- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१५, प्रभागात वाहतूककोंडी व अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद,नागरिक त्रस्त.. नालासोपारा शहराच्या पूर्वेस असलेल्या या प्रभागात गुजराती व उत्तर भारतीय समाजाचे चांगलेच प्राबल्य आहे.या प्रभागात व्यापारउदीमाचे चांगले जाळे असून लहानमोठ्या हजारो अनधिकृत फेरीवाल्यांचा उदरनिर्वाह त्यावर चालतो.दुकाने कमी आणि अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट अधिक असा हा परिसर आहे.रेल्वे स्थानक परिसरात दररोज सकाळ व संध्याकाळी होणारी वाहतूककोंडी ही येथील नागरिकांच्या पाचवीला पुजली आहे.या भागातील पदपथावर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे धाडस ना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये आहे ना पोलिस यंत्रणेमध्ये आहे.आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना आपली वाहने बाहेर काढताना तारेवरची कसरत करावी लागते.या शहरात अनधिकृत रिक्षा व फेरीवाल्यांची संख्या आजच्या घडीला हजारोच्या…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१४, या प्रभागात समस्यांचा डोंगर ; लोकप्रतिनिधी व नोकरशाही कुंभकर्णाच्या निद्रेत, नालासोपारा पश्चिम भागाचा समावेश असलेल्या या प्रभागात संमिश्र अशी समाजरचना आहे.गुजराती,मराठी, मुस्लिम,दाक्षिणात्य व काही अंशी ख्रिस्ती,असा हा सर्वसमावेशक प्रभाग आहे.विकासाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.नागरी सुविधांचा पत्ता नसतानाही नगरपरिषदेच्या काळात सर्रास बांधकाम परवानग्या दिल्या गेल्या.त्यामुळे नियोजनाअभावी या शहराचा चेहरा पार विद्रुप होत गेला.त्याचा त्रास मात्र करदात्यांना सहन करावा लागला.वास्तविक त्रास म्हणण्याऐवजी येथील नागरिकांनी प्रचंड यातना भोगल्या,असं म्हंटल्यास ते चुकीचे ठरणार आहे.नगरपरीषद असताना लोकप्रतिनिधी व नोकरशाहीने आपल्या भ्रष्ट कारभाराने शहराचे अक्षरशः लचके तोडले व त्यानंतर आलेल्या महानगरपालिकेनेही नगरपरिषदेच्या पावलावर पाऊल ठेवत आपला कारभार केला.त्यामुळे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” तरीही समुद्रकिनारे अस्वच्छ का ? काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपचे मंत्री,खासदार,आमदार, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देशभरातील समुद्रकिनाऱ्यावरील कचऱ्याची साफसफाई करून साजरी केली.प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या नेत्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दरवर्षी समुद्रकिनारी असे साफसफाईचे उपक्रम राबवत असतात.आपल्या नेत्याविषयी असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी हा सारा अट्टाहास असतो.अशा उपक्रमाचे आपण कौतुक करायला हवे व ते आपण करतो देखील.आकर्षक हातमोजे व डोक्यावर सुरेख कॅप्स व नजरेत भरेल,अशी वेशभूषा करून हे सर्व कार्यकर्ते सकाळी रामप्रहरी उपाशीपोटी समुद्र किनाऱ्यावर उतरतात.प्रसिद्धी माध्यमाचे प्रतिनिधी देखील आपल्या कॅमेरामनसह हे महान कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांच्यासोबत सज्ज असतात.रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी लवकर…
दीपक मोहिते, सरकारी कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा वाढवणे ; सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेत, सरकारने काही वर्षांपूर्वी आपल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे केले होते आणि अनेक राज्यांनीही त्याचे अनुकरण केले आहे.मात्र,महाराष्ट्र सारख्या काही राज्यांमध्ये अद्यापही हे वय ५८ वर्षे आहे.त्यामुळे,महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी महासंघाने सातत्याने ही मागणी लावून धरली आहे.ही वयोमर्यादा पून्हा ६० इतकी करण्यात यावी.ही मागणी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांना मारक ठरणारी आहे.त्यामुळे विद्यार्थी संघटनाचा ही वयोमर्यादा वाढवण्यास ठाम विरोध आहे.ही वयोमर्यादा वाढवण्यासाठी खालील निकषाचा आधार घेण्यात यावा,असे महासंघाचे म्हणणे आहे. १.अनुभवी आणि कुशल अधिकारी-कर्मचारी निवृत्त झाल्यामुळे प्रशासनाला त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा मिळत नाही. सेवानिवृत्तीचे…
वाडा प्रतिनिधी, वाडा येथे खड्ड्याने घेतला तरूणाचा बळी, वाडा- भिवंडी महामार्गावरील खुपरी गावाच्या हद्दीत प्रशांती हाॅटेल जवळ आज सकाळच्या सुमारास खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात एका निष्पाप तरूणाचा बळी गेला. या घटनेने पंचक्रोशीतील अनेक गावातील ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. स्मित आगिवले ( वय १९ )असे त्या दुर्दैवी तरूणाचे नाव असुन पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार,वाडा तालुक्यातील पिक या गावात राहणारा स्मित हा तरूण ब्लू स्टार या कंपनीत कामाला होता.तो आज सकाळी आपल्या दुचाकीवरून कंपनीत कामावर जात असताना रस्त्यावरील खड्डा चुकवताना कंटेनर खाली सापडून जागीच त्याचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराविरोधात संताप व्यक्त केला…
नदीम शेख,पालघर पालघर येथे आदिवासी एकता परिषदेतर्फे रॅली व विविध कार्यक्रमाचे आयोजन, जागतिक आदिवासी अधिकार दिनानिमित्त आदिवासी एकता परिषदेतर्फे पालघरमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.पाचबत्ती ते पंचायत समिती कार्यालय,या मार्गावर सकाळी ११.०० वाजता भव्य रॅली काढण्यात आली.रॅलीत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. त्यानंतर पंचायत समितीच्या सभागृहात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात राजेंद्र जागले ( मोखाडा ),गणपत गवळी ( ग्रामसेवक, डहाणू ) व ऍड.अश्विन दळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आदिवासींचे अधिकार, पेसा कायद्याचे महत्त्व तसेच जल,जंगल आणि जमीन कशी जपली पाहिजे,याबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमासाठी पौर्णिमा परेड ( जिल्हा सहसचिव ), मोहिनी खरपडे( तालुका संघटक ),सालिनी…
तलासरी प्रतिनिधी, गांगणगावात रंगली आंतरशालेय वारली चित्रकला स्पर्धा, ज्ञानमाता सदन सोसायटी संचालित अकरा प्राथमिक शाळा,चार हायस्कूल आणि दोन ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय वारली चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.जगभरात नावारूपाला आलेली वारली चित्रकला जतन आणि संवर्धन करण्याच्या उदात्त हेतूने दरवर्षी वारली चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा सेवा विद्यामंदिर गांगणगाव येथे ही स्पर्धा पार पडली.आंतरशालेय वारली चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गटात २२,माध्यमिक गटात ८ तर ज्युनिअर कॉलेज गटात ४ स्पर्धक असे एकूण ३० स्पर्धक सहभागी सहभागी झाले होते. निसर्ग व पर्यावरण रक्षण, ज्ञानमाता -शिक्षण योगदान / शताब्दी वर्ष, मानवाचे अस्तित्व व वैज्ञानिक प्रगती,वारली सण-उत्सव व चालीरीती आदी विषयांवर मुलांनी…
जव्हार प्रतिनिधी, ग्रामसेवक पतसंस्थेची ४६ वी वार्षिक अधिमंडळ सभा उत्साहात संपन्न, ठाणे-पालघर जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित,टिटवाळा यांची ४६ वी वार्षिक अधिमंडळ सभा नुकतीच पार पडली. शांती सरोवर रिसॉर्ट,जव्हार-सेलवास रोड, जयसागर धरण परिसर येथे झालेल्या सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष गणेश किसन पडवळ यांनी भूषवले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे सरचिटणीस सूचित घरत, संस्था व अन्य पदाधिकारी,कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी अहवाल सालातील दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली.मागील अधिमंडळ बैठकीचा इतीवृत्तांत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. संचालक मंडळाने सादर केलेला सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अहवाल, ताळेबंद,नफा-तोटा…
दीपक मोहिते, जिल्हा परिषद निवडणूक रणसंग्राम – डहाणू तालुका, जिल्हा परिषदेच्या १३ गटात भाजप व मार्क्स. कम्यु.पक्षात सरळ लढत होण्याची शक्यता, डहाणू तालुक्यात पालघर जिल्हा परिषदेचे एकूण १३ गट तर डहाणू पंचायत समितीचे २६ गण आहेत.या व्यतिरिक्त शहरी भागासाठी डहाणू नगरपरिषद कार्यरत आहे.हा तालुका आदिवासीबहुल असल्यामुळे गट व गणाच्या बहुतांश जागा अनु.जमाती वर्गासाठी आरक्षित आहेत.तसेच या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काही वर्षांपूर्वी सरकारने या तालुक्यात आदिवासी विकास प्रकल्प कार्यान्वित केला.या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विविध योजनाची अंमलबजावणी व आश्रमशाळाचे नियंत्रण करण्यात येत असते.या गटामधील स्थानिक रहिवाश्यांचा मुख्य व्यवसाय शेती असून त्यावर हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.तालुक्याला समुद्रकिनारा लाभला असून अनेक गावांत मोठ्याप्रमाणात…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१३, या प्रभागात स्थानिक मतदार भाजपला संधी देतील,अशी शक्यता आहे… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकासंदर्भात नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचे कान चांगलेच उपटले.त्यामुळे या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्याव्या लागणार आहेत.सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्यासंदर्भात आयोगाला कालमर्यादा घातल्यामुळे महायुतीचे तीन घटक पक्ष वगळता इतर तमाम राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.या निर्णयामुळे गेल्या पाच वर्षांपासून निर्माण झालेली अनिश्चितता आता दूर झाली आहे. असो,गेल्या भागात आपण प्रभाग क्र.१२ च्या प्रभागातील विकासकामाचा आढावा घेतला.आज स्थानिक भूमीपुत्रांचा प्रभाग अशी ओळख असलेल्या प्रभाग क्र.१३ चा आढावा घेणार आहोत.यंदा या प्रभागाला अन्य काही नवीन परिसर…
