Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वाढवण बंदर ; स्थानिक भूमीपुत्रांसाठीही ” गेमचेंजर,” ठरावा, काल बहुचर्चित वाढवण बंदराच्या भूमीपूजनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.जिल्हा प्रशासन व जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने संयुक्तपणे या कार्यक्रमाची भव्य-दिव्य अशी आखणी केली होती.सुमारे ७६ हजार कोटी रु.खर्च करून या महाकाय बंदराची उभारणी करण्यात येत आहे.या कार्यक्रमात प्रत्येक वक्त्याने आपल्या भाषणात,हा प्रकल्प राज्यासाठी ” गेमचेंजर,” ठरणारे असून हे बंदर राज्याच्या विकासाला गती देणारे आहे,असे सांगितले.या सर्वाच्या म्हणण्यात तथ्य असले तरी येथे राहणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचे काय ? त्यांचे व त्यांच्या मुलाबाळांच्या भवितव्याचे काय ? या दोन प्रश्नांची उत्तरे सरकारकडून मिळायला हवीत. कारण चाळीस…

Read More

पालघर, वाढवण बंदराच्या मार्गात विरोधकांनी अडथळे आणले-पंतप्रधान मोदी, मी शिवरायांच्या चरणी पाया पडून माफी मागतो,तसेच शिवरायांची मनोभावे पूजा करणाऱ्यांचीही माफी मागतो,असे उदगार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण बंदराच्या भूमिपूजन प्रसंगी काढले,यावेळी व्यासपीठावर राज्यपाल पी.राधाकृष्णन,केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल,राजीव शिवरंजन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार,व अन्य मान्यवर उपस्थित होते.मात्र त्यांच्या या माफीला माफी नाही,अशी प्रतिक्रिया शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमाना दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणापूर्वी या सर्वांची भाषणे झाली. आज डहाणू-वाढवण येथे ७६ हजार कोटी रु.खर्च करून उभारण्यात येणाऱ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडले.तत्पूर्वी पंतप्रधानाच्या हस्ते मत्स्यव्यवसाय योजनांचा शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर…

Read More

दीपक मोहिते, ” घाणेरडे राजकारण,” कॅबिनेटमंत्री तानाजी सावंत हे मुख्यमंत्री शिंदे व भाजपच्या मनातील बोलून गेले, सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत.एकनाथ शिंदे गटाचे कॅबिनेटमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेचे जोरदार पडसाद उमटत आहेत.कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादी मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं,ते माझ्या मनाला पटत नाही,त्यामुळे बाहेर आल्यानंतर मला उलट्या होतात,असं वक्तव्य त्यांनी केल्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून कडवट प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतु त्याच्या या विधानानंतर विरोधकांनी मात्र आता तोंडसुख घेत आहेत.तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले ” अजितदादांसारखा एक नेता अशाप्रकारचा अपमान कसं काय सहन करू शकतो ?…

Read More

दीपक मोहिते, “न्यूजलाईन,” नतद्रष्ट राजकारण्यांना अद्दल घडायलाच हवी, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना नामोहरम करण्यासाठी गडकिल्ले उभारले.ते गडकिल्ले आजही डौलात उभे आहेत.हे सारे गडकिल्ले शिवप्रेमी जनतेसाठी पूजनीय आहेत.अशा महाराजांच्या पुतळ्याची अशाप्रकारे विटंबना करणाऱ्या नतद्रष्ट राजकारण्यांना अद्दल घडायलाच हवी, सुमारे ७५० वर्षांपूर्वी तामिळनाडूच्या नैऋत्येस बांधण्यात आलेला जिंजी हा किल्ला अनेक संकटांना तोंड देत आजही अभिमानाने ताठ उभा आहे.या किल्ल्याची तटबंदी १६७७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली होती,आज त्याच महाराजांचा पुतळा आपल्या महाराष्ट्रात अवघ्या आठ महिन्यात जमिनदोस्त होतो,यासारखे दुसरे दुर्देव नसावे.ज्या जिंजी किल्ल्याची तटबंदी महाराजांनी बांधली ती तटबंदी आजही जशीच्या तशी उभी आहे.२००४ साली या तटबंदीने आपल्या अंगावर त्सुनामी देखील घेतली होती…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” पराभवाच्या भितीमुळे अजित पवार आता ” एकला चलो रे,” च्या भूमिकेत, मालवण-राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर तब्बल ९६ तासानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची जाहीर माफी मागितली आहे.तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला दोन दिवसांपूर्वी या प्रकरणी उपरती झाली व त्यांनीही महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेची जाहीर माफी मागितली व त्यानंतर आता त्यांनी ठिकठिकाणी या प्रकरणी आंदोलने करण्यास सुरुवात केली आहेत.सरकारमधील घटक पक्षाने आंदोलन करणे,हे राज्याला काही नवीन नाही.पण अजित पवार गटाला ही अशी उपरती का व्हावी ? या मागची नेमकी कारणे काय आहेत,हे जाणून घेणे गरजेचे आहे. सदर पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये विद्यमान…

Read More

दीपक मोहिते, “हल्लाबोल,” महायुतीमध्ये उलट्याचे प्रमाण वाढत चालले, महायुती सरकारमधील मंत्री तानाजी सावंत यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) यांच्या विरोधात गरळ ओकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या अंगाची लाही लाही झाली आहे.त्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी ” तानाजी सावंत जे काही बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे,” असा गर्भित इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) महायुतीमध्ये सध्या जमेनासे झाले आहे.लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद,या दोन्ही संघटनांनी झालेल्या पराभवाचे खापर अजित पवार गटावर फोडले होते.संघाच्या मुखपत्रातून ( ऑर्गनायझर ) ” भाजपने अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळे महायुतीला…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” खोटं बोल पण रेटून बोल, मालवण- राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा कोसळला,त्यामागची नेमकी कारणे काय आहेत,याचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने आता चौकशी समिती नेमली आहे.मात्र या समितीचा अहवाल राज्य सरकार सार्वजनिक करेल का ? याविषयी मात्र सर्वत्र साशंकता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघानी मालवण समुद्रकिनारी ताशी ४५ कि.मी.वेगाने वारे वाहल्यामुळे हा पुतळा कोसळल्याचे जाहीरपणे निखालस खोटे बोलून वेळ मारून नेली होती.या दोघांची वक्तव्ये ही संतापजनक तर होतीच मराठी माणसाच्या मनावर खोलवर जखमा करणाऱ्या होत्या.चक्रीवादळ येण्यापूर्वी समुद्रकिनारी प्रचंड वेगाने वारे वाहत असतात.यावेळी चक्रीवादळही नव्हते.त्यामुळे ” कुछ तो गडबड आहे,”…

Read More

दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” विधानसभा निवडणुक ; सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता, विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी अनेक चॅनेल्स,वृत्तपत्रे व निवडणूक सर्व्हे करणाऱ्या संस्थांनी आतापासूनच आपले सर्व्हे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.टाइम्स नाऊ व झी चॅनेलच्या सर्व्हेत त्यांनी महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील,असा अंदाज व्यक्त केला आहे.तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने केलेल्या खाजगी सर्व्हेमध्ये त्यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील,असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.त्यांच्या सर्व्हेची माध्यमांनी फारशी दखल घेतली नाही,त्यांनी नमूद केलेल्या जागांपैकी ८५ % जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.आणखी एका संस्थेने केलेला सर्व्हे,हा त्यांच्या सर्व्हेशी मिळताजुळता आहे. त्या संस्थेचा सर्व्हे खालील प्रमाणे आहे:- १) भाजप-६५,…

Read More

दीपक मोहिते, फ्रंटलाईन, सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखेपाटील यांची आज जयंती… २९ ऑगस्ट १९०१ अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक (ता. श्रीरामपूर) या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात विठ्ठलराव एकनाथ विखे-पाटील यांचा जन्म झाला.लोणी खुर्दच्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले,नंतर त्यांनी लहान वयातच शेतीला सुरुवात केली.त्याकाळी शेतकऱ्यांच्या जमिनी कर्जबाजारीपणामुळे सावकारांच्या घशात गेल्यामुळे ते कंगाल बनले होते.सदर बाब नेमकी हेरून त्यांनी व व्यवहारबुद्धी,चातुर्य व काटकसरीने शेती केली. १९२३ मध्ये ” लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी,” ची स्थापना करून ते सार्वजनिक जीवनातील सहकारी क्षेत्राकडे वळले. त्यांनी अवघ्या काही दिवसात जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले, तसेच गावातील पाथरवट-वडार मंडळींना एकत्र आणून ” मजूर सहकारी…

Read More

दिपक मोहिते, वाढवण बंदर भूमिपूजन ; विरोधात जिल्ह्यातील मच्छिमार संघटना एकवटल्या, बहुचर्चित वाढवण बंदराचे भूमिपूजन उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.त्याविरोधात मच्छिमारांमध्ये नाराजी प्रचंड नाराजी असून या भूमिपूजनाला राज्यातील मच्छिमार संघटनांकडून विरोध होत आहे. तसा निर्णय उत्तन,भाईंदर,वाढवण येथे काल झालेल्या समितीच्या सभेत निर्णय घेण्यात आला आहे.वाढवण बंदरच्या उभारणीमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ६४ हुन अधिक मच्छिमार गावांवर विपरीत परिणाम होणार आहे.या बंदरामुळे समुद्रातील मत्स्यउत्पादनात प्रचंड घट होईल व लाखो मच्छिमार आपला व्यवसाय कायमस्वरूपी गमावणार आहेत,असे या मच्छिमार संघटनांचे म्हणणे आहे. विकासाच्या नावाखाली मच्छिमारांना उध्वस्त करण्यात येत असेल तर ते कदापि सहन करणार नाही.असा इशारा या संघटनांनी दिला…

Read More