- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
Author: दीपक मोहिते
लता देशपांडे,वसई, वसई- माणिकपूर येथे पालघर ग्रंथोत्सव-२०२४ चे आयोजन, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-२०१० अंतर्गत ग्रंथालय संचालनालय, वसई-विरार महानगरपालिका, जिल्हा ग्रंथालय अधिकारी,कार्यालय,पालघर व मनोहर वाचनालय, माणिकपूर,वसई यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ फेब्रु.२०२४ रोजी पालघर ग्रंथोत्सव-२०२४ च्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन व विक्री आणि त्यासोबतच साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन वनेमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते १५ फेब्रु.२०२५ रोजी सकाळी १०.३० वा.समाजोन्नती मंडळ संचलित मनोहर वाचनालय,माणिकपूर वसई येथे होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम,खा.हेमंत सवरा, आ.राजेंद्र गावित,आ.निरंजन डावखरे,आ.विनोद निकोले, आ.राजन नाईक,आ.विलास तरे,आ.दौलत दरोडा, आ.हरिश्चंद्र भोये,आ.ज्ञानेश्वर म्हात्रे,आ.शांताराम मोरे, आ.स्नेहा दुबे-पंडीत यांची प्रमुख उपस्थित…
लता देशपांडे,वसई, वसई – माणिकपूर येथे पालघर ग्रंथोत्सव-2024 चे आयोजन, पालघर,दि.14:-महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-२०१० अंतर्गत ग्रंथालय संचालनालय, वसई-विरार महानगरपालिका, जिल्हा ग्रंथालय अधिकारी,कार्यालय,पालघर व मनोहर वाचनालय, माणिकपूर,वसई यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ फेब्रु.२०२४ रोजी पालघर ग्रंथोत्सव-२०२४ च्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन व विक्री आणि त्यासोबतच साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन वनेमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते १५ फेब्रु.२०२५ रोजी सकाळी १०.३० वा.समाजोन्नती मंडळ संचलित मनोहर वाचनालय,माणिकपूर वसई येथे होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम,खा.हेमंत सवरा, आ.राजेंद्र गावित,आ.निरंजन डावखरे,आ.विनोद निकोले, आ.राजन नाईक,आ.विलास तरे,आ.दौलत दरोडा, आ.हरिश्चंद्र भोये,आ.ज्ञानेश्वर म्हात्रे,आ.शांताराम मोरे, आ.स्नेहा दुबे-पंडीत यांची प्रमुख…
दीपक मोहिते, ” कटू सत्य,” एसटी महामंडळ ; मंत्र्यांची नजर भुखंडाचे श्रीखंड लाटण्यावर, राज्यातील जनतेची लालपरी,अशी ओळख असलेल्या एसटी सेवेची गेल्या काही वर्षात पार दुर्दशा झाली आहे.अशावेळी नवनिर्वाचित परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे महामंडळाचे भूखंड विकून श्रीखंड लाटू पाहत आहेत.दरवर्षी पाच हजार वाहने विकत घेण्याचा त्यांचा विचार आहे.सलग पाचवर्षे खरेदी झाल्यानंतर महामंडळाच्या ताफ्यात २५ हजार गाड्या असतील,अशा पद्धतीने नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.पण त्यांची ही चाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आली व त्यानी महामंडळाच्या अध्यक्षपदी उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्याला आणून बसवले. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमीनीची विक्री व गाड्या खरेदी,अशा दोन खरेदी-विक्री व्यवहारातून डबघाईला आलेल्या एसटी सेवेला उर्जितावस्था येणार का ?…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मंत्र्यांनी बेताल वक्तव्य करण्यापूर्वी संविधानातील शपथेची आठवण ठेवावी, राज्याचे मत्स्यउद्योग/ बंदरे विकास मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथे झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मविआच्या सरपंचाला एक रु.चा निधी मिळणार नाही,विकासासाठी निधी हवा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा,असा फतवाच जारी केला.ते आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून पुढे म्हणाले,ज्या ज्या गावात महाविकास आघाडीचे सरपंच आहेत,अशांच्या नावांची यादी काढा,त्या गावांना एक रु.चा ही निधी मिळणार नाही.महाविकास आघाडीचे सरकार असताना मला खूप त्रास दिला गेला,मी आमदार असूनही मला निधी देताना डावलण्यात येत होते.त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरपंचांना विकासासाठी निधी हवा असेल तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा,असा सल्लाही त्यांनी यावेळी…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” जनता दरबारला लोकांचा किती प्रतिसाद मिळेल,हे सांगणे कठीणच आहे…. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीत ” सरकार आपल्या दारी,” या उपक्रमाचा चांगलाच सुळसुळाट झाला होता.कोट्यवधी रु.ची उधळपट्टी करत,असे अनेक इन्व्हेंट पार पडले.पण सरकार दरबारी दाखल झालेल्या लाखो तक्रारींपैकी किती तक्रारीचा निपटारा होऊ शकला,हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शिंदे यांच्या ” शासन आपल्या दारी,” च्या धर्तीवर ” जनता दरबार,” आयोजित करण्यास सुरुवात केली आहे.या दोन्ही उपक्रमाला गोरगरीब जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतो,पण कालंतराने आपली फसवणूक झाल्याचे त्यांना कळते,पण बिचारे काही करू शकत नाहीत.मंत्र्यांची भेट सहजासहजी मिळणे कठीण असते,त्यामुळे ते अशा उपक्रमाकडे धाव…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ईडी ; छातीत धडकी भरवणारी तपास यंत्रणा, ( भाग क्र.१ ) गेल्या काही वर्षात सक्त वसुली संचालनालय ( ईडी ),केंद्रीय गुन्हे अन्वेषण ( सीबीआय ) व आयकर विभाग ( आयटी ) या तीन केंद्रीय तपास यंत्रणांची दहशत आपल्याला पाहायला मिळाली.ईडीच्या भितीने तर अनेक राजकीय नेत्यांचे धाबेच दणाणले,अटक टाळण्यासाठी अनेक नेत्यांनी अक्षरशः लोटांगण घालत सत्ताधारी पक्षाला समर्थन दिले.अनेकांच्या छातीत धडकी भरवणारा हा पीएमएलए कायदा नेमका काय आहे ? इतकी वर्षे ईडी हा विभाग कार्यरत असताना गेल्या बारा वर्षात तो इतका सक्रिय होण्यामागची नेमकी काय कारणे आहेत,यावर आपण आज प्रकाशझोत टाकणार आहोत. चला,तर सर्वप्रथम ईडी हा विभाग कधी…
वसंत भोईर,वाडा पळसाच्या पानांची पत्रावळ्या झाल्या जेवणावळीतून हद्दपार, विवाह सोहळा,सप्ताह,पूजा व धार्मिक कार्यक्रमात जेवणासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या पळसाच्या पानांच्या पत्रावळी हल्ली हद्दपार झाल्याचे चित्र आता ग्रामीण भागातही सर्रास पहावयास मिळत आहेत.तर आधुनिकीकरणाच्या युगात प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रावळींना समाजात अधिक पसंती मिळू लागली आहे. विवाह सोहोळ्यात व इतर धार्मिक कार्यक्रमात आता पळसाच्या पानाच्या पत्रावळींची जागा थर्माकोल व प्लास्टिक पत्रावळीने घेतली आहे.त्यामुळे स्थानिकांचे पत्रावळी तयार करणे व पळसाची पाने जंगलातून आणून व्यापाऱ्यांना विकणे, असा अल्प रोजगार देणारा व्यवसाय हा मागणी कमी होत असल्यामुळे भूतकाळात जमा झाला आहे. पुरातन काळापासून मंगलकार्याच्या जेवणावळीत पळसाच्या पानांपासून तयार करण्यात आलेल्या पत्रावळींचा वापर केला जात होता.आयुर्वेदीक…
वसंत भोईर,वाडा, पालसई ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या ( उबाठा )विभूती पाटील यांची बिनविरोध निवड, तालुक्यातील पालसई ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक काल पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाच्या विभूती पाटील यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीनंतर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे तालुकाप्रमुख निलेश पाटील, lपालसई विभाग प्रमुख विशाल पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माजी उपसरपंच अंकिता पाटील यांची मुदत संपल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. काल उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. त्यात विभूती पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शुभांगी शिंदे, नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार बंगाली आणि आसामी कवींना प्रदान, अँकर ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे देण्यात येणारा २०२२ आणि २०२३ चा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार बंगाली भाषेतील प्रसिद्ध कवी अमिताभ गुप्ता यांना २०२२ साठी आणि असामी भाषेतील प्रसिद्ध कवी नीलम कुमार यांना २०२३ साठी विद्यापीठाचे कुलगुरू आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीव सोनवणे यांच्या हस्ते आणि प्रसिद्ध कवी व अनुवादक तसेच निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह मानपत्र एक लाख रु.चा धनादेश व शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्काराच्या…
दीपक मोहिते, ” साहित्यिकांची मांदियाळी,” दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनात कार्यक्रमाची रेलचेल, मायमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात नुकताच ऐतिहासिक निर्णय झाला.या निर्णयामुळे सुखावलेला मराठी माणूस आता दिल्ली येथे २१ ते २३ जाने.दरम्यान होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला लागला आहे.या संमेलनाध्यक्षपदी लोकसंस्कृती,संत साहित्याच्या गाढा अभ्यासक,संशोधक डॉ. तारा भवाळकर या आहेत.त्यांची साहित्याची वाटचाल ही दैदीप्यमान अशी असून गेल्या सहा दशकाच्या आपल्या साहित्य वाटचालीत संतसाहित्य,लोकसंस्कृती,नाट्यसंशोधन, ललितलेखन, लोककला,एकांकिका व लोकसाहित्य इ.विषयावर विपुल लेखन केले आहे.त्यांनी या काळात साहित्याचे अनेक पुरस्कार मिळवले,त्यामध्ये उत्कृष्ट ग्रंथनिर्मीती पुरस्कार,महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वि.मा.गोखले पुरस्कार,गौरव पुरस्कार,श्री.ना.बनहट्टी पुरस्कार,मुंबई विद्यापीठाचा डॉ.अ.ना.प्रियोळकर, सह्याद्री दूरदर्शन वाहिनीचा…
