- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” अजित पवार यांना बारामती विधानसभेची भिती वाटतेय, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या पत्नीच्या पराभवामुळे पार खचून गेले आहेत.आपण जर आपल्या बारामती या परंपरागत मतदारसंघातून निवडणूक लढवली तर आपल्यासोबत धोका होऊ शकतो,अशा भितीने त्यांना सध्या ग्रासले आहे.गेली तीन दशके आपल्या काकासोबत वावरल्यानंतर आपले काका काय करू शकतात,याचा प्रत्यय गेल्या लोकसभा निवडणुकीत आल्यानंतर त्यांची दातखीळच बसली होती.त्याची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत होईल,असा अंदाज त्यांना आल्यानंतर मी जो उमेदवार देईन,त्याचे काम सर्वाना करावे लागणार आहे,असे पालुपद ते आळवू लागले आहेत.त्यामुळे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत सापडले आहेत.ते स्वतः बारामतीमधून उभे राहायला घाबरत असताना त्यांचे बोलके पोपट मात्र अजित पवार हे…
दीपक मोहिते, लोकशाही बळकट करण्यासाठी ग्रामसभेचे मोठे योगदान- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, ग्रामसभा ही केवळ गावकऱ्यांची सभा नसून लोकशाहीचे उत्तम उदाहरण आहे.लोकशाही बळकट करण्यासठी ग्रामसभेचे मोठे योगदान असल्याचे राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांनी सांगितले. जव्हार येथे ग्रामसभा महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,त्या वेळी राज्यपाल के.सी.राधाकृष्णन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉ.हेमंत सवरा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,जिल्हा पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी करिष्मा नायर,सत्यम गांधी,वयम संस्थेचे अध्यक्ष विनायक थळकर, , विश्वस्त मिलिंद थत्ते,ग्रामसभेच्या अध्यक्षा संगिता कुवारा,तसेच नागरिक उपस्थित होते ग्रामसभा ही एक छोटी लोकसभा आहे,जेथे लोकांचे प्रश्न,समस्या ऐकल्या जातात,जेथे समाजाच्या…
दीपक मोहिते, वसई विरार महानगरपालिकेच्या १२ व्या राष्ट्रीय मॅरेथॉनचे ८ डिसें.२०२४ रोजी आयोजन, वसई विरार शहर महानगरपालिका व वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेचे यंदाचे हे १२ वे वर्षे असून मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनकामी ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया-दिल्ली,महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशन व पालघर जिल्हा ॲथलेटिक असोशिएशन या तीनही क्रीडा संस्थांची मान्यता मिळाली आहे.मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग हा अेम्स ( association of international marathons and distance races) या संस्थेने मोजमाप करुन प्रमाणित करुन दिला आहे. तर आर्यन्स स्पोर्ट्स पी.आर.इव्हेट,हे मॅरेथॉनचे इव्हेन्ट मॅनेजमेन्ट करत आहेत. वसई-विरार महापालिकेने अंतर्भुत केलेल्या नवीन स्पर्धा आणि इतर माहिती देण्यासाठी तसेच…
दीपक मोहिते, टेक्सटाईल पार्कविरोधात पालघरवासीयांचा आक्रोश मोर्चा, केंद्र व राज्यसरकार पालघर जिल्ह्यावर एकामागोमाग प्रकल्प लादू लागले आहे.१९७० च्या दशकात महा.औ.विकास महामंडळ,तारापूर अणू ऊर्जा केंद्र,वाढवण बंदर,मुरबे बहुद्देशीय बंदर व आता रिलायन्स टेक्स्टाईल पार्क या प्रकल्पाचा त्यामध्ये समावेश आहे.त्यामुळे पालघरवासीयांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.काल अनेक गावातील भूमीपुत्रांनी या निर्णयाविरोधात मोर्चा काढला.या मोर्च्यात माहीम,केळवे,वाकसई, ठोकराळे व कमारे या गावातील भूमिपुत्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.माहीम ग्रामपंचायतच्या सरपंच प्रीती पाटील,कमारे ग्रामपंचायतच्या सरपंच वैशाली पडवळे आणि वाकसई ग्रामपंचायतचे सरपंच माधवी हाडळ या तिघींनी आणि केळवे ग्रामपंचायतचे सरपंच संदीप किणी हे या आंदोलनात सहभागी झाले होते.या परिसरात टेक्स्टाईल पार्क प्रकल्प उभारून परिसरात पर्यटनवाढी ऐवजी जलप्रदूषणामुळे…
दीपक मोहिते, ” सूर्यातीर,” ” ग्रामीण भागातील साक्षरता ; एक भयाण वास्तव,” दक्षिणेकडील केरळ राज्याने साक्षरतेच्या क्रमवारीत आपला पहिला क्रमांक आजही टिकवला आहे.सुशिक्षित राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्यात सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारने शिक्षण,कृषी व पर्यावरण,या महत्वाच्या क्षेत्रावर गेल्या सहा दशकात लक्ष केंद्रित केले.त्यामुळे हे राज्य देशात शिक्षण क्षेत्रात प्रगत राज्य ठरू शकले.उद्योग व आर्थिक क्षेत्रात अव्वल राज्य म्हणून ओळख असलेल्या आपल्या राज्याला मात्र ते शक्य होऊ शकले नाही.त्यामुळे आपल्या राज्याच्या ग्रामीण भागातील निरक्षरतेचे प्रमाण आजही ” जैसे थे,” स्थितीतच आहे. सध्या आपले सरकार रस्तेबांधणी,शासन आपल्या दारी,मेट्रो,सागरी सेतू उभारणी,इ.विकासकामांवर लाखो कोटी रु.खर्च करत आहे.नवीन रस्ते बांधणीच्या माध्यमातून गावे एकमेकांशी जोडण्याचा…
दीपक मोहिते, निवडणूक विश्लेषण, काँग्रेसने ईव्हीएम मशीनचं रडगाणं आता बंद करावे, जम्मू-काश्मीर व हरयाणा या दोन राज्याचे निकाल हाती आल्यानंतर एक महत्वाची चर्चा सुरू झाली आहे.या निकालाचे परिणाम महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीवर कसा होईल,यावर आता विचार मंथन सुरू झाले आहे.जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला फारशा अपेक्षा नव्हत्या,काश्मीर खोरे हा प्रदेश मुस्लिमबहुल आहे,त्यामुळे या खोऱ्यात भाजपला फटका बसणार हे स्पष्ट होतं.कारण येथे कलम ३७० उठवण्यात आल्यामुळे मुस्लिम समाजाचा भाजपवर प्रचंड राग आहे.तो राग खोऱ्यातील मतदारांनी या निवडणुकीत ईव्हीएममधूम व्यक्त केला.जम्मू खोऱ्यात हिंदूंचे प्राबल्य आहे.पंजाबी,पंडित व मुस्लिमेतर समाज येथे बहुसंख्य आहे.त्यामुळे यावेळीही येथील मतदारांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली.येथे नॅशनल कॉन्फरन्सला कधीही थारा मिळाला नाही,तसा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सकडे तर हरयाणा तिसऱ्यांदा भाजपच्या ताब्यात, जम्मू-काश्मीर व हरियाणा या दोन राज्याच्या निवडणुकीचे निकाल आज लागले.जम्मू-काश्मीर येथे अपेक्षित असा निकाल लागला.येथे नॅशनल कॉन्फरन्स व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या आघाडीला ५० जागा मिळाल्या,त्यामुळे या राज्यात या दोन्ही पक्षाचे सरकार विराजमान होईल.पण हरयाणा राज्यात भाजपने काँग्रेस पक्षाचे मनसुबे उधळून लावले. या राज्यात मात्र काहीतरी गोलमाल झाले आहे,असा संशय काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी व्यक्त केला आहे.आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासात पिछाडीवर पडलेल्या भाजपने अचानक मुसंडी मारली व ५० जागा जिंकल्या,तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला ३४ जागांवर समाधान मानावे लागले.वास्तविक या राज्यात भाजपला जबर फटका…
दीपक मोहिते, विक्रमगड विधानसभा ; भुसारा विरुद्ध जनाठे,सरळ लढत होण्याची शक्यता, इच्छुक उमेदवारांच्या प्रगती पुस्तकाचे चावडी वाचन, विक्रमगड विधानसभा,( अनु.जमाती ) भाग क्र.६, पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात विविध पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल,हे सांगणे,सध्या तरी कठीण आहे.पण यांना उमेदवारी का मिळावी,त्यांचे कर्तृत्व किती ? त्यांना परिसर विकासकामाबाबत किती आस्था आहे ? त्यांनी आपल्या पक्षवाढीसाठी किती प्रयत्न केले ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत.गेल्या महिन्यात या सर्व इच्छुकांना आपण प्रश्नावली पाठवली होती,पण एकाही इच्छूकाला यातील प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.त्यामुळे आता आपण स्वतःहून त्यांच्या या कामाचा आढावा आपल्या परीने…
दीपक मोहिते, ” भाऊबंदकी,” भाऊबंदकीवर अद्याप लस नाही… गृहकलह व भाऊबंदकीच्या शापाने इतिहासकाळात अनेक साम्राज्ये बुडाली,त्याकाळी लागलेली लागण,आजही तशीच सुरू आहे.प्लेग व कोरोना अशा अस्मानी संकटावर आपण यशस्वीपणे मात करू शकलो.पण गृहकलह व भाऊबंदकी या असाध्य रोगावर आपण कोरोनासारखी लस तयार करू शकलो नाही.मराठा साम्राज्याला घरघर का लागली,पेशवाई का बुडाली ? या प्रश्नाच्या खोलात जाऊन पाहिल्यास आपल्या समोर मराठेशाहीचा काळाकुट्ट येतो. सातशे ते आठशे वर्षात आपण अनेक स्थित्यंतरे पाहिली व परिवर्तनाच्या उसळलेल्या लाटा अनुभवल्या. पण या असाध्य अशा रोगावर कामस्वरूपी उपाययोजना करू शकलो नाही.त्यामुळे आता भाऊबंदकीने अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे.पूर्वी राजघराण्यात हे पाहायला मिळत असे,अभयसिंहराजे,कल्पनाराजे,उदयनराजे व शिवेंद्रराजे या…
दीपक मोहिते, ” निवडणूक विशेष,” जम्मू-काश्मीर व हरियाणा, भाजप पराभवाच्या छायेत, वरील दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून उद्या निकाल लागणार आहे.या दोन्ही राज्यातील मतदानानंतर जे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत,ते सारे पोल हे भाजपची चिंता वाढवणारे आहेत.या एक्झिट पोल नुसार या दोन्ही राज्यात भाजप भुईसपाट होणार आहे.जम्मू व काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ.व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आघाडीला एकूण ९० जागांपैकी ५१ ते ५८ तर भाजपला २५ ते ३० जागा मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये काश्मीरच्या खोऱ्यात भाजपला कधीच फारशा जागा मिळत नाही.पण जम्मूच्या खोऱ्यात मात्र त्यांच्या पारड्यात अनेक जागा पडतात.या खोऱ्यात भाजपचा चांगला दबदबा आहे,मात्र या निवडणुकीत…
