लता देशपांडे,वसई,
वसई- माणिकपूर येथे पालघर ग्रंथोत्सव-२०२४ चे आयोजन,
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-२०१० अंतर्गत ग्रंथालय संचालनालय, वसई-विरार महानगरपालिका, जिल्हा ग्रंथालय अधिकारी,कार्यालय,पालघर व मनोहर वाचनालय, माणिकपूर,वसई यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ फेब्रु.२०२४ रोजी पालघर ग्रंथोत्सव-२०२४ च्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन व विक्री आणि त्यासोबतच साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन वनेमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते १५ फेब्रु.२०२५ रोजी सकाळी १०.३० वा.समाजोन्नती मंडळ संचलित मनोहर वाचनालय,माणिकपूर वसई येथे होणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम,खा.हेमंत सवरा, आ.राजेंद्र गावित,आ.निरंजन डावखरे,आ.विनोद निकोले, आ.राजन नाईक,आ.विलास तरे,आ.दौलत दरोडा, आ.हरिश्चंद्र भोये,आ.ज्ञानेश्वर म्हात्रे,आ.शांताराम मोरे, आ.स्नेहा दुबे-पंडीत यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत.तसेच या कार्यक्रमास जिल्हाधिकारी गोविंद बोडके, वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, ग्रंथालय संचालक अ.मा.गाडेकर,पालघर जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष अशोक ठाकूर,मनोहर वाचनालयाचे विश्वस्त डॉ.प्रदिप जाधव, जिल्हा ग्रंथालयाचे कार्यवाह कैलास जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पालघर ग्रंथोत्सव-२०२४,१५ व १६ फेब्रु.असे दोन दिवस असणार असून या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन व विक्री आणि त्यासोबतच साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या ग्रंथोत्सवास साहित्य प्रेमी व जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी,असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी केले आहे.

