- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” स्वबळावर निवडणुका लढण्याचा राज ठाकरे यांचा निर्णय अंगलट येणारा, राज ठाकरे यांनी निवडणुकीची तुतारी फुकली असून राज्यात २२० ते २५० जागा लढणार असून या निवडणुकीत आपण कोणाशी युती करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.त्यांच्या या घोषणेने सर्वांच्याच भुवया वर गेल्या आहेत.स्वबळावर निवडणुका लढवण्याचा त्यांचा निर्णय हा महायुतीला मतविभागणीचा फायदा मिळवून देणारा ठरणार आहे.शिवसेना ( उबाठा ) गटाला दगाफटका करण्यासाठी ही एकप्रकारची खेळी असू शकते.हिंदू मतांमध्ये विभागणी व्हावी,यासाठी अशाप्रकारची रणनिती भाजपने आखली असावी,असा संशय राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात अनेक जाहीर सभा घेणारे राज ठाकरे यांना अचानक स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय…
दीपक मोहिते, अर्थसंकल्प कृषी क्षेत्राला मारक ठरणार, नुकत्याच मंजुरी मिळालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात युवा, महिला,गरीबव व शेतकरी, या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवल्याच्या वल्गना अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केल्या असल्या तरी २०२४-२५ च्या या अर्थसंकल्पात शेतकरी व कष्टकरी जनतेच्या गरजांकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. केंद्रसरकारने अर्थसंकल्प तयार करताना कार्पोरेट कंपन्यांशी सल्लामसलत केली,पण किमान हमीभावाच्या कायदेशीर अधिकाराच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एकाही संघटनेशी चर्चा करण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही. पीडिएस योजनेत ९७ हजार कोटी रु.ची केलेली कपात भरुन काढण्यासाठी कोणतीही तरतूद केली नाही.त्यामुळे अन्नधान्याची कोठारे रिकामे होऊन देशाच्या अन्नसुरक्षेवर संकट कोसळू शकते. शेती आणि शेतीवर उपजिवीका करणाऱ्या ५६ % लोकांसाठी एकुण ४८.२८…
दीपक मोहिते, वसई-विरारकर बेहाल, वसई-विरारकर नागरिक गेल्या दोन दिवसापासून हलाखीचे जीवन जगत आहेत.वसई तालुक्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.नालासोपारा पूर्व भागात गोरगरिबांच्या घरात पाणी घुसले आहे.व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरून त्यांच्या मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.१०० % नालेसफाई केल्याचा दावा करणाऱ्या वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त व त्यांच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रु.कोणाच्या घश्यात घातले ? याचा जाब विचारण्याची पाळी सध्या करदात्यावर आली आहे. दरवर्षी पाऊस पडला की या महानगरपालिका हद्दीतील लाखो नागरिक,व्यापारी व भाजीविक्रेते यांचा जीव टांगणीला लागतो.नालेसफाई न करता ठेकेदारांच्या घश्यात पैसे घालणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्यांनी आता या महानगरपालिकेतून चालते व्हायला हवे.” यंदा पाऊस खूप पडला,त्यामुळे पाणी साचले,”असे निर्लज्जपणे उत्तर देणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांनी तोंडाला…
दीपक मोहिते, राज्यसरकार सपशेल अपयशी ठरले, राज्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्यामुळे अनेक शहरासह ग्रामीण भाग देखील जलमय झाला आहे.मात्र या अशा बिकट परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून खंबीर उपाययोजना होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. पुणे,सांगली,मुंबई, कोल्हापुर,रायगड,रत्नागिरी,नागपूर,वर्धा,पालघर,ठाणे,दौंड,चंद्रपूर,ही सर्व शहरे व ग्रामीण परिसर पाण्याखाली गेली आहेत.पुण्यात तर परिस्थिती अतिशय बिकट झाली असून लोकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये,असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.तर शाळा व शासकीय कार्यालयेही बंद ठेवण्यात आली.अशावेळी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार कुठेही पाहायला मिळत नाही.कदाचित ते अमित शहा यांची मिनतवारी करण्यासाठी दिल्लीत असावेत. एकेकाळी ” पुणे तेथे काय उणे,” अशी ओळख असलेले पुणे शहर हे सध्या विविध कारणांमुळे सतत प्रकाशझोतात असते.विद्येचे माहेर…
दीपक मोहिते, ” शौर्यगाथा,” उद्या ” कारगिल विजय दिवस,” आपल्या जवानांची शौर्यगाथा, २५ वर्षांपूर्वी २६ जुलै १९९९ रोजी पाकिस्तानने काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून सुमारे २०५ कि.मी.अंतरावर असलेल्या कारगिल भागात घुसखोरी करून युद्ध छेडले होते.पण आपल्या जवानांनी अत्यंत धाडसी मोहीम राबवत पाकिस्तानच्या लष्कराला पराभूत केले व माघार घ्यायला लावली. कारगिल,द्रास व मश्को खोऱ्यात हिवाळ्यात सैन्य तैनात करणे,अत्यंत जिकिरीचे असते.या काळात येथील तापमान उणे ४० अंशापर्यत खाली जात असते.त्यामुळे भारतीय व पाकिस्तानी सैन्य याकाळात माघारी जाते.हिवाळा संपला की दोन्ही सैन्य आपल्या मूळ जागी परत येत असतात,असा अलिखित समझौता या दोन्ही देशात झाला आहे.पण तत्कालीन लष्करप्रमुख मुशर्रफ यांनी काश्मीर व सियाचेन प्रश्नी भारताला कोंडीत…
दीपक मोहिते, सुप्रसिद्ध साहित्यिक फा.दिब्रिटो कालवश, प्रसिद्ध साहित्यिक,लेखक फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज सकाळी निधन झाले.मृत्यूसमयी ते ८२ वर्षाचे होते. ४ डिसें.१९४२ रोजी विरार पश्चिमेस नंदखाल या गावात त्यांचा जन्म झाला होता.त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील सेंट जोसेफ मराठी हायस्कुल मध्ये झाले.१९७२ साली त्यांनी कॅथॉलिक धर्मगुरूपदाची दीक्षा घेतली.त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए.तर धर्मशास्त्रात एम.ए. केले.पुढील काळात त्यांनी विपुल लिखाण केले.आनंदाचे अंतरंग,ओअँसिसच्या शोधात,ख्रिस्ताची गोष्ट,ख्रिस्ती सण आणि उत्सव,तेजाची पावले,नाही मी एकला,संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्त्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास,सुबोध बायबल,न्यु टेस्टमेंट,सृजनाचा मळा, सृजनाचा मोहोर,मुलांचे बायबल,इ.चा त्यामध्ये समावेश आहे.तसेच त्यांचे वसईच्या अनेक आंदोलने व चळवळीत मोठे योगदान होते.हरित वसई चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड आंदोलन उभे…
दीपक मोहिते, जिल्ह्याच्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा, पालघर जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या,बंधारे व धरणे,तुडुंब भरली आहेत.जिल्हा प्रशासनाने सूर्या व तानसा नद्यांच्या परिसरात असणाऱ्या अनुक्रमे ६५ व ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सूर्या नदीचे पाणी सतत वाढत असल्यामुळे या नदीला पुर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यात सलग चार दिवस तुफान वृष्टी झाल्यामुळे धामणी व तानसा ही दोन्ही धरणे पूर्णपणे भरली असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धामणी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून पाणी सूर्या नदीत सोडण्यात येत आहे.सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.त्यामुळे नदीकिनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा…
दीपक मोहिते, मच्छीमारांच्या विविध समस्यांवर बैठक संपन्न, राम नाईक,माजी राज्यपाल उत्तर प्रदेश यांच्या अध्यक्षतेखाली सुधीर मुनगंटीवार मंत्री,वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात मत्स्योद्योग विकास धोरण समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आ.राजेश पाटील यांनी पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांचे व मत्स्यशेती करणा-यांचे प्रश्न प्रामुख्याने मांडले.त्यांच्या विविध समस्यांचा पाढा त्यांनी मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या बैठकीत वाचला.त्यांच्या रास्त मागण्यांना न्याय देण्यासाठी व जातीने या विषयी लक्ष घालण्याचे आश्वासन संबधित मंत्र्यांकडून मिळवले. मच्छिमार बांधवांना निधी व सोयीसुविधा देताना इतर जिल्ह्यापेक्षा पालघर जिल्ह्यावर अन्याय करण्यात येतो,याकडे आ.राजेश पाटील यांनी मंत्री महोदयांचे लक्ष वेधले. तसेच पालघर जिल्ह्यातील मासेमारी करणारी काही बंदरे…
दीपक मोहिते, ” हालाबोल,” महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली, तीन इंजिन सरकारच्या मंत्रिमंडळात सध्या धुसफूस सुरू झाली आहे.नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजपच्या गिरीश महाजन यांनी आपल्या विभागाला निधी देण्यावरून अर्थमंत्री अजित पवार यांना चांगलेच धारेवर धरले होते.या दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.यावेळी गिरीश महाजन यांनीही पवार यांना खडेबोल सुनावले.आपल्याकडे पैसा नाहीतर जमिनी विकून तुम्हाला पैसा देऊ का ? असा प्रतिप्रश्न पवार यांनी त्यांना विचारला.अजित पवार यांचे हे वक्तव्य भाजपच्या इतर मंत्र्यांनाही चांगलेच खटकले.अजित पवार यांच्याविषयी महायुतीचे अनेक मंत्री व आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.निधी देताना अजित पवार हे कायम ” आपला तो बाब्या,दुसऱ्याचा तो कार्ट्या,” अस करतात,असा त्यांच्यावर सतत आरोप करण्यात येत असतात.खुद्द…
दीपक मोहिते, येणारा काळ मानवासाठी अत्यंत धोकादायक, सतत आदळणारी वादळे,वरुणराजाचे रौद्र रूप,पावसाचे प्रमाण सतत घटणे,वातावरणात होणारे बदल व तापमान वाढणे,ही सारी संकटे आता आपल्या पाचवीला पुजली आहेत.दरवर्षी जगभरात अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये लाखो लोक मृत्युमुखी पडत असतात.पण मानव, नैसर्गिक संसाधने ओरबाडून खाण्याची आपली वृत्ती सोडायला तयार नाही. गेल्या काही वर्षांपासून जगभरात निरनिराळ्या वादळानी अनेक देशांचे अपरिमित नुकसान केले.आपला देशही त्यापासून अलिप्त राहू शकला नाही.दरवर्षी पावसाळ्यात आपल्याला विशेष करून कोकणाला या अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागत आहे,गेली अनेक वर्षे निसर्गाच्या कोपाला सामोरे जात आहोत.गेल्या वर्षी चिपळूण,खेड या तालुक्यात निसर्गाने जो धुमाकूळ घातला,त्यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा.जे कोकण निसर्गरम्य म्हणून ओळखले जाते,त्या कोकणावर…
