- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
- ममता बॅनर्जी यांचा उद्धव ठाकरे होणार…
- अपेक्षेप्रमाणे सेनेचे रविंद्र फाटक यांनी बाजी मारली,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” विरोधकांना १५००/- रु.चे मोल कळत नाही-अजित पवार, काल कार्यकर्त्याच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात ” माझी लाडकी बहीण,” योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना १५०० रु.चे मोल काय कळणार ? अशी टीका केली होती.पवार यांची ही टीका योग्यच आहे,कारण विरोधकाना ७० हजार कोटी व १५ लाख रु.चे मोल कधीच कळले नाही.त्यांना १५००/- रु.चे मोल कसे कळणार ? त्यामुळे अजित पवार यांनी विचारलेला प्रश्न योग्यच होता,असेच म्हणावे लागेल. आपल्या बहिणीला राजकारणातून हद्दपार करण्यासाठी विविध हातखंडे वापरणाऱ्या या आधुनिक काळातील भावाला बारामतीच्या लाखो बहिणींनी नुकताच घरचा आहेर दिला…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” विरोधकांना १५००/- रु.चे मोल कळत नाही- अजित पवार, काल कार्यकर्त्याच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात ” माझी लाडकी बहीण,” योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना १५०० रु.चे मोल काय कळणार ? अशी टीका केली होती.पवार यांची ही टीका योग्यच आहे,कारण विरोधकाना ७० हजार कोटी व १५ लाख रु.चे मोल कधीच कळले नाही.त्यांना १५००/- रु.चे मोल कसे कळणार ? त्यामुळे अजित पवार यांनी विचारलेला प्रश्न योग्यच होता,असेच म्हणावे लागेल. आपल्या बहिणीला राजकारणातून हद्दपार करण्यासाठी विविध हातखंडे वापरणाऱ्या या आधुनिक काळातील भावाला बारामतीच्या लाखो बहिणींनी नुकताच घरचा आहेर…
दीपक मोहिते, सूर्यातीर, आश्रमशाळा ; चांगली शिक्षण व्यवस्था कोलमडून पडता कामा नये, गेल्या आठवड्यात पालघर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेतील १०० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली होती.त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्यामुळे अप्रिय घटना घडली नाही.आश्रमशाळा व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारव जेवण हे कायम वादाच्या भोवऱ्यात सापडत असते.विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा होणे,जेवणात अळ्या सापडणे,अन्नाचा दर्जा सुमार असणे,असे प्रकार वारंवार घडत असतात.आदिवासी विकास मंडळ व एकात्मिक बालविकास विभागाचे अधिकारी या मानवनिर्मित गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतात.त्यामुळे आश्रमशाळा समूहयोजना यशस्वी ठरली का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. १९७२-७३ दरम्यान ही योजना स्विकारण्यात आली.डोंगराळ व दुर्गम भागात वास्तव्यास असणाऱ्या जनतेची सामाजिक व शैक्षणिक प्रगती व्हावी,असा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मराठी भाषेला अभिजात दर्जा ; शिंदे यांनी केंद्र सरकारकडे कैफियत मांडावी, गेल्या काही वर्षापासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.पण केंद्रातील मराठी द्वेषी अधिकारी आपल्या राज्य सरकारला काही धूप घालत नाही.आपण परदेशात महाराष्ट्र भवन उभारू शकतो,पण आपल्या राज्याच्या मायबोली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देऊ शकत नाही,अशी खंत मराठी माणूस व्यक्त करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ३ ऑगस्ट रोजी दुबईला गेले होते.त्यांच्या या भेटी दरम्यान त्या देशातील अनेक महाराष्ट्रीयन संस्थांनी त्यांच्याकडे दुबईत महाराष्ट्र भवन बांधण्याची मागणी केली.त्यांच्या या मागणीचा आम्ही नक्कीच विचार करू,असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना…
दीपक मोहिते, अमेरिकेचे विस्तारवादी धोरण, ( भाग क्र.१ ) बांगला देशातील वादळामागे अमेरिका, गेल्या पंधरा दिवसात बांगला देशात जे काही घडलं,त्यामागे आरक्षण हे कारण होते,हे जगजाहीर आहे.पण अचानकपणे इतके मोठे आंदोलन कसं उभं राहते ? आणि बांगला देशाचे लष्कर पंतप्रधान शेख हसीना याना हेलिकॉप्टर देऊन देशातून पलायन करायला कशी मदत करते,हे नक्की काय गौडबंगाल आहे.याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता,या सर्व कुटील कारस्थानामागे अमेरीकेचा हात असल्याचे दिसून आले आहे.विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात ढाका येथे असलेल्या अमेरिकेच्या वकालतीमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने या प्रश्नी महत्वाची भूमिका पार पाडली. परराष्ट्र धोरण विभागाच्या या अधिकाऱ्याने या आंदोलनाचे वकालतीमध्ये बसून सूत्रसंचालन केले होते.शेख हसीना वाजेद…
दिपक मोहिते, बॉटमलाईन, महाराष्ट्राची वाटचाल अराजकाच्या दिशेने,कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या वाटेवर, राज्यात सध्या जे काही चाललंय ते पाहता आपले राज्य,आता अराजकतेच्या दिशेने वाटचाल करू लागल्याचे जाणवू लागले आहे.मराठा/ओबीसी आरक्षण व जीवघेणी सत्तास्पर्धा,अशा दोन कारणामुळे समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होत आहे.गेल्या पाच वर्षात उद्योग व व्यापार या दोन क्षेत्राचा ग्राफ चांगलाच खाली आला आहे.सरकार अब्जावधी रु.ची परकीय गुंतवणूक होत असल्याचा दावा करत असली तरी त्यात बिलकुल तथ्य नाही.गुजरात व कर्नाटक या दोन राज्याच्या तुलनेत आपले राज्य आर्थिक क्रमवारीत पिछाडीवर गेले आहे.बेरोजगारीचा आलेखही चढत्या कमानीवर आरूढ झाला आहे.ज्या राज्यात सामाजिक व धार्मिक सलोखा नसतो,त्या राज्यात परदेशातील बहुराष्ट्रीय कंपन्या आपले प्रकल्प उभारत नाहीत.लाखो कोटी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नारळ,सुपारी,टोमॅटो व शेण झाले स्वस्त, स्वर्गात बाळासाहेब नक्कीच अश्रू ढाळत असतील, मनसे नेते राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यात शिवसेनेने ( उबाठा ) च्या कार्यकर्त्यानी सुपाऱ्यांचा मारा केल्याची घटना नुकतीच घडली होती.त्याचे तीव्र पडसाद काल ठाण्यात उमटले.मनसे सैनिकांनी मेळाव्याच्या निमित्ताने ठाण्यात आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहनावर नारळ,शेण,बांगड्या व टोमॅटोचा मारा केला.याप्रकरणी पोलिसांनी २० ते २५ मनसे सैनिकांना अटक केली आहे.महाराष्ट्राचे राजकारण आता मुद्द्यावरून गुद्यावर आले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडीकडून सतत ” सुपारीबाज,” आरोप करण्यात येत असतो.महाराष्ट्र टोलमुक्त करण्यासाठी काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी आंदोलन छेडले होते,पण राज यांनी हे आंदोलन कालांतराने गुंडाळले.तेव्हापासून…
दीपक मोहिते, भारत सरकारने बांगला देशातील २ कोटी हिंदूंच्या पाठीशी उभे राहण्याची गरज, बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजवटीचा अंत झाल्यानंतर या देशात वर्षांनुवर्षे राहणारे दोन कोटी हिंदू नागरीक सध्या संकटात सापडले आहेत.हिंदूंची घरे,मंदिराना लक्ष्य करण्यात आले आहे.दहा दिवसांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर देशातील हिंदूंना असुरक्षित वाटू लागले आहे.त्यामुळे मोदी सरकारने नवनिर्वाचित पंतप्रधान महंमद युनूस यांच्याशी बोलायला हवे.महंमद युनूस हे भारताचे मित्र आहे,” बचत गट ,” ही संकल्पना त्यांनी सर्वप्रथम आपल्या बांगला देशात राबवली,त्यानंतर भारताने त्याचे अनुकरण केले.या संदर्भात भारतात त्यांची व्याख्याने देखील आयोजित करण्यात आली होती.आपल्याशी असलेले सौहार्दाच्या संबंधाचा वापर करत मोदी सरकारने आता जलदगतीने पावले उचलायला हवीत.कारण गेल्या ५०…
समाजाचे सध्याचे विघातक चित्र, जगण्याचं सूत्र चुकतंय का? भाऊ काय बहीण काय नुसता फापट पसारा, कोण कोणाला विचारतंय कुणालाही विचारा … कुणी कोणाकडे जाईना कुणी कुणाकडे येईना, जगलात काय मेलात काय माया कुणाला येईना … संवेदनशीलता आता फारशी कुठं दिसत नाही, बैठकीत किंवा ओसरीवर गप्पाची मैफिल बसत नाही … पॅकेज,इनक्रिमेंट,सॅलरी इन्व्हेस्टमेंट,विकएन्ड, यातच हल्ली माणसाचा होत आहे ” दि एंड,”… ऐषोआरामामध्ये लोळतांना फाटकं गाव नको वाटतं, जवळचं नातं असलं तरी सांगायलाही नको वाटतं … उच्च शिक्षित असूनही माणूस आज मॅट वाटतं, इंटेरियर केलेल्या घरामधे लुगडं, धोतर ऑड वाटतं.. सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे कसे काय पॉश असतील? पार्लरमधून आणल्या सारखे, चिकणे,आयटम कसे…
दीपक मोहिते, राजकीय घडामोडी, लोकसभेची पुनरावृत्ती होईल,अशा भितीतून भाजपची ठाकरेवर चिखलफेक, उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत तीन दिवस मुक्काम केल्या प्रकरणी महायुतीच्या नेत्यांचा सध्या पोटशूळ उठला आहे.उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्रीपद देण्यात यावे,अशी याचना सोनिया व राहुल गांधी यांच्याकडे केली,असा अपप्रचार भाजपच्या बोलघेवड्या प्रवक्त्यांनी सुरू केला आहे.हा आरोप अत्यंत बालीश व हास्यास्पद असा आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दर पंधरा दिवसांनी दिल्लीचे विमान पकडावे लागते.तर उपमुख्यमंत्री अजित पवार वेषांतर करून व नाव बदलून दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत असतात.त्यांच्या या भेटी,गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रकृती व खुशाली विचारण्यासाठी असावी, असे…
