Author: दीपक मोहिते

वसंत भोईर,वाडा वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत निरव शांतता, वाडा नगरपंचायतीची निवडणूक येत्या २ डिसें.रोजी होत असून गेल्या १० डिसें. पासून उमेदवार अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आज चौथ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकला नाही.सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे. वाडा नगरपंचायतीत एकूण १७ प्रभाग असून नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडून येणार आहे.या निवडणुकीत महाविकास आघाडी,भाजपा,शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढवत आहेत.मात्र अनेक पक्ष आतापर्यंत उमेदवार निश्चित करू शकले नाहीत.काही ठिकाणी एका प्रभागात अनेक जण इच्छुक आहेत,तर काही ठिकाणी राजकीय पक्षांकडे उमेदवार नाहीत.त्यामुळे दुस-या प्रभागातील उमेदवाराची चाचपणी सुरू…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” या खड्ड्याचे करायचे तरी काय ? वसईकरांचा आक्रोश…. वसई तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुर्दशा व भोगाव्या लागत असलेल्या मरण यातना तसेच मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या या खड्ड्याचे करायचे तरी काय ? अशा विवंचनेत वसईकर नागरिक सापडले आहेत.आमची या त्रासातून सुटका करण्याऐवजी राजकीय नेते आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी एकमेकांच्या उरावर बसत आहेत.त्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारीही चांगलेच निर्ढावले आहेत.या अधिकाऱ्यांना ठेकेदाराकडून मिळणाऱ्या टक्केवारीमध्ये केवळ रस आहे.त्यांना या ज्वलंत विषयाचे सोयरसुतक नाही.अशा सर्व परिस्थितीमध्ये करदाते मात्र हालअपेष्टा सहन करत आहेत.आमचे दैनंदिन जीवन सुखकर व्हावे,आम्हाला प्यायला शुद्ध पाणी मिळावे,दर्जेदार आरोग्य,वैद्यकीय व शिक्षणाच्या सुविधा मिळाव्या,यासाठी करदात्यांनी यंदा परिवर्तन घडवून आणले,पण आज त्यांच्यावर कपाळावर…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” एकत्र येण्याचा निर्णय स्वागतार्ह,पण ” उशिराने सुचलेले शहाणपण,” वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत बहुजन विकास आघाडी व महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर झाले आहे.त्यांचा हा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्याचे वर्णन उशिराने सुचलेले शहाणपण,” असेच करावे लागेल.गेली अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवणारे हितेंद्र ठाकूर व उद्धव ठाकरे हे भाजपला रोखण्यासाठी या निवडणुकीत एकत्र आले आहेत.त्यांच्यासोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या आघाडीत सामील होण्याची शक्यता फार कमी आहे.कारण त्यांचा मनसेला सोबत घेण्यास तीव्र विरोध आहे.मनसे सोबत आली तर गुजराती,मारवाडी,जैन, मुस्लिम व दाक्षिणात्य मतदार आपल्यापासून दुरावतील,अशी भिती काँग्रेसजनांना वाटत आहे. ही भिती रास्तच आहे.मराठी भाषेची…

Read More

दीपक मोहिते, ” सुखद बाब,” माजी आ.ठाकूर यांचे पुन्हा सक्रिय होणे,पक्षाला पुन्हा सुगीचे दिवस येणार…. बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ नेते व वसईचे माजी आ.हितेंद्र ठाकूर हे पुन्हा सक्रिय झाले आहेत.बहुजन विकास आघाडीसाठी ही एक सुखद बाब आहे.त्यांच्या सक्रिय होण्यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही चांगलेच ताजेतवाने झाले असून ठाकुरांच्या खांद्याला खांदा लावून ही निवडणूक जिंकण्यासाठी प्राणाची बाजी लावतील.हितेंद्र ठाकूर हे प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पक्षाच्या दैनंदिन कामकाजापासून दूर होते.त्याचे परिणाम गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भोगावे लागले.गेल्या निवडणुकीत ते स्वतःच्या प्रचारातही फारसे उतरले नव्हते.त्यामुळे त्यांना अवघ्या २ ते ३ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला.त्यांचा हा पराभव मतविभागणीमुळे झाला होता.पण,पराभव…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” बिच्चारे खड्डे,विनाकारण बदनाम होत आहेत, रस्त्यावरील खड्ड्यावरून वसईतील राजकारण बरेच तापू लागले असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या प्रश्नी चांगलेच धारेवर धरले आहे.विरोधक व सत्ताधारी यांच्यात सुरू असलेल्या या संघर्षात नागरिक व रस्त्यावरील खड्ड्यांचे मात्र नाहक मरण होत आहे.खड्ड्यांचे म्हणणे आहे की ज्यांनी डांबर खाल्ले आणि जे सत्ताधारी पक्षाचे लोक केवळ मजा बघताहेत,ते नामानिराळे राहत असून आम्ही खड्डे व नागरिक मात्र मरणयातना भोगत आहोत.आमचे दुःख कोणी ऐकायला तयार नाही. दरवर्षी पावसाळा संपला की आमच्यावर उपचार ( दुरुस्ती व डागडुजी ) करण्यात येत असायचे,पण यंदा हे उपचार का होत नाहीत,याविषयी काहीच उलगडा होत नाही.अशीच परिस्थिती राहिली तर रस्त्याची अवस्था…

Read More

दीपक मोहिते, वसई तालुक्याच्या रस्त्यावरील खड्डे आता बोलू लागले…. नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिधीनींना ते आता जाब विचारू लागले आहेत.” अरे तुमच्यापैकी कोणीतरी जबाबदारी स्विकारा… आपल्या मतदारसंघातील नागरिक व खड्ड्यांना असे वाऱ्यावर सोडून कसे चालेल ?” असे परिसरातील नागरिक व खड्ड्याचे म्हणणे आहे.यंदाच्या पावसात,आमची पाठ सोलून निघाली आहे. केवळ मलमपट्टी करून ( पॅचवर्क करून ) आमच्या जखमा भरल्या जाणार नाहीत.त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होणे,गरजेचे आहे.पण नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीकडून या दुर्धर संकटाकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत आहे.प्रशासनातील अधिकारी हे गेंड्याच्या कातडीचे आहेत,त्यांची ही गेंड्याची कातडी या लोकप्रतिनिधींनी सोलायला हवी होती.पण या लोकप्रतिनिधींनी बघ्याची भूमिका घेत केवळ रिल्स बनवण्यात धन्यता मानली.त्यामुळे वसई -…

Read More

दीपक मोहिते, 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️ उठा उठा निवडणूक आली, जोडे उचलण्याची वेळ झाली… लाज-शरम खुंटीला टांगून ठेवूया, चला कार्यकर्ते आपण सतरंज्या,जोडे उचलूया…. कोणी पार्थ घ्या, कोणी रणजित घ्या, कोणी आदित्य घ्या, अमित घ्या, कोणी रोहित घ्या, अरे कोणी विख्यांचा सुजय घ्या… घराणेशाही बळकट करूया, चला कार्यकर्ते आपण सतरंज्या,जोडे उचलूया…. दत्तांची प्रिया अन महाजनांची पूनम, शिंदेची प्रणिती, तटकरेची आदिति, गायकवडांची वर्षा, सुळ्यांची सुप्रिया, गांधींची प्रियंका अन मुंड्यांची प्रीतम अन पंकजा.. महिलाशक्तीचा जागर करूया, चला कार्यकर्ते आपण सतरंज्या,जोडे उचलूया…. ठाकरे,महाजन,नाईक पवार,मुंडे,शाह,चौहान, चव्हाण,गांधी,मलिक आणि यादव घराणी हीच तर देशाची खरी संपत्ती… घराणेशाहीचा वारसा बळकट करूया… चला कार्यकर्ते आपण सतरंज्या,जोडे उचलूया…. चपटीतला पेग,अन मटणाचं हाडुक, आपापल्या…

Read More

दीपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये मतदारांनी डोळसपणे मतदान करायला हवे, काल राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत पार पडली.यापूर्वी प्रभाग रचनाही शांततेत पार पडली होती.त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून कधी जाहीर करण्यात येतो,याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.गेली अनेक वर्षे रखडलेल्या या निवडणुका आता मार्गी लागणार असल्यामुळे लोकांना दिलासा मिळणार आहे.राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुका साधारणपणे जाने.महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. नगरपरिषद,नगरपंचायती, जिल्हा परिषद,पंचायत समिती व महानगरपालिका इ.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत.या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका समजल्या जातात.तमाम राजकीय पक्षाचे आर्थिक स्रोत असलेल्या…

Read More

दीपक मोहिते दिल्ली बॉम्बस्फ़ोट प्रकरणी चार जण तपास यंत्रणाच्या ताब्यात, दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात एका हॉस्पिटलमधील चार डॉक्टर्सची नाव समोर आली आहेत.हा हल्ला आत्मघातकी दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. याप्रकरणी सुरु असलेल्या तपासाला वेग आला आहे. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ काल संध्याकाळी शक्तीशाली स्फोट झाला होता. या स्फोटाने राजधानीचे शहर असलेली दिल्ली हादरली.संध्याकाळी ६.५२ मिनिटांनी हा शक्तीशाली स्फोट झाला होता.यास्फ़ोटामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला तर २०जण जखमी झाले आहेत.स्फोट इतका शक्तीशाली होता की,आसपासचा परिसर प्रचंड हादरला.परिसरात एकच गडबड,गोंधळाची स्थिती होती.आय-२० कारमध्ये हा स्फोट झाल्याचं तपासातून समोर आले आहे.घटनेच्या ३ तास अगोदर ही…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” … तर एकनाथ शिंदे व अजित पवार गटाचे काही खरं नाही… एकनाथ शिंदे यांची हतबलता आणि अजित पवार यांची बिकट अवस्था लक्षात घेता,या दोघांची भाजप सोबत असलेली सोयरीक फार काळ टिकेल,असं वाटत नाही.भाजपसोबत जाण्याचा निर्णय ” हात दाखवून अवलक्षण ” करून घेण्यासारखा होता.आज भाजपने या दोघांची अवस्था ” इकडे आड,तिकडे विहीर,” अशी करून टाकली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर भाजप या दोघांच्या हाती नारळ देईल,अशी शक्यता आहे.त्यावेळी शिंदे व पवार या दोघांनाही कळून चुकेल की स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आपण हे काय करून बसलो.इतकी वर्षे राजकारणात सक्रिय असूनही शिंदे व पवार या दोघांना फडणवीस यांची चाल ओळखता आली…

Read More