दीपक मोहीते,
” हल्लाबोल, ”
नॅशनल डेस्क – दिल्ली,
मुंबई मनपा निवडणूक ; भाजप – १२५ तर शिंदे गट – ५२,
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी निवडणूक होत असून महायुतीत भाजपची ताकद शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा अधिक आहे.ही निवडणूक आपण एकत्रित व एकदिलाने लढवू असा प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला होता.त्यानुसार दोन्ही पक्षाकडून जागावाटपासंदर्भात काल मुंबईत पहिली बैठक पार पडली.या बैठकीत भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५२ जागांचा प्रस्ताव दिला आहे.त्यामुळे शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
भाजपने काही दिवसांपूर्वी थेट आकडेवारी मांडत राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची घोषणा केली होती.मुंबईसह अने
क शहरात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्रित निवडणूक लढवणार आहे.मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल,तसेच श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या या महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल, असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे.त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही राजकीय पक्षाच्या कामाना चांगलाच वेग आला आहे.दुसरीकडे महायुती व ठाकरे बंधूंमध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.पण महायुतीमध्ये प्रमुख घटक पक्ष असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,मात्र ताकास तुर लागू देत नाही.उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टाळी दिल्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,आपली वेगळी चूल मांडण्याची शक्यता आहे.तसं जर झालं तर आघाडी फुटल्यात जमा होईल.मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी भाजपकडून शिवसेनेला केवळ ५२ जागांचा प्रस्ताव देण्यात आल्यामुळे शिंदे गट नाराज असल्याचे समजते.त्यामुळे काही जागांवर या दोन्ही पक्षाच्या मैत्रीपूर्ण लढती होतील,अशी शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी निवडणूक होत असून महायुतीत भाजप – १२५ आणि शिवसेना ५२ अशा प्रस्तावावर काल झालेल्या बैठकीत विचार करण्यात आला.आपल्याला १२५ जागा मिळाव्या,यासाठी भाजपने आग्रह धरला आहे. भाजपने बैठकीत थेट आकडेवारी मांडत अनेक प्रभागातील जागांची यादीच मांडली.त्यानुसार,एकनाश शिंदेंच्या शिवसेनेची ताकद ज्या प्रभागात आहे,त्या ५२ जागा शिवसेनेला सोडण्याची तयारी भाजपने दाखवली आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सध्या ४७ माजी नगरसेवक आहेत.त्या व्यतिरिक्त भाजप अधिक ५ असे एकूण ५२ प्रभाग सोडायला तयार आहे. उद्या शिवसेनेत भाजपच्या या प्रस्तावावर चर्चा होणार असून प्रस्तावित जागावाटप फॉर्मुल्यावर अंतिम निर्णय होणार आहे.या सर्व घडामोडीवरून भाजप या निवडणुकीच्या जागावाटपात शिंदे खिंडीत पकडण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

