दीपक मोहिते,
” घाणेरडे राजकारण,”
कॅबिनेटमंत्री तानाजी सावंत हे मुख्यमंत्री शिंदे व भाजपच्या मनातील बोलून गेले,
सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत.एकनाथ शिंदे गटाचे कॅबिनेटमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेचे जोरदार पडसाद उमटत आहेत.कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादी मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं,ते माझ्या मनाला पटत नाही,त्यामुळे बाहेर आल्यानंतर मला उलट्या होतात,असं वक्तव्य त्यांनी केल्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून कडवट प्रतिक्रिया उमटत आहेत.
परंतु त्याच्या या विधानानंतर विरोधकांनी मात्र आता तोंडसुख घेत आहेत.तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले ” अजितदादांसारखा एक नेता अशाप्रकारचा अपमान कसं काय सहन करू शकतो ? हेच कळत नाही.सत्तेसाठी एवढी लाचारी अजित दादांच्या मनात असावी,असे कधीच वाटलं नव्हतं.त्यांच्यातला स्वाभिमानी बाणा कुठे हरपला याचा शोध अजित दादांच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे.असा टोला महेश तपासे यांनी यावेळी लगावला.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीच्या पीछेहाटीला अजित पवार गटच कारणीभुत असल्याचे शिंदे गट व भाजपचे म्हणणे आहे.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याना महायुतीमध्ये प्रवेश द्यायला नको होता,असे महायुतीच्या अनेक नेत्यांचे म्हणणे आहे.याविषयी
तपासे पुढे म्हणाले,शरद पवार यांच्या पक्षापासून फारकत घेत अजित पवार यांनी विकासासाठी आम्ही सत्तेमध्ये जात आहोत,अशी घोषणा केली होती.त्यानुसार प्रफुल्ल पटेल,छगन भुजबळ,सुनील तटकरे व आदी नेत्यांनी त्यास संमती दिली होती.मात्र लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे गट व भाजपच्या अनेक नेत्यानी अजित पवार व त्यांच्या गटाला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.शरदचंद्र पवार यांच्या पक्षांमध्ये अजित पवार असताना त्यांच्या बाजूला बसण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठी चढाओढ लागत असे.त्याच अजित पवारांच्या बाजूला बसून शिंदे सरकारच्या मंत्र्यांना उलट्या होतात,हे अगदी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनातलं तानाजी सावंत बोलून गेले की काय ? असा सवाल तपासे यांनी उपस्थित केला आहे.

