जव्हार प्रतिनिधी,
ग्रामपंचायत दाभलोन व ढाढरी येथे बालकांची मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न,
प्रोजेक्ट प्रकाश चॅरिटेबल ट्रस्ट,दिल्ली व एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत दाभलोन व ढाढरी येथे मोफत बालनेत्र तपासणी शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शिबीरात १०० हून अधिक मुलांची नेत्र तपासणी करण्यात आली.
तपासणी दरम्यान ऑप्टोमेट्रिस्ट असद फुजेल व व्हिजन टेक्निशियन राम सानप यांनी मुलांच्या डोळ्यांचे विकार,मोतीबिंदू,तिरळेपणा यासारख्या समस्यांची तपासणी करून मोफत समुपदेशन केले.याशिवाय नेत्र विकारांबाबत जागरूकता निर्माण करण्यावरही भर देण्यात आला.प्रोजेक्ट प्रकाशचे कार्यक्रम प्रमुख शशिकांत भिसे यांनी भविष्यात आदिवासी भागातील मुलांसाठी मोफत बालनेत्र तपासणी शिबीरे नियमितपणे आयोजित करण्याची घोषणा केली. त्यांनी तपासणी दरम्यान मोतीबिंदूसारखे विकार आढळल्यास मोफत ऑपरेशन व गरजू मुलांना मोफत चष्म्यांचे वाटप केले जाईल, असे सांगण्यात आले.
हे शिबीर यशस्वी आयोजनासाठी आदिवासी अस्मिता प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सरपंच दाभलोन सुदाम उंबरसाडा व ढाढरीचे सरपंच बबन अकणे यांचे विशेष सहकार्य लाभले.त्यांनी अशा प्रकारच्या उपक्रमांची गरज असल्याचे सांगून भविष्यातही असे शिबीरे आयोजित करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
आदिवासी अस्मिता प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षांनी शिबीराचे आयोजन करताना संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे अधोरेखित केले व अशा उपक्रमांद्वारे आदिवासी समाजाच्या आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले.

