दिपक मोहिते,
वाढवण बंदर भूमिपूजन ; विरोधात जिल्ह्यातील मच्छिमार संघटना एकवटल्या,
बहुचर्चित वाढवण बंदराचे भूमिपूजन उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.त्याविरोधात मच्छिमारांमध्ये नाराजी प्रचंड नाराजी असून या भूमिपूजनाला राज्यातील मच्छिमार संघटनांकडून विरोध होत आहे.
तसा निर्णय उत्तन,भाईंदर,वाढवण येथे काल झालेल्या समितीच्या सभेत निर्णय घेण्यात आला आहे.वाढवण बंदरच्या उभारणीमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ६४ हुन अधिक मच्छिमार गावांवर विपरीत परिणाम होणार आहे.या बंदरामुळे समुद्रातील मत्स्यउत्पादनात प्रचंड घट होईल व लाखो मच्छिमार आपला व्यवसाय कायमस्वरूपी गमावणार आहेत,असे या मच्छिमार संघटनांचे म्हणणे आहे. विकासाच्या नावाखाली मच्छिमारांना उध्वस्त करण्यात येत असेल तर ते कदापि सहन करणार नाही.असा इशारा या संघटनांनी दिला आहे.या सभेत भूमिपूजनाचा कार्यक्रमाला एकमताने विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला असून वाढवण किनार्यावर होणार्या आंदोलनात मोठ्या संख्येने मच्छिमार सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.वसई तालुक्यातील मच्छिमार या भूमिपूजन कार्यक्रमाच्या विरोधात वसई तहसील कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या दिवशीउत्तन,मढ,मर्वे,गोराई येथील मच्छिमार समुद्रात जलसमाधी घेऊन आणि काळे झेंडे दाखवणार आहेत.
सदर सभेला मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल,कार्याध्यक्ष बर्नार्ड डिमेलो,सरचिटणीस संजय कोळी,युवा अध्यक्ष मिल्टन सौदिया,उत्तन वाहतूक संस्थेचे चेअरमन विंसन बांड्या,उत्तन विकास संस्थेचे जॉन गर्या,वसई मच्छिमार संस्थेचे चेअरमन नाझरेथ गोडबोले,एडविन केळीखाद्या व अन्य आठ ते दहा मच्छिमार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या २५ वर्षांपासून वाढवण व पंचक्रोशीतील सुमारे ३० गावातील स्थानिक भूमिपुत्र या प्रस्तावित बंदरविरोधात लढा देत आहेत.मात्र त्यांना प्रत्येक स्तरावर अपयशाला तोंड द्यावे लागले.सरकारने त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवली नव्हती.न्यायालयाने या प्रकल्पास हिरवा कंदील दाखवला व सरकारने उद्या भूमिपूजन करण्याचे ठरवले.त्यानुसार हा कार्यक्रम पार पडणार आहे.मच्छिमार समाज व स्थानिक जनतेत असलेली नाराजी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यंत्रणेने या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावला आहे.

