दीपक मोहिते,
वसई विरार महानगरपालिकेच्या १२ व्या राष्ट्रीय मॅरेथॉनचे ८ डिसें.२०२४ रोजी आयोजन,
वसई विरार शहर महानगरपालिका व वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेचे यंदाचे हे १२ वे वर्षे असून मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनकामी ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया-दिल्ली,महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशन व पालघर जिल्हा ॲथलेटिक असोशिएशन या तीनही क्रीडा संस्थांची मान्यता मिळाली आहे.मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग हा अेम्स ( association of international marathons and distance races) या संस्थेने मोजमाप करुन प्रमाणित करुन दिला आहे. तर आर्यन्स स्पोर्ट्स पी.आर.इव्हेट,हे मॅरेथॉनचे इव्हेन्ट मॅनेजमेन्ट करत आहेत.
वसई-विरार महापालिकेने अंतर्भुत केलेल्या नवीन स्पर्धा आणि इतर माहिती देण्यासाठी तसेच स्पर्धेला नव्याने लाभलेल्या प्रायोजकांचे स्वागत करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन विरार मुख्यालयात करण्यात आली होती.या पत्रकार परिषदेत स्पर्धेबाबत माहिती देण्यात आली.
मॅरेथॉन टाईम रेस मुख्य स्पर्धेमध्ये ४२ कि.मी.
२१ कि.मी.१० कि.मी.५ कि.मी.अशा स्पर्धांचा समावेश आहे.तर ११ कि.मी.ची रेस स्पर्धकांच्या सुचनेनुसार या वर्षी १० कि.मी.अंतराची असेल.सर्व स्पर्धांचा मार्ग मागील वर्षा प्रमाणे सारखा असेल. स्पर्धेच्या मार्गामध्ये कोणताही बदल महापालिकेने केलेला नाही.
नोंदणी शुल्क बाबतची माहिती- ४२ कि.मी.व २१ कि.मी.व १० कि.मी.करिता (रु.८५० अधिक कर) असे मिळून १०३९/- रुपये नोंदणी शुल्क आहे. ५ किमी करिता ( रु. ८०० अधिक कर ) असे मिळून ९७७/- इतके आहे. तर धमाल धाव प्रती स्पर्धक- ( १०० अधिक कर ) असे मिळून १२२/- इतके आहे.
धम्माल धाव स्पर्धेमध्ये स्थानिक नागरिकांच्या ग्रुप मध्ये ५ व त्या पेक्षा जास्त स्पर्धक असल्यास- ग्रुप करिता ५००/- रुपये, १० व त्या पेक्षा जास्त असल्यास १०००/- इतकी फी ठेवण्यात आली आहे.
नवीन वयोगट – वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांना धावण्याच्या माध्यमातून निरोगी राहण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतुने मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तीन वयोगटांची भर घातली आहे.महिलांसाठी पूर्ण मॅरेथॉनमध्ये ५५ व त्यावरील वयोगट असा आहे. तर १० K आणि ५ K या स्पर्धेमध्ये अनुक्रमे वय ६० व त्यावरील असा वयोगट पुरुष आणि महिलांसाठी नवीन वयोगट तयार केला आहे.
वसई तालुक्याकरिता विशेष स्पर्धा- वसई तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांकरिता ५ वी ते १० वी चे विद्यार्थी असलेल्या स्पर्धा यामध्ये ५ कि.मी.२ कि.मी.३ कि.मी.या स्पर्धाचा समावेश असून त्यासाठी कोणतेही स्पर्धा शुल्क नाही.या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना पहिल्यांदाच कस्टमाईज बीब नंबर ( रनिंग नंबर ),स्पर्धा पूर्ण केलेल्या सर्व स्पर्धकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र,गुडीबॅग व भरीव रोख रक्कमेची पारितोषिके दिली जातील.
सिनिअर सिटीझन ६० वर्षा वरील स्पर्धकांसाठी १ किमी स्पर्धा व ५० वर्षा वरील स्पर्धकांसाठी ३ कि.मी.ची स्पर्धा असणार आहे.त्यासाठी कोणतेही शुल्क महानगरपालिकेने आकारले नाही.
व्हील चेअर रन सुद्धा यावेळी असणार आहे.गेल्या वर्षी या स्पर्धेतील खेळाडूंचा सहभाग पाहता यावर्षी व्हील चेअर स्पर्धे मध्ये नक्कीच वाढ होणार आहे.
पालघर जिल्ह्यातील ज्यनिअर ॲथलिट व होशी धावपट्टूसाठी विशेष स्पर्धागट- पालघर जिल्ह्यातील वय वर्षे १६ ते १८ मधील ज्युनिअर ॲथलिट,हौशी धावपट्टू यांच्यासाठी विशेष सवलती मध्ये यंदा स्पर्धेचे आयोजन केले आहे.या वयोगटात भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना ५०० रु. नोंदणी शुल्क या वेळी आकारले आहे.देशातील नामवंत खेळाडू यांचे सोबत धावण्याची संधी मिळावी, देश व विदेश पातळीवर आपले खेळाडू निर्माण व्हावे,हा प्रमुख उद्देश आहे.
या प्रवेश शुल्कामधून नोंदणी केलेल्या स्पर्धकांना ब्रॅान्डेड टिशर्ट,रनिंग टाईमिंग चिप ( बीब नंबर ), थ्री डी मेडल,डिजिटल सहभाग प्रमाणपत्र या व्यतिरिक्त सर्व रुट वरील सुविधा देणार आहोत.या स्पर्धेची नोंदणी ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी मुख्यालयात प्रवेशिका आपण उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच रोख रक्कमेची पारितोषिके देखील दिली जाणार आहे. मुख्य म्हणजे प्रमुख रेसला ज्या सुविधा दिल्या जातात त्याच सुविधा या वयोगटातील स्पर्धकांना दिल्या जाणार आहेत.
बॅटल रन- ही स्पर्धा पुन्हा सुरु होत आहे.ही स्पर्धा ग्रुप स्पर्धा आहे.बॅटल रन एका संघामध्ये ४ स्पर्धक असतील.त्यामध्ये एक महिला स्पर्धक असणे गरजेचे आहे.एकच स्पर्धक २५ वर्षाखालील असेल व दुसरे दोन स्पर्धेक २५ वयापेक्षा जास्त असतील. मॅरेथॉन स्पर्धेच्या नोंदणीला सप्टें.पासून सुरुवात झाली आहे.VVMM.IN ही या स्पर्धेची वेबसाईट आहे.
मॅरेथॉन स्पर्धे मध्ये एकूण समारे ५८ लाखांची भरगोस बक्षीसे देण्यात येणार आहेत.यामध्ये
४२ किमी स्पर्धे करिता एकूण २०,३५,०००/-रु.
२१ किमी स्पर्धेसाठी एकूण १७,५०,०००/-रु.
१० किमी स्पर्धेसाठी एकूण : ४,५०,०००/-रु.
५ कि.मी.स्पर्धेसाठी एकूण २,४०,०००/- रु.
४२ कि.मी./ २१ कि.मी. /१० कि.मी. (वसई तालुका स्वतंत्र गट) स्पर्धे करिता एकूण ५,७४,०००/- रु.
बॅटल रन स्पर्धे”साठी एकूण ३,००,०००/- रु
धम्माल धाव एकूण बक्षिसे ६१,५००/- रु.
शालेय गटातील एकूण बक्षिसे रक्कम ८९,५००/-रु.
ज्येष्ठ नागरिक व व्हीलचेअर गटातील एकूण बक्षिसे रक्कम, ७०,९५०/- रकमेची असून
फोटोग्राफी स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम रु.३०,०००/- बक्षिसे देण्यात येणार आहेत.तसेच इतर अन्य बक्षिसांचा यामध्ये समावेश आहे.
प्रायोजक –
मेडिकल पार्टनर म्हणून प्रकृती हॉस्पीटल असणार आहेत.
फास्टअप – एनर्जी पार्टनर, न्यू विवा कॉलेज – वेन्यू पार्टनर,आर्ट मिडिया- आऊटडोर मिडिआ पार्टनर,
पश्चिम रेल्वे व मिरा-भाईंदर वसई- विरार पोलिस आयुक्त कार्यालयाचे सहकार्य मिळणार आहे.
या १२ व्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन, महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

