कार्याची प्रशंसा केली.वाचनालयाचे अध्यक्ष कमलजीत धानमेहेर यांनी पत्रकारितेच्या महत्त्वावर भाष्य करत वाचनसंस्कृती आणि पत्रकारिता,यांचा परस्पर संबंध अधोरेखित केला.कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे शाखाध्यक्ष रवी बुधर,सचिव किशोर डोके व इतर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित पत्रकार बांधवांचा सत्कार केला.
कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकारांनी आपापले अनुभव शेअर करत पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले.

