दीपक मोहीते,
” हिंदू खतरेमे,”
बांगला देशातील हिंदू दंगलखोरांचे लक्ष्य,
बांगला देशात सध्या जाळपोळ सुरू असून दंगलखोरांनी हिंदूंच्या वसाहतींना लक्ष्य केले आहे.भयभीत झालेले हिंदू नागरीक आता भारत-बांगला देशाच्या सीमेवर जमा होत आहेत.भारताने याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.दरम्यान देशात नवे सरकार लवकरात लवकर स्थापन करण्यात येणार आहे.पंतप्रधानपदी नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.युनूस हे सध्या पॅरिसमध्ये असून ते आज बांगला देशात परतत आहेत.
शेख हसीना यानी ब्रिटिश सरकारकडे आश्रय मागितला आहे,मात्र त्यांना परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप सिग्नल मिळालेला नाही.तर अमेरिकेने त्यांचा व्हिसा रद्द केला आहे.नवीन सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप देशात सुरू असलेली लुटालूट अद्याप थांबलेली नाही.हिंदूंवर होणारे हल्ले रोखण्यात लष्कराला अपयश आले असून हिंदू समाजात सध्या प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.आपल्या देशातून परांगदा झालेल्या शेख हसीना याना भारत सरकारने दिल्लीच्या
हिंडेंनबर्ग विमानतळावर कडक सुरक्षेत ठेवले आहे.जोवर त्यांना अन्य देशात प्रवेश मिळत नाही,तोवर त्यांना भारतात राहण्याची परवानगी देण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.आज या ज्वलंत विषयावर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सविस्तर निवेदन केले तसेच देशातील परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त केली.
या वाशिंक दंगलीत देशाच्या एकूण २७ जिल्ह्यातील हिंदूंची घरे लक्ष्य करण्यात आली आहेत.देशात स्थानापन्न होणारे सरकार,हे लोकशाही पद्धतीनुसार की लष्कराच्या हुकूमानुसार काम करणार,याविषयी अनेक देशांनी साशंकता व्यक्त केली आहे.बांगला देशात सुमारे १० हजार आणण्याविषयी आज गृहमंत्री अमित शहा व परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांच्यामध्ये बैठक झाली.दरम्यान नव्याने पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या मोहंमद युनूस यांनी अशावेळी भारताने आमच्या पाठीशी उभे राहावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.त्यामुळे भारत-बांगला देश यांच्यामध्ये असलेले परस्पर संबंध पूर्वीसाखेच कायम राहतील,असे वाटते.

