- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
सुरेश काटे,तलासरी तलासरीमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा, दुर्गम डोंगरी व जंगलात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समाजाकडे लक्ष वेधण्यासाठी युनोने ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन जाहीर केला आहे. आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तलासरीमध्ये ही आदिवासी दिना निमित्त आदिवासी पारंपारिक वाद्य तारपामधून निघणाऱ्या सुरांवर तालबद्ध तारपा नृत्य,तूर आणि थाळीतून कानी पडणाऱ्या मधुर संगीताच्या तालावर ठेका धरत सांस्कृतिक आणि आदिवासी कला आविष्कारांचे दर्शन आज विद्यार्थ्यांकडून घडवण्यात आले.एकमेकांच्या हातात हात गुंफलेले, तूरथाळीचा गजर,लोकगीते यामध्ये तल्लीन झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे सुरेख दर्शन घडवले. आदिवासी संस्कृती व परंपरा , कला इत्यादींची माहिती नव्या पिढीला ज्ञात…
वसंत भोईर,वाडा ग्रामीण भागातील हिरवाई वाढणे व आदिवासी सक्षमीकरणासाठी संकल्प, पालघर जिल्ह्यातील ग्रामीण पाड्यांमध्ये वनशक्ती या स्वयंसेवी संस्थेने रिलायन्स फाऊंडेशन आणि सुखभूमी इंडिया ट्रस्ट यांच्या सहकार्याने कलम केलेल्या फळझाडांची रोपे वाटप करण्यात आली. पवारपाडा आणि नेवालपाडा येथील आदिवासी महिलांना,यावर्षीही ही फळझाडांची रोपे देण्यात आली. या उपक्रमामुळे तानसा खोऱ्यातील हिरवाई वाढणार आहे.मृदा धूप रोखण्यास मदत होईल आणि जैवविविधतेचे संवर्धन साधले जाईल. फळझाडे वातावरणातील कार्बन शोषून घेतात,ज्यामुळे हवामान बदलाच्या परिणामांना आळा घालण्यास मदत होते.याशिवाय,या झाडांमुळे स्थानिक पक्षी व कीटकांना आश्रय मिळेल, पाण्याचा साठा वाढेल आणि स्थानिक परिसंस्था अधिक सक्षम बनेल. स्थानिक महिलांना मिळालेल्या या रोपांमुळे केवळ पोषणाचा स्रोत उपलब्ध होणार नाही, तर…
जव्हार,प्रतिनिधी जव्हार येथे विविध उपक्रमांद्वारा संस्कृतीचे दर्शन, ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गोखले एज्युकेशन सोसायटीच्या के. व्ही. हायस्कूल व आर. वाय. ज्युनिअर कॉलेज,जव्हार येथे विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. उपरोक्त कार्यक्रम तीन टप्प्यांमध्ये पार पडला. पहिल्या सत्रात रानभाज्यांचा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात विद्यार्थ्यांनीअळू,माठ,अंबाडी, तेरं,कुरडू,कोथळी,शेवग्याचे पान,पेंडरे अशा स्थानिक रानभाज्यांचे माहितीपूर्ण सादरीकरण करण्यात आले.यावेळी परीक्षक म्हणून दांगटे व कोरडे यांनी सादरीकरणाचे मूल्यमापन केले. दुसऱ्या सत्रात मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवरे यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणून तालूका व्यवस्थापक पेसा मनोज कामडी यांचा तसेच नशामुक्तीचे कार्यकर्ते मिलिंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनोज कामडी यांनी…
वसंत भोईर,वाडा मुसारणे गावात वृक्षारोपण कार्यक्रम, गाला प्रिसीजन इंजिनिअरिंग कंपनीतर्फे वाडा तालुक्यातील मुसारणे गावात वृक्षारोपणाचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत फळझाडांसह पर्यावरणास लाभदायक अशा ऑक्सिजन देणाऱ्या विविध वृक्षप्रजातींचा समावेश होता. पडीक जमिनीवर वृक्षारोपण करून हिरवळीत रूपांतर करत असतात. त्यानुसार एक सुंदर वनराई उभारण्याचा मानस असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी तुकाराम बेहेरे यांनी दिली.हे वृक्ष केवळ सौंदर्यवृद्धी न करता पर्यावरण संतुलन राखण्यासही मोलाचे ठरणार आहेत.स्थानिक पातळीवर समाजहिताचे कार्य करणे, अशी आमची जबाबदारी आहे.असे बेहेरे यांनी सांगितले. यावेळी कंपनीतर्फे अवधूत पणशीकर,योगिता भोर,राजेंद्र मोरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते पराग पाटील उपस्थित होते.स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही असे उपक्रम नियमित राबवावेत,अशी अपेक्षा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” लाडकी बहीण,” योजनेमुळे ” आनंदाचा शिधा,” योजना होणार इतिहासजमा… आपले राज्य सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे.लाडकी बहीण योजनेतील लाभ घेतलेल्या तब्बल २६ लाख महिला या योजनेच्या बोगस लाभार्थी असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यामागे लवकरच चौकशीचा ससेमिरा लागणार आहे.या योजनेवर आजवर झालेल्या प्रचंड खर्चामुळे अनेक विभागाची राज्यातील अनेक विकासकामे ठप्प झाली आहेत,तर ठेकेदारांची हजारो कोटी रु.देयके थकली आहेत. राज्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत असून यंदाच्या गणेशोत्सवात जनतेला ” ” आनंदाचा शिधा,” ही मिळणार नाही.लाडकी बहीण योजनेसाठी ४५ हजार कोटी रु.द्यावे लागणार असल्यामुळे आनंदाच्या शिधावर विरजण पडले आहे.दरवर्षी सणासुदीच्या काळात राज्यातील गरीब जनतेला केवळ शंभर रु.मध्ये…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” पालघर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता जि.प.व आठ प.स.वर महायुतीचेच वर्चस्व राहणार आहे… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या एकूण तीन टप्यात होणार असल्याचे निवडणूक आयोगातर्फे नुकतेच स्पष्ट करण्यात आले आहे.पहिल्या टप्यात जिल्हा परिषदा / पंचायत समित्या,दुसऱ्या टप्यात नगरपरिषदा / नगर पंचायती व तिसऱ्या टप्यात महानरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत.पहिल्या टप्यात जिल्हा परिषदेच्या ५७ व आठ पंचायत समित्याच्या एकूण ११४ जागासाठी सर्वप्रथम निवडणुका होतील.विसर्जित जिल्हा परिषदेत भाजप – सेना ( शिंदे गट ) महायुतीचे वर्चस्व होते.आगामी निवडणुकीतही त्यांचेच वर्चस्व राहील,असा अंदाज आहे. जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीच्या तालूकानिहाय जागा… १ ) पालघर तालुका – जिल्हा परिषद…
दीपक मोहिते, स्वातंत्र्याची दुसरी लढण्यासाठी पत्रकारांनी तयारी ठेवावी…. पत्रकारीताहा लोकशाही व्यवस्थेत चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो.गेली अनेक वर्षे या विषयावर खुप काही बोलले व लिहिले गेले.पत्रकारिता हा समाजमनाचा आरसा असतो व समाजामध्ये घडणाऱ्या चांगल्या व वाईट घडामोडीचे प्रतिबिंब,या आरशात उमटत असते.पण हल्ली या आरशाला तडे पडू लागले आहेत.एकेकाळी आदर्श पत्रकारिता म्हणून ओळख असलेले हे माध्यम आता ” गोदी मिडिया,” म्हणून नावारूपाला आले आहे.बदलत्या काळानुसार पत्रकारानीही आपली चौकट पार बदलून टाकली आहे.वृत्तवाहिनी व वृत्तपत्र समुहाच्या मालकानी आपल्या उद्योगाला अर्थकारणाची जोड देण्यास सुरुवात केल्यानंतर पत्रकार देखील बेफाम होत गेले.पत्रकारांचे लगाम मालकाच्या हातून राजकारण्याच्या हाती कधी गेले ते कळले देखील नाही.आता काळाच्या ओघात…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” राहुल गांधी व प्रियंका गांधी या दोघा भावंडानी मोदी – शहा यांची सध्या झोप उडवली आहे… ज्या राहुल गांधी यांना गेली दहा वर्षे मोदी – शहा व त्यांच्या टोळीने ” पप्पू,” सतत हिणवले,त्या राहुल गांधी यांनी त्यांना सध्या सळो की पळो करून सोडले आहे.अनेक प्रकरणात केंद्र सरकारला राहुल गांधी यांच्यामुळे माघार घ्यावी लागली आहे.काल राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जो काही पराभव झाला तो निवडणूक आयोगाच्या कुटील कारस्थानामुळे झाल्याचे पत्रकार परिषदेत माध्यमांच्या निदर्शनास आणून दिले.महाराष्ट्र व हरयाणा राज्यात भाजपचा झालेला विजय न्यायाला धरून नव्हता,हे सिद्ध करण्यात राहुल गांधी यशस्वी ठरले आहेत.त्यांच्या आक्रमकतेसमोर मोदी – शहा,अक्षरशः…
वसंत भोईर,वाडा मनसतर्फे कारवाई करण्याची मागणी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय क्रिंदे यांना वाडा तालुक्यात होत असलेल्या अमली पदार्थ विक्री विरोधात निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. या सर्व गैरधंद्यात तरुणाई, कॉलेजचे विद्यार्थी व्यसनाच्या आहारी चालले आहेत.या प्रकारामुळे कुटुंबे उध्वस्त होत आहेत .तरुणाईला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलीस निरीक्षक वाडा यांच्याकडे कारवाई संदर्भात मागणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थी सेनेचे पालघर उपजिल्हाध्यक्ष निखिल बागुल, उपतालुकाध्यक्ष चेतन गोरे, संघटक विशाल गोळे, विभागाध्यक्ष भावेश बागुल आदींसह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
दीपक मोहिते, ” भयावह वास्तव,” …तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकतील, गेल्या तीन दशकात राज्यात सुमारे १ कोटी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.या सर्व आत्महत्या या विदर्भ व मराठवाड्यात झाल्या.यावर्षी २१ लाख शेतकऱ्यांचे ३२ हजार कोटी रु.च्या कर्जाची थकबाकी आहे.त्याच्या वसुलीसाठी बँकाचा तगादा सुरू झाला आहे.राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही,असे स्पष्ट केल्यामुळे उर्वरित सहा महिन्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल,अशी भिती विदर्भ व मराठवाड्यात व्यक्त करण्यात येत आहे. ” शेतकऱ्यांच्या आत्महत्या,” या संवेदनशील विषयाकडे आजवर एकाही सरकारने गांभीर्याने पाहिले नाही.केवळ तात्पुरती मलमपट्टी करणे,यावर या सर्व सरकारने भर दिला.कर्जमाफी करण्याचे त्यांचे आश्वासन हे निवडणुकीचा जुमला होता व आजही तशीच स्थिती…
