Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जरांगे पाटील यांचा वैचारिक गोंधळ उडाला आहे, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा सध्या वैचारिक गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहे.गेल्या तीन महिन्यापासून ते मराठा समाज,विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार व मराठा आरक्षण विरोधात असलेल्या उमेदवारांना पाडणार,असे सांगत होते.पण काल त्यांनी अचानक घुमजाव करत निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय रद्द केला.जरांगे पाटील यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकेमुळे मराठा समाजात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. निवडणूक लढण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर त्यांनी आता रिंगणात असलेल्या इतर पक्षाच्या उमेदवारांकडून,” आपला मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे,” असे लिहून घ्यायचे ठरवले आहे.जो उमेदवार असे लिहून देईल,त्याला आपण पाडायचं नाही,असे जाहीर केले आहे.हा एकप्रकारे…

Read More

दीपक मोहिते, विक्रमगड वगळता इतर मतदारसंघातील बंडखोरी संपुष्टात, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पालघर लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा मतदारसंघातील अनेक बंडखोरांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले.परंतु शिंदे गटाचे बंडखोर तसेच पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी विक्रमगड मतदारसंघात मात्र आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला.त्यामुळे येथील भाजपचे उमेदवार हरीश्चंद्र भोये अडचणीत आले आहेत. १२९ विक्रमगड मतदारसंघात आता ११ उमेदवार रिंगणात आहेत.त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) सुनील भुसारा,भाजपचे हरिश्चंद्र भोये,मनसेचे सचिन शिंगडा,बविआचे हेमंत खुताडे,शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार प्रकाश निकम व अन्य सहा जण असे एकूण ११ जण रिंगणात आहेत.मात्र खरी लढत भाजपचे भोये व राष्ट्रवादीचे भुसारा यांच्यात होणार आहे.…

Read More

दीपक मोहिते, ” शिट्टी,” चिन्हाचा तिढा अखेर सुटला, अखेर विरोधकांचा डाव उधळला गेला.बहुजन विकास आघाडीचे ” शिट्टी,” हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचे प्रयत्न असफल ठरले आहेत.आज मुंबई उच्च न्यायालयाच्या आरिफ एस.डॉक्टर व सोमशेखर सुंदर्शन यांच्या खंडपीठाने या प्रकरणी बहुजन विकास आघाडीच्या बाजूने निकाल दिला. शिट्टी हे चिन्ह संयुक्त जनता दलाला बहाल करण्यात आल्यामुळे ते बहुजन विकास आघाडीला देता येणार नाही,असे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला कळवण्यात आले होते.त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला होता.या प्रकरणी बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती.आघाडीच्या या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे आरिफ एस.डॉक्टर व सोमशेखर सुंदर्शन यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचे…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” सर्वत्र बंडखोरीची लागण, गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ४८ पैकी ३१ जागा जिंकून महायुतीच्या तोंडाला चांगलाच फेस आणला होता.त्याचीच पुनरावृत्ती या विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी या दोघांना बंडखोरीचा त्रास झाला नव्हता,पण यावेळी मात्र दोघांना बंडखोरांनी अक्षरशः जेरीस आणले आहे.बंडखोरांची समजूत काढताना वरिष्ठ नेत्यांची प्रचंड दमछाक होत आहे.पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात बंडखोरांनी रणशिंग फुंकल्यामुळे शरद पवार यांना इंदापुरात दाखल व्हावे लागले आहे.तर बोरिवली येथे माजी.खासदार गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरी करत भाजपची अवस्था बिकट केली आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी व शाह जोडीने गोपाळ शेट्टी…

Read More

दीपक मोहिते, वास्तव, बोईसर येथे विलास तरे व राजेश पाटील यांच्यामध्ये शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीचा सामना.. १३१ बोईसर विधानसभा मतदारसंघात यंदा शिवसेना ( उबाठा ),शिवसेना ( एकनाथ शिंदे ) बहुजन विकास आघाडी या तिघांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.भाजपने या मतदारसंघात स्वतःचा शिलेदार माजी आ.विलास तरे याना एकनाथ शिंदे गटातून उमेदवारी मिळवून दिली आहे.तर वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांची साथ सोडून आपल्या मनगटावर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेणाऱ्या डॉ.विश्वास वळवी यांना या मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे.हे दोन्ही उमेदवार बलाढ्य असे असून बविआचे विद्यमान आ.राजेश पाटील यांची त्यांच्याशी लढत होत आहे.या तिघांपैकी बोईसर पश्चिम भागात जो उमेदवार सर्वाधिक मते घेईल,तोच सिकंदर…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शिट्टी चिन्हाचा घोळ ; उद्या न्यायालयात निर्णय होण्याची शक्यता, निवडणुकीच्या आखाड्यात आ.हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीशी दोन हात करणे,शक्य होत नसल्यामुळे विरोधक पडद्याआडून अनेक कटकारस्थाने करत असतात.बहुजन विकास आघाडीला शिट्टी हे त्यांचे पारंपरिक चिन्ह मिळू नये,यासाठी त्यांनी जे प्रयत्न चालवले आहेत,त्याला बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.बहुजन विकास आघाडीने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. यापूर्वी २०१८ साली झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतही त्यावेळी सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांनी रात्रभर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बविआला शिट्टी हे चिन्ह मिळू दिले नव्हते.त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीत झाली आहे.त्यावेळी बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांना…

Read More

दीपक मोहिते, शिट्टी या निवडणूक चिन्हासाठी बविआ मुंबई उच्च न्यायालयात, केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिटी हे निवडणूक चिन्ह जनता दल ( युनायटेड ) पक्षासाठी राखीव ठेवल्यामुळे बहुजन विकास आघाडीसमोर पेचप्रसंग उभा ठाकला आहे.त्यामुळे बविआने उच्च न्यायालयात केंद्रीय निवडणूक आयोगा विरोधात दाद मागितली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीतील न्यायालयामध्ये न्यायाधीश जितेंद्र जैन यांच्यासमोर आज सकाळी बहुजन विकास आघाडीने भारत निवडणूक आयोग व इतरांच्या विरुद्ध जनहित याचिका ( रिट पिटीशन ) दाखल केली आहे.यावेळी प्रतिवादी यांना याचिकेचा तपशील पुरवण्याविषयी सुचित करण्यात आले आहे.याप्रकरणी लवकरच सुनावणी होणार आहे. २० नोव्हें.रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात ही बाब महत्त्वपूर्ण असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आ.हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय खेळीकडे तमाम राजकीय पक्षाचे लक्ष, पालघर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या राजकारणाला लवकरच वेगळे वळण मिळण्याची दाट शक्यता आहे.बहुजन विकास आघाडीने सहा विधानसभा मतदारसंघात उभे केल्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे.डहाणू विधानसभा मतदारसंघात उभे असलेले कॉम्रेड आ.विनोद निकोले व विक्रमगड येथे उभे असलेले सुनील भुसारा हे दोघेही आ.हितेंद्र ठाकूर यांचे जिवलग मित्र असतानाही त्यांच्यासमोर आ.ठाकूर यांनी उमेदवार उभे केल्यामुळे आ.ठाकूर यांच्या मनात नेमके काय चालले आहे ? याविषयी पालघर जिल्ह्यात सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. तसेच १३२ नालासोपारा व १३३ वसई विधानसभा मतदारसंघात देखील आ.हितेंद्र ठाकूर वेगळी खेळी खेळण्याच्या…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व, डहाणू येथे भाजप तर विक्रमगड येथे राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) यांची डाळ शिजणे कठीण, पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी १२८ डहाणू वगळता इतर पाच ठिकाणी महाविकास आघाडी व महायुतीमध्ये मोठ्याप्रमाणात बंडखोरी झाली आहे. १२८ डहाणू विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ.विनोद निकोले यांच्या विरोधात भाजपचे विनोद मेढा रिंगणात उतरले आहेत.ही जागा बहुजन विकास आघाडीने लढवायचे ठरवल्यास अरुण निकोले हे त्यांचे उमेदवार असतील.या जागेवर मनसेने विजय वाढीया यांना उमेदवारी दिली आहे.मात्र या मतदारसंघात मार्क्स.कम्यु.व भाजप वगळता इतर पक्षाची ताकद नगण्य आहे.त्यामुळे विनोद मेढा व विनोद निकोले या दोघांमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” या निवडणुकीत मनसे महायुतीची ” बी,” टीम, मनसेचे राजे,राज ठाकरे हे सतत भूमिका बदलणारे नेते म्हणून ओळखले जातात.गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला व मुंबई,ठाणे,नाशिक व पुणे या चार महानगरात युतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेतल्या होत्या.त्यावेळी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते.पण त्यांचा तो पाठिंबा बिनशर्त नव्हता,हे आता महाराष्ट्राच्या जनतेला जाणवू लागले आहे.त्यांनी या निवडणुकीत सुमारे १५० जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.त्यापैकी किती जागा निवडून येतील,हे सांगणे अवघड आहे.पण त्यांनी काल मनसे सत्तेत येईल व देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील,असे भाकीत केले पण त्यांचे हे भाकीत खरे ठरण्याची शक्यता…

Read More