सुशीला फातरपेकर, नालासोपारा,
नालासोपारा ” फनस्ट्रीट,” उपक्रमाला बालगोपाळाचा उत्स्फूर्त प्रतिसाद,
वसई-विरार महानगरपालिका क्रीडा विभाग,जागरूक नागरिक संस्था ( वसई ) आणि नारी प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ फन स्ट्रीट,” हा अनोखा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
लहानपण परत येत नाही,मात्र त्याच्या आठवणी पुन्हा जगता येतात,याचा अनुभव आज नालासोपारा शहरातील नागरिकांनी घेतला.महानगरपालिका व अन्य संस्थाच्या सहकार्याने आज शहरात ” फनस्ट्रीट,” ला या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात शहरातील बाळगोपाळ व तरुण / तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आज सकाळी मोठ्या उत्साहात या रनला सुरुवात झाली.या उपक्रमामुळे बालपणीच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला,यामध्ये सहभागी झालेल्याना खेळ, मनोरंजन आणि उत्साहाचा आनंद लुटता आला.
लोकसहभागाने होणारे हे उपक्रम
बाळगोपाळ व युवकांसाठी उपयुक्त उपक्रम नेहमीच प्रेरणा देणारे असतात.अशा उपक्रमासाठी सामाजिक संस्थानी पुढे आले पाहिजे, तसेच महानगरपालिकेनेही अशा उपक्रमात समाजातील सर्व घटकांचे सहकार्य घ्यायला हवे,अशा प्रतिक्रिया स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी माध्यमासमोर व्यक्त केल्या.

