दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
खोटं बोल पण रेटून बोल,
मालवण- राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा कोसळला,त्यामागची नेमकी कारणे काय आहेत,याचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने आता चौकशी समिती नेमली आहे.मात्र या समितीचा अहवाल राज्य सरकार सार्वजनिक करेल का ? याविषयी मात्र सर्वत्र साशंकता आहे.
कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघानी मालवण समुद्रकिनारी ताशी ४५ कि.मी.वेगाने वारे वाहल्यामुळे हा पुतळा कोसळल्याचे जाहीरपणे निखालस खोटे बोलून वेळ मारून नेली होती.या दोघांची वक्तव्ये ही संतापजनक तर होतीच मराठी माणसाच्या मनावर खोलवर जखमा करणाऱ्या होत्या.चक्रीवादळ येण्यापूर्वी समुद्रकिनारी प्रचंड वेगाने वारे वाहत असतात.यावेळी चक्रीवादळही नव्हते.त्यामुळे ” कुछ तो गडबड आहे,” ,चक्रीवादळाची श्रेणी देखील ठरलेली आहे.या श्रेणीनुसार मालवण-राजकोट किल्ल्याच्या समुद्रकिनारी वाहलेल्या वाऱ्यामुळे पुतळा पडूच शकत नाही.ताशी ९० ते १२५ वेगाने जरी वारा वेगाने वाहला तर झाडे,राहती घरे व उभ्या पिकांचे नुकसान होत असते.जर ४५ कि.मी.वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने जर पुतळा पडू शकतो तर समुद्रकिनारी व समुद्रात उभे असलेले अनेक टॉवर्स जमिनदोस्त व्हायला हवेत.पण आजवर आलेल्या वादळात कधीही टॉवर्स जमिनदोस्त झालेले ऐकिवात नाही.त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघे धादांत खोटे बोलले.त्यामुळे आता ही मंडळी या समितीचा अहवाल जरी आला तरी तो लोकांसाठी उघड न करता दडपण्याचा प्रयत्न करतील,त्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांचा सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे.

