सुरेश काटे,तलासरी,
जीवनात शिस्तीसोबत सामाजिक शिस्तही महत्वाची – सत्यम गांधी,
ज्ञानमाता संस्थेच्या झरी शाळेचा पालक दिन व वार्षिक बक्षीस वितरण सोहळा काल प्रमुख पाहूणे सत्यम गांधी प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास,डहाणू यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी केलेल्या भाषणात सत्यम गांधी यांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली व पालकांनी हा कार्यक्रम केवळ मनोरंजन म्हणून न घेता त्यातील सामाजिक बोधही समजून घ्यावा.तसेच प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या पाल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.विद्याथ्यांनो, जीवनात शिस्ती बरोबरच सामाजिक शिस्तही स्वतःला लावणे गरजेचे आहे.मुलींना खूप शिकवा,असा संदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमास संस्थेचे संचालक फा.निलम लोपीस, झरी गावच्या सरपंच सीना ठाकरे,शाळेच्या प्राचार्या सि. बस्तियान फर्नांडीस व मोठया संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
पालक आणि पर्यावरणाबद्दल कृतज्ञता या थिमला केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थ्यांनी केलेल्या पर्यावरण,सांस्कृतिक, शैक्षणिक,नारीशक्ती सारख्या विविध कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

