दीपक मोहिते,
” न्यूजलाईन,”
विधानसभा निवडणुक ; सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता,
विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी अनेक चॅनेल्स,वृत्तपत्रे व निवडणूक सर्व्हे करणाऱ्या संस्थांनी आतापासूनच आपले सर्व्हे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.टाइम्स नाऊ व झी चॅनेलच्या सर्व्हेत त्यांनी महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील,असा अंदाज व्यक्त केला आहे.तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने केलेल्या खाजगी सर्व्हेमध्ये त्यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील,असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.त्यांच्या सर्व्हेची माध्यमांनी फारशी दखल घेतली नाही,त्यांनी नमूद केलेल्या जागांपैकी ८५ % जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.आणखी एका संस्थेने केलेला सर्व्हे,हा त्यांच्या सर्व्हेशी मिळताजुळता आहे.
त्या संस्थेचा सर्व्हे खालील प्रमाणे आहे:-
१) भाजप-६५,
२) शिवसेना ( एकनाथ शिंदे )-२४,
३) राष्ट्रवादी काँग्रेस,( अजित पवार गट )-१०,
४) शिवसेना,( उबाठा )-६५,
५) भा.रा.काँग्रेस -७०,
६) राष्ट्रवादी काँग्रेस,( शरद पवार गट )-४५,
७) इतर-०९,
मात्र निवडणुका तीन महिने लांबणीवर पडल्यामुळे मधल्या काळात थोड्याफार प्रमाणात बदल होऊ शकतो,असे या संस्थेचे म्हणणे आहे.उदा.मालवण राजकोट येथे झालेल्या राड्यामुळे भाजपवर कोकणात अनेक जागा गमावण्याची पाळी येणार आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला ( उबाठा ) रायगड व सिंधुदुर्ग,पालघर ठाणे,या कोकणातील चार गमवाव्या लागल्या होत्या.पण या निवडणुकीच्या नंतरच्या काळात येथील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत गेली.बदलापूर बलात्कार प्रकरण,मालवण-राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे व त्यानंतर तेथे झालेला राडा,या सर्व घटनांमुळे महायुतीच्या घटक पक्षाच्या वागण्याबद्दल कोकणवासीयांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोकणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) या दोघांना बिलकुल थारा मिळणार नाही.विदर्भ,उ.महाराष्ट्र व मराठवाडा -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,प.महाराष्ट्र-राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) तर कोकण,मुंबई व उत्तर महाराष्ट्रात काही शिवसेना ( उद्धव ठाकरे ) एकनाथ शिंदे गटाला बऱ्यापैकी जागा मिळू शकतील.अजित पवार गटाला केवळ पुणे जिल्ह्यात आठ ते दहा जागा मिळू शकतील.भाजप मात्र विदर्भ,मुंबई,उ.महाराष्ट्र व मराठवाड्यात आपला बोलबाला राखेल.एकनाथ शिंदे गट ठाणे,पालघर,मुंबई,हिंगोलीव उत्तर महाराष्ट्रात चांगली नाही,परंतु माफक प्रमाणात कामगिरी करेल,असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.बघूया काय होते ते…

