अमन शेख,मनोर
अंगणवाडी सेविकांचे प्रधानमंत्री मातृवंदना योजना प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण,
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना या विषयावर विशेष प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
मनोर येथे संपन्न झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात सुमारे ३०० अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन ) चंद्रशेखर जगताप प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास विभाग,प्रवीण भावसार यांनी केले.
प्रशिक्षणादरम्यान,मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे महत्त्व स्पष्ट केले.सदर योजना पूर्वी आरोग्य विभागातर्फे राबवण्यात येत होती,मात्र आता ती महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.त्यामुळे १ एप्रिल २०२५ पासून ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.
त्यासाठी काल जिल्हा परिषद पालघरच्या सर्वसाधारण सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी पालघर प्रकल्पातील ३०० अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेक लाडकी योजना, पोषण अभियान,पी.एम. जनजातीय योजना,पी.एम. जीवन ज्योती योजना,विमा योजना इत्यादी योजनांचा सविस्तर आढावा घेतला.
पालघर जिल्ह्याचा कुपोषणाच्या बाबतीत असलेला राज्यव्यापी ओळख दूर करण्यासाठी आणि १९९३ मध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेच्या छायेतून बाहेर येण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगून अंगणवाडी सेविकांनी एकजूट होऊन कुपोषण निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
विक्रमगड येथे २०० सेविकांचे प्रशिक्षण,
काल विक्रमगड येथेही २०० अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले.यासह मनोर, पालघर आणि विक्रमगड अशा तिन्ही ठिकाणी प्रधानमंत्री मातृवंदना योजना प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.
सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी,पर्यवेक्षिका आणि विस्तार अधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.

