मनिषा जोशी,पुणे कॅन्टोनमेंट,
पोलिसाच्या डोक्यात दगड घालणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड,
पुणे जिल्ह्यातील
भेकराईनगर येथे बाईकस्वाराने रागाच्या भरात वाहतूक पोलिसाच्या डोक्यात दगड घालून पळ काढला होता.त्या आरोपीची पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत.सासवड रस्त्यावर ही घटना घडली होती.या घटनेत पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक ( वय ४७ ) हे गंभीर जखमी झाले होते.या घटनेनंतर आरोपी पळून गेला होता. पोलिसांनी त्याला धाराशिव येथून जेरबंद केले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी येथील कार्यक्रमात पुण्यामध्ये क्राईम रेट सतत वाढतो आहे. पोलिसांनी अशा आरोपीची धिंड काढून गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले होते.वाहतूक पोलिसांला मारहाण करुन जखमी करणार्या बबलु मासाळ ( वय २५,मुळ रा. धाराशिव ) याला धाराशिव येथून अटक करुन त्याची भेकराईनगर परिसरात धिंड काढून पोलिसांनी मुख्यमंत्री यांचा शब्द पाळला.
भेकराईनगर परिसरात या आरोपीची धिंड काढून पोलिसांवर हात उचलल्यावर काय होते,हे फुरसुंगी पोलिसांनी दाखवून दिले. बबलु मासाळ,हा चालक म्हणून काम करतो.तो पुण्यात आईसमवेत रहातो.ही घटना घडल्यानंतर त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तो आपल्या मुळ धाराशिव गावी पळून गेला होता.
पोलीस हवालदार राजेश नाईक हे सायंकाळी भेकराईनगर चौकात आपल्या कर्तव्यावर होते.साडेपाचच्या सुमारास एक जण फोनवर बोलत दुचाकीवरुन जात होता.नाईक यांनी त्याला गाडी चालवताना फोनवर बोलू नकोस,असे सांगितले.त्याचा राग आल्याने त्याने नाईक यांना शिवीगाळ करुन वाद घातला.रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला.त्यात नाईक हे गंभीर जखमी झाले होते.या घटनेनंतर आरोपी पसार झाला.पोलिसांनी त्याला धाराशिव येथून ताब्यात घेऊन पुण्यात आणून अटक केली आहे.

