- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यातील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले का हो ? काल आपल्या वाढदिवसादिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडेसे आनंदी पाहायला मिळाले.त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कॉल केल्याचा कदाचित हा परिणाम असावा.कारण गेल्या काही दिवसांपासून शिंदे हे दिल्लीपासून दुरावले आहेत.पंतप्रधान मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व सध्या काय चालले आहे ? आणि कुठे आहात ? अशी विचारणा केली.ज्यावेळी आपल्यापासून दुरावलेली एखादी व्यक्ती आपली आस्थेने चौकशी करतो,तेंव्हा त्या दुरावलेल्या व्यक्तीला खूप नाही पण किंचित बरं वाटू लागते.त्यामुळे खूप दिवसांनी का होईना,शिंदे हे माध्यमांसमोर बोलते झाले,आणि त्यांनी माध्यमांना खडेबोल सुनावले. ते काय म्हणाले पहा जरा,ते…
सुनिता जोंधळे,नागपूर डॉ.क्षिप्रा उके व डॉ.शिवशंकर दास,दाम्पत्यांचा ६ वर्षाचा यशस्वी लढा : १२७ कोटींचा दावा मान्य, मालमत्तेच्या व्याख्येत बौद्धिक बौद्धिक संपत्तीच्या समावेशाचा युक्तिवाद मान्य. ॲट्रॉसिटी ॲक्ट मधील ” प्रॉपर्टी,” ची व्याख्या व्यापक करण्यास न्यायालयास भाग पाडले. डॉ.क्षिप्रा उके व डॉ.शिवशंकर दास,हे पती – पत्नी दोघेही जेएनयुचे पीएचडीधारक.सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर ” सोशल पॉलिटिकल अवेरनेस अमंग लोकल युथ,” या विषयावर त्यांनी स्वखर्चाने नागपुरात संशोधन करण्याचे ठरवले. नागपूरात दीक्षाभूमीपासून अर्धा एक कि.मी.अंतरावर असलेल्या उच्च जातीयांचे वर्चस्व असलेल्या लक्ष्मीनगर मधील इमारतीत/वसाहतीत त्यांना घर भाड्याने मिळाले. काही दिवसांनंतर हे दोघे राजकीय घडामोडीमध्ये सहभागी होत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. रोहित वेमुलाच्या…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” संपर्कमंत्रीपद : भाजप,आयुधासारखा वापर करणार….. ज्या जिल्ह्यात आपला पालकमंत्री नाही,त्या जिल्ह्यात संपर्कमंत्री नेमण्याचा जो निर्णय भाजपने घेतला आहे तो शिंदे व अजित पवार गटांसाठी धोकादायक ठरणारा आहे.भाजप या पदाचा हा वापर हा आयुधासारखा करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. नव्याने नियुक्त झालेले संपर्कमंत्री या दोन्ही गटाच्या पालकमंत्र्यांच्या कारभारावर देखरेख तर ठेवणारच,परंतु आपल्या पक्षासाठी हानिकारक ठरू शकतील,असे निर्णय ते घेऊ देणार नाहीत.एकंदरीत हे संपर्कमंत्री ” वॉच डॉग,” ची भूमिका पार पाडणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाची एक वेगळी छाप आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,या मातृसंघटनेच्या छत्रछायाखाली वाढलेल्या भाजपला संघाने आखून दिलेल्या चौकटीत काम करावे लागते.गेल्या दहा बारा वर्षात हे आपण…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शेतकरी,बेरोजगार व सर्वसामान्य माणूस मेला तरी बेहत्तर…! तीन वर्षांपूर्वी राज्यात सत्तापालट झाल्यापासून सर्वच पक्षात ” फोडाफोडीच्या राजकारणा,” ला आता राजाश्रय मिळू लागला आहे.दर दिवशी अमुक माजी आमदार,तमुक पदाधिकारी या पक्षात गेला,त्या पक्षात गेला,अमुक पदाधिकारी नाराज असून लवकरच तो या पक्षात दाखल होणार,अशा आशयाच्या बातम्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत. एकमेकांचे आमदार,खासदार व पदाधिकारी गळाला लावणे,हे आता राष्ट्रीय कार्य आहे,असा समज जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी करून घेतला आहे. वास्तविक राज्यात लोकहीत, विकास व जनतेच्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्न आ वासून उभे असताना या राजकीय पक्षांनी फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे.राज्यात कृषी,आरोग्य,रोजगार, शिक्षण व पायाभूत…
अमन शेख,मनोर अंगणवाडी सेविकांचे प्रधानमंत्री मातृवंदना योजना प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना या विषयावर विशेष प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. मनोर येथे संपन्न झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात सुमारे ३०० अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन ) चंद्रशेखर जगताप प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास विभाग,प्रवीण भावसार यांनी केले. प्रशिक्षणादरम्यान,मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे महत्त्व स्पष्ट केले.सदर योजना पूर्वी आरोग्य विभागातर्फे राबवण्यात येत होती,मात्र आता ती महिला…
मनिषा जोशी,पुणे कॅन्टोनमेंट, पोलिसाच्या डोक्यात दगड घालणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड, पुणे जिल्ह्यातील भेकराईनगर येथे बाईकस्वाराने रागाच्या भरात वाहतूक पोलिसाच्या डोक्यात दगड घालून पळ काढला होता.त्या आरोपीची पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत.सासवड रस्त्यावर ही घटना घडली होती.या घटनेत पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक ( वय ४७ ) हे गंभीर जखमी झाले होते.या घटनेनंतर आरोपी पळून गेला होता. पोलिसांनी त्याला धाराशिव येथून जेरबंद केले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी येथील कार्यक्रमात पुण्यामध्ये क्राईम रेट सतत वाढतो आहे. पोलिसांनी अशा आरोपीची धिंड काढून गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले होते.वाहतूक पोलिसांला मारहाण करुन जखमी करणार्या बबलु मासाळ ( वय २५,मुळ…
सुशीला फातरपेकर, नालासोपारा, नालासोपारा ” फनस्ट्रीट,” उपक्रमाला बालगोपाळाचा उत्स्फूर्त प्रतिसाद, वसई-विरार महानगरपालिका क्रीडा विभाग,जागरूक नागरिक संस्था ( वसई ) आणि नारी प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ फन स्ट्रीट,” हा अनोखा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लहानपण परत येत नाही,मात्र त्याच्या आठवणी पुन्हा जगता येतात,याचा अनुभव आज नालासोपारा शहरातील नागरिकांनी घेतला.महानगरपालिका व अन्य संस्थाच्या सहकार्याने आज शहरात ” फनस्ट्रीट,” ला या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात शहरातील बाळगोपाळ व तरुण / तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज सकाळी मोठ्या उत्साहात या रनला सुरुवात झाली.या उपक्रमामुळे बालपणीच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला,यामध्ये सहभागी झालेल्याना खेळ, मनोरंजन आणि…
दीपक मोहिते, भाजपचे लक्ष आता बिहार व प.बंगाल या दोन महत्वाच्या राज्यावर…. दिल्ली काबीज केल्यानंतर १५ राज्यात भाजपाकडे इकहाती सत्ता आहे.एवढेच नव्हे तर देशाची राजधानी दिल्लीतील मोठ्या विजयानंतर एनडीएकडे दोन्ही केंद्रशासित प्रदेशात सत्ता हाती आली आहे.यानंतर भाजपचे लक्ष आता बिहार व प. बंगाल या दोन राज्यावर आहॆ.देशाचा दक्षिण भाग वगळता भाजपने काही किरकोळ अपवाद वगळता उत्तर,मध्य,उत्तरपूर्व, दक्षिणोत्तर भागात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहॆ.आजच्या घडीला देशातील पाच मोठ्या राज्यांपैकी यूपी,महाराष्ट्र व बिहार,तीन राज्यात रालोआचे सरकार आहे.युपी आणि महाराष्ट्रात भाजपाचा स्वत:चा मुख्यमंत्री आहे.तर बिहारमध्ये भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या जेडीयूचे नितीश कुमार यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाचे सुकाणू आहॆ. उत्तर-पूर्व भागातील सात पैकी सहा राज्यात एनडीएचा…
शुभांगी शिंदे,नाशिक, नाशिक सिंहस्थ कुंभमेळा टपाल तिकिटास मंजुरी, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून ” अतुल्य भारत,” संकल्पनेतून २०२७ च्या वार्षिक अंक कार्यक्रमात नाशिक कुंभमेळा टपाल तिकिटास मंजुरी मिळाली आहे.त्याबद्दल छगन भुजबळ यांनी केंद्रीय दळणवळण मंत्रालयाचे मनःपूर्वक आभार मानले आहे. नाशिक सिंहस्थ कुंभमेळा,हा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम नाही तर त्याला सांस्कृतिक आणि खगोलशास्त्रीय महत्त्व आहे. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आणि ” अतुल्य भारत,” संकल्पनेतून जागतिक पातळीवर नाशिकचा गौरव करण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळ्यावर स्मारक टपाल तिकिट जारी करावे,अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय दळणवळणमंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार २०२७ च्या वार्षिक अंक कार्यक्रमात या…
संजय लांडगे,वाडा, कुडूस येथे माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी, भारतीय बौद्ध महासभा वाडा तालुका शाखा व बोधीवृक्ष छाया मंडळ,रमाई महीला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडुस येथील समाज हाॅल येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी,त्यागमुर्ती माता रमाई यांची १२७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात पालघर जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि उपस्थित धम्म उपासक – उपासिका यांच्या हस्ते प्रतिमांचे पुजन,तसेच सुत्तपठण घेवुन करण्यात आले. याप्रसंगी माजी श्रामणेर, बौध्दाचार्य सिध्दार्थ गायकवाड यांनी त्यागमुर्ती,माता रमाई यांचा जीवन प्रवास याविषयी मार्गदर्शन केले.तसेच मंगेश भोईर यांनी रमाई गीत गायनाच्या माध्यमातुन उपस्थितांचे प्रबोधन केले. सदर कार्यक्रमासाठी भारतीय बौध्द महासभा वाडा…
