Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, आंतरराष्ट्रीय घडामोडी, भारताची डोकेदुखी वाढणार, सध्या बांगला देशात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या लक्षात घेता,जग आता महायुद्धाच्या दिशेने जाऊ लागले आहे.या देशात सध्या जी स्थिती निर्माण झाली आहे,ती भारतासाठी धोकादायक तर आहेच,पण ती येणाऱ्या काळात आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी आहे.कारण लाखो बांगलादेशीयांचे लोंढे भारताच्या सीमेवर येऊ लागले आहेत.१९७० च्या दशकात पाकिस्तानच्या लष्कराने बांगलादेशीयांवर अनन्वित अत्याचार केल्यामुळे सुमारे दीड कोटी नागरिकांनी आपल्या देशातुन पलायन केले व त्यांनी आपल्या देशात मुक्काम ठोकला होता.तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पाकिस्तानविरोधात मोर्चा खोलला होता.भारतीय लष्कराने अवघ्या अकरा दिवसात ढाका काबीज केले.व जनरल नियाझी याना गुडघे टेकून शरणागती…

Read More

दीपक मोहिते, आदिवासी समाज,शिक्षण,साक्षरता व रोजगार क्षेत्रात आजही मागासलेलाच, कुपोषणाचा शाप आजही ” जैसे थे,” स्थितीत, आज जगभरात जागतिक आदिवासी दिन साजरा होणार आहे.आजच्या घडीला जगात आदिवासींची सुमारे ४२ कोटी इतकी लोकसंख्या असून सुमारे पाच हजार आदिवासी समूह आहेत.या समूहाच्या सात हजार भाषा आहेत.या समाजाची ओळख मूलनिवासी असून त्यांचे वास्तव्य जंगल व डोंगर- दर्याखोऱ्यात पाहायला मिळते.हा समाज शांतताप्रिय असून निसर्गाचा पूजक आहे.निसर्गाचे संरक्षण व संवर्धन हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे तो मानतो.असे असूनही त्याचे शेकडो वर्षांपासून या समाजाचे शोषण होत आले आहे व आजही होत आहे. त्यांना मागासलेले,रानटी ठरवत इतर समाजानी त्यांनी शिक्षण,रोजगारापासून कायम वंचित ठेवले.त्यामुळे या समाजाच्या नशिबी अठरापगड…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक वार्तापत्र, ऑक्टो.च्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता, १५ सप्टें.पासून आचार संहिता लागू होणार ? विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. साधारणपणे राज्यात १५ ऑक्टो.रोजी मतदान होईल,असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.तसेच या निवडणुकीची आचारसंहिता १५ सप्टें.पासून लागू होईल.आचारसंहिता लागू झाल्यास त्याचा विकासकामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.सध्या पावसाळा असल्यामुळे सरकारी विभागांना नवी विकासकामे सुरू करणे,शक्य होत नाही,पाऊस ओसरल्यानंतर लगोलग आचारसंहिता लागू झाल्यास निवडणूक निकाल लागेपर्यंत नवी विकासकामे सुरू होऊ शकणार नाहीत. पालघर जिल्ह्यात आजही अनेक विकासकामे प्रलंबित आहेत,त्यामध्ये पाणी,रस्ते,शिक्षण,आरोग्य,रोजगार व साक्षरता इ.क्षेत्राचा समावेश आहे.वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्या चार वर्षांपासून रखडल्या आहेत.सध्या या महानगरपालिकेचा कारभार प्रशासकाच्या…

Read More

दीपक मोहिते, आंतरराष्ट्रीय घडामोडी, बांगला देशातील घडामोडीमागे पाकिस्तान व चीन, बांगला देशात उसळलेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही,जाळपोळ,दगडफेक व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान,अशा घटनांनी हा देश सध्या होरपळून निघाला आहे.बांगला देश निर्मितीसाठी आपले सर्वस्व झोकून देणाऱ्या वंगबंधू शेख मुजीबर रेहमान यांची नामोनिशाणी मिटवण्याचा आंदोलकांनी जणू चंगच बांधल्याचे दिसून आले आहे.देशात उभारण्यात आलेले त्यांचे पुतळे उध्वस्त करण्यात येत आहेत. बांगला देशात सुरू झालेला हिंसाचार आठव्या दिवशी सुरूच आहे.देशात सर्वत्र संचारबंदी लागू असूनही लष्कराला हिंसाचारावर नियंत्रण मिळवणे कठीण होत आहे.आतापर्यंत ५०० हुन अधिक लोक या हिंसाचारात मृत्युमुखी पडले आहेत.आतापर्यंत अब्जावधी रु.चे नुकसान झाले.अनेक सरकारी कार्यालये या हिंसाचारात उध्वस्त झाली आहेत.हा जो उठाव झाला आहे,त्यामागे…

Read More

दीपक मोहिते, ” संवेदना,” शिंदे यांच्या आश्वासनानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित, गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.या व्यतिरिक्त त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात सरकारचा दृष्टिकोन कायम नकारात्मक राहिल्यामुळे तीन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने बेमुदत आंदोलन छेडले होते.त्या आंदोलनात अनेक कर्मचाऱ्यांना आपले जीव गमवावे लागले होते.ते आंदोलन लांबत गेल्यानंतर कर्मचाऱ्यांचा संयम सुटला व आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.त्यानंतर सरकारने चर्चेतून मार्ग काढू असे आश्वासन दिले होते,या आश्वासनानंतर कर्मचारी कामावर परतले होते.पण सरकारने त्यावेळी दिलेल्या आश्वासनापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी ९ ऑगस्ट पासून पुन्हा बेमुदत संपाचा इशारा दिला होता.ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संपाचा इशारा…

Read More

दीपक मोहिते, ” विधानसभा निवडणूक विशेष,” विधानसभा निवडणूक २०२४ ; राजकीय पक्षाच्या हालचालींना वेग, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे.उद्धव ठाकरे व काँग्रेसचे अनेक नेते दिल्लीत दाखल झाले असून खा.राहुल गांधी व खा.खर्गेसह अन्य नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया गटाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर या गटातील घटक पक्ष आता विधानसभा जिंकण्यासाठी सक्रिय झाले आहेत.जागावाटपासंदर्भात बोलणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत तीन दिवस तळ ठोकला आहे.आज रात्री ते राहुल गांधी व सोनिया गांधी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीत नवतरुणांना संधी देणार असल्याचे…

Read More

दीपक मोहिते, बॉटमलाईन, ” महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही,” राज यांचे हे वक्तव्य अंगलट येणार, आरक्षणाची धुंदी किती वाईट असते,तसेच अशा संवेदनशील विषयी उर्मटपणा केल्यास त्याचे कसे परिणाम भोगावे लागतात,याचा अनुभव मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच घेतला.ते सध्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.दोन दिवसांपूर्वी ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.ते ज्या हॉटेलमध्ये उतरले होते,त्या हॉटेलवर जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते राज याना त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी गेले होते.या कार्यकर्त्यानी त्यांची भेट मागितली होती.त्यानुसार राज त्यांना भेटण्यासाठी हॉटेलच्या खाली आले.त्यावेळी राज हे त्या कार्यकर्त्यासोबत अत्यंत उर्मटपणे वागले.त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला व त्यांनी राज यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.त्यानंतर राज्याच्या…

Read More

दीपक मोहिते, बॉटमलाईन, ” महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही,” राज यांचे हे वक्तव्य अंगलट येणार, आरक्षणाची धुंदी किती वाईट असते,तसेच अशा संवेदनशील विषयी उर्मटपणा केल्यास त्याचे कसे परिणाम भोगावे लागतात,याचा अनुभव मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच घेतला.ते सध्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.दोन दिवसांपूर्वी ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.ते ज्या हॉटेलमध्ये उतरले होते,त्या हॉटेलवर जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते राज याना त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी गेले होते.या कार्यकर्त्यानी त्यांची भेट मागितली होती.त्यानुसार राज त्यांना भेटण्यासाठी हॉटेलच्या खाली आले.त्यावेळी राज हे त्या कार्यकर्त्यासोबत अत्यंत उर्मटपणे वागले.त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला व त्यांनी राज यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.त्यानंतर राज्याच्या…

Read More

दीपक मोहीते, ” हिंदू खतरेमे,” बांगला देशातील हिंदू दंगलखोरांचे लक्ष्य, बांगला देशात सध्या जाळपोळ सुरू असून दंगलखोरांनी हिंदूंच्या वसाहतींना लक्ष्य केले आहे.भयभीत झालेले हिंदू नागरीक आता भारत-बांगला देशाच्या सीमेवर जमा होत आहेत.भारताने याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.दरम्यान देशात नवे सरकार लवकरात लवकर स्थापन करण्यात येणार आहे.पंतप्रधानपदी नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.युनूस हे सध्या पॅरिसमध्ये असून ते आज बांगला देशात परतत आहेत. शेख हसीना यानी ब्रिटिश सरकारकडे आश्रय मागितला आहे,मात्र त्यांना परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप सिग्नल मिळालेला नाही.तर अमेरिकेने त्यांचा व्हिसा रद्द केला आहे.नवीन सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप देशात सुरू असलेली…

Read More

दीपक मोहिते, संपादकीय, बांगला देशातील अराजकता ; केंद्र सरकार अलर्ट मोडवर, बांगला देशात सध्या प्रचंड अराजकता निर्माण झाली असून पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे.देशात जी धुमश्चक्री सुरू आहे,ती लक्षात घेऊन आपल्या सरकारने सीमावर्ती भागात असलेल्या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.तर सीमा सुरक्षा दलाने बांगला देशाच्या सीमेवर खबरदारीचे उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर देशात आता लष्करी राजवटीचा अंमल सुरू झाला आहे.बांगला देशात लष्कराची राजवट येण्याची ही दुसरी घटना आहे.यापूर्वी तत्कालीन लष्करप्रमुख झिया उर रहमान यांनी १९७७ साली उठाव करून सत्ता ताब्यात घेतली होती.सन १९८१ पर्यंत ते राष्ट्रपतीपदावर कार्यरत…

Read More