संजय लांडगे,वाडा,
कुडूस येथे माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी,
भारतीय बौद्ध महासभा वाडा तालुका शाखा व बोधीवृक्ष छाया मंडळ,रमाई महीला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडुस येथील समाज हाॅल येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी,त्यागमुर्ती माता रमाई यांची १२७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरवात पालघर जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि उपस्थित धम्म उपासक – उपासिका यांच्या हस्ते प्रतिमांचे पुजन,तसेच सुत्तपठण घेवुन करण्यात आले.
याप्रसंगी माजी श्रामणेर, बौध्दाचार्य सिध्दार्थ गायकवाड यांनी त्यागमुर्ती,माता रमाई यांचा जीवन प्रवास याविषयी मार्गदर्शन केले.तसेच मंगेश भोईर यांनी रमाई गीत गायनाच्या माध्यमातुन उपस्थितांचे प्रबोधन केले.
सदर कार्यक्रमासाठी भारतीय बौध्द महासभा वाडा तालुका महीला सरचिटणीस,केंद्रिय शिक्षिका,समता सैनिक रश्मी भोईर,संरक्षण सचीव,समता सैनिक संतोष जाधव ( चीखळे )
व तालुका शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच बोधीवृक्ष छाया मंडळाचे स्थानिक प्रतिनिधी गणपत जाधव,आशा भोईर,आर्या भोईर,प्रमिला जाधव,सुरेखा भोईर,सुजल जाधव,मयुर जाधव,ऋतीक जाधव,अंश भोईर,प्रेम भोईर व शिलसंपन्न धम्म उपासक – उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित पदाधिकार्यांचा गुलाबपुष्प देवुन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रश्मी भोईर यांनी केले.

