दीपक मोहिते,
“न्यूजलाईन,”
नतद्रष्ट राजकारण्यांना अद्दल घडायलाच हवी,
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना नामोहरम करण्यासाठी गडकिल्ले उभारले.ते गडकिल्ले आजही डौलात उभे आहेत.हे सारे गडकिल्ले शिवप्रेमी जनतेसाठी पूजनीय आहेत.अशा महाराजांच्या पुतळ्याची अशाप्रकारे विटंबना करणाऱ्या
नतद्रष्ट राजकारण्यांना अद्दल घडायलाच हवी,
सुमारे ७५० वर्षांपूर्वी तामिळनाडूच्या नैऋत्येस बांधण्यात आलेला जिंजी हा किल्ला अनेक संकटांना तोंड देत आजही अभिमानाने ताठ उभा आहे.या किल्ल्याची तटबंदी १६७७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली होती,आज त्याच महाराजांचा पुतळा आपल्या महाराष्ट्रात अवघ्या आठ महिन्यात जमिनदोस्त होतो,यासारखे दुसरे दुर्देव नसावे.ज्या जिंजी किल्ल्याची तटबंदी महाराजांनी बांधली ती तटबंदी आजही जशीच्या तशी उभी आहे.२००४ साली या तटबंदीने आपल्या अंगावर त्सुनामी देखील घेतली होती पण किल्ल्याला साधा धक्का बसू शकला नाही.
१६३८ साली विजापूरच्या मुस्लिमांनी मराठा सरदार शहाजी राजेकडून हा किल्ला ताब्यात घेतला होता.त्यानंतर तो पुन्हा शिवाजी महाराजांनी मुस्लिमांकडून पुन्हा जिंकून घेतला व या किल्ल्याची तटबंदी महाराजांनी अधिक मजबूत केली.महाराजांना सिंधू नदीपासून ते बंगालच्या उपसागरपर्यंतचा परिसर स्वतंत्र करायचा होता.त्यामुळे महाराजांनी कृष्णगिरी,चंद्रगिरी व राजगिरी या तीन पहाडावर असलेला हा किल्ला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या होत्या.हा किल्ला शत्रूवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सोयीचा असा होता.त्यामुळे महाराजांनी या किल्ल्याची तटबंदी अधिक मजबूत केली होती.आजही हा किल्ला व त्याची तटबंदी मजबूत असून तो डौलात उभा आहे.याच तटबंदीने त्सुनामीसारखे महाभयंकर संकट परतवले.आज त्याच महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळतो,हे फार मोठे पातक असून त्याची अद्दल या नतद्रष्ट राजकारण्यांना घडायलाच हवी,अशी मागणी महाराष्ट्राच्या तमाम शिवप्रेमी जनतेने केली आहे.

