- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, जागावाटप, जागावाटपात महाविकास आघाडीच्या शिवसेना ( उबाठा ) व महायुतीमधील भाजपला झुकते माप मिळणार, महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे पथक येत्या २७ सप्टें.रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे.दोन दिवसांच्या या दौऱ्यात हे पथक निवडणूकीसंदर्भात आढावा घेणार आहे.त्यांचा हा दौरा संपला कि विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.या निवडणुका साधारणपणे नोव्हें.महिन्याच्या मध्यास घेण्यात येतील,असा अंदाज आहे.त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख पक्षाच्या जागावाटप प्रक्रियेला आता चांगलाच वेग आला आहे.महायुतीच्या घटक पक्षाचे नेते कितीही दावा करत असले तरी याविषयी होणाऱ्या त्यांच्या मॅरेथॉन बैठकीत एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण होत आहे.भाजप व शिवसेना ( एकनाथ शिंदे गट )…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आ.नितेश राणे यांच्या भगव्या झंझावातापुढे अजित पवारांचा गुलाबी रंग फिकट, गेल्या आठ ते दहा दिवसापासून अजित पवार गटावर एकामागोमाग संकटे कोसळत असून भाजपचे आ.नितेश राणे यांनी त्यांची पळता भुई थोडी केली आहे.तर दुसरीकडे शरद पवार यांनीही अजित पवार यांचा गळा पकडण्यास सुरवात केली आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी जर घड्याळ चिन्हाबाबत निर्णय लागणार नसेल,तर ते चिन्ह गोठवण्यात यावे,व फुटीर गटाला दुसरे चिन्ह देण्यात यावे,अशा आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.त्यामुळे अजित पवार गट सध्या अडचणीत आला आहे.एकीकडे काका आपल्याला अडचणीत आणण्यासाठी सतत जाळे फेकत असतो,तर दुसरीकडे नितेश राणे हे ” आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नये,” असा दम भरू…
प्रवीण दवणे, डहाणू येथे झालेल्या लेखनस्पर्धेत विद्यार्थी व विद्यार्थिनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मोबाईलच्या विळख्यातही ग्रामीण भागातील विद्यार्थी लेखन व काव्यलेखन स्पर्धेत चुणूक दाखवून विविध विषयांवर आपला ठसा उमटवत आहे.त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा,यासाठी कोमसाप पालघर शाखा विविध उपक्रम राबवत असते. आज के.एल.पोंदा शाळेत कोकण मराठी साहित्य परिषद,डहाणू शाखेने डहाणू तालुकास्तरीय लेखन व काव्यलेखस्पर्धेचे व सन २०२३ साली विजेत्या स्पर्धका़ना बक्षीस पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन केले होते.याप्रसंगी दि डहाणू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तरुणभाई पोंदा,सचीव सुधीर कामत,प्राचार्य सोपान इंगळे,कोमसाप पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे, शाखाध्यक्षा डॉ.अंजली मस्करेन्हस,सेवानिवृत्त कर्मचारी संघांचे तालुकाध्यक्ष मारुती वाघमारे,कार्यकारीणी सदस्य वसंत तांडेल,दिलीप जोंधळेकर,नीता नहार आदी मान्यवर उपस्थित होते. डहाणू तालुक्यातील १४ शाळा,…
दीपक मोहिते, मराठा व ओबीसी आंदोलक आमने-सामने, अंबड तालुक्यातील वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आज समोरासमोर आले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री इथे उपोषणाला बसले आहेत.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिसांनी या परिसरात अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.अंतरवली सराटी गावाकडे जाणाऱ्या फाट्यावर वडीगोद्री या गावात मराठा आणि ओबीसी आंदोलक आज समोरासमोर आले व त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.मराठा आंदोलक शहागडमार्गे बीड जिल्ह्यात प्रवेश करणार असून पोलीसानी या मार्गावर बंदोबस्त वाढवला आहे. मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी प्रकृती बिघडल्याने मराठा समाजाचे अनेक आंदोलक अंतरवली सराटीत दाखल होत आहेत.अंतरवली सराटीत जाण्यासाठी लक्ष्मण हाके यांचं जेथे उपोषण सुरु आहे,त्या…
दीपक मोहिते, काँग्रेसचे विजय पाटील यांना वसईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता, १३३,वसई विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विजय पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी दिल्लीत जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत,त्यांच्या उमेदवारीसाठी एका माजी मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दरबारी शिफारस केली आहे.या माजी मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला गांधी कुटुंबात वजन असल्यामुळे विजय पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे.विजय पाटील यांनी २०१९ साली निवडणूक लढवली होती. त्यावेळी झालेल्या सरळ लढतीत त्यांचा पराभव झाला होता,पण समोर आ.हितेंद्र ठाकुर यांच्यासारखा दिग्गज उमेदवार असताना त्यांनी ७६ हजार ९५५ मताचा पल्ला गाठला होता.तत्पूर्वी २०१४ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या मायकल फुर्टडो याना केवळ १६ हजार ४६७ मते पडली…
दीपक मोहिते, सरकार निवडणुकांना घाबरतय, महाराष्ट्र शासनाकडून जारी झालेल्या आदेशानुसार उद्या होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाने जारी केले आहे.त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या निवडणुकीत पराभव झाल्यास त्याचा परिणाम आगामी होणाऱ्या निवडणुकांमध्ये होईल,अशा भितीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या निवडणुका पुढे ढकलल्या असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची ( सिनेट ) निवडणूक गेल्या अडीच वर्षापासून रखडल्या आहेत.या काळात दोन वेळा या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर आता विद्यापीठाने २२ सप्टें.ला ही निवडणूक घ्यायचं ठरवलं होते.पण ही निवडणूक पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.परिपत्रकात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपची पालघर मतदारसंघावर कावळ्याची नजर, राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत.पालघर जिल्हा त्याला अपवाद नाही.कारण जिल्हा,तालुका व स्थानिक पातळीवर पदाधिकारी,कार्यकर्ते व बुथ प्रतिनिधींच्या बैठकांना वेग आला आहे.भाजपने आपल्या घटक पक्षातील ( शिंदे गट ) काही पदाधिकाऱ्यांची समित्यांवर सदस्य म्हणून नियुक्त्या करून तिरकी चाल खेळण्यास सुरुवात केली आहे.विधानसभा निवडणुकीसाठी ज्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधले होते,अशांची समित्यांवर सदस्य म्हणून नियुक्त्या करून त्यांचा पत्ता कट केला आहे.पालघर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या वैदेही वाढाण यांची अनु.जाती-जमाती समितीवर सदस्य म्हणून नियुक्त करणे,हा त्याचाच एक भाग आहे.या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्या इच्छुक होत्या,पण त्यांचे स्वप्न भाजपच्या अशा खेळीमुळे…
दीपक मोहिते, ” राजकीय घडामोडी,” तिसरी आघाडी प्रयोग यशस्वी होणार नाही, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपावरून महायुती व महाविकास आघाडी मध्ये रणकंदन सुरू झाले आहे.या दोघांकडून कितीही दावे करण्यात येत असले तरी ५० ते ६० जागांवर हमरी-तुमरी सुरू झाली आहे.अशी स्थिती असताना आता तिसरी आघाडी या कुरुक्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे.या आघाडीचे नेतृत्व तीन असंतुष्ट आत्मे करत आहेत.शेतकरी नेते राजू शेट्टी,दिव्यांगाचे नेते बचू कडू व मराठा समाजाचे नेते संभाजी राजे,यांनी एकत्र येऊन ही आघाडी स्थापन केली आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीने या तिघांना फारसे महत्व न दिल्यामुळे त्यांनी आता तिसरी आघाडीची निर्मिती केली आहे.हे तिघेही विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित असल्यामुळे…
दीपक मोहिते, ” वास्तव,” स्थानिक भूमिपुत्रांचा मीठ व्यवसाय भूतकाळात जमा, एकेकाळी जगभरातील २० देशांना वार्षिक ७ मिलियन टन मीठ निर्यात करणारे आपल्या देशातील मीठ उत्पादक व्यवसायिक व कामगार सध्या उपेक्षित जीवन जगत आहेत.गेल्या २० वर्षात या व्यवसायावर अनेक संकटे कोसळली व हा व्यवसाय उतरणीला लागला.त्यामागे निसर्ग व मानवनिर्मित कारणे आहेत.या व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात स्थानिक भूमिपुत्र रोजगार मिळवत होते.अनेक कुटुंबाचा चरितार्थ चालत होता.पण कालांतराने सरकारने बहूराष्ट्रीय कंपन्यांना परवानग्या देण्याचा सपाटा सुरू केला व भूमिपुत्र या व्यवसायातून बाहेर फेकला गेला.तर या व्यवसायात रोजगार मिळवणारे मजूर पार देशोधडीला लागले. मीठ व्यवसाय हा प्रामुख्याने समुद्रकिनारी असलेल्या गावातील खारटन जमिनीवर केला जातो.भरतीच्या वेळी नजीकच्या खाडीत…
दीपक मोहिते, ” पंचनामा, अज पवार गटाला शरद पवार धक्का दिला “झटका,” ओबीसी नेता गळाला, अजित पवार गटाच्या ओबीसी सेलचे प्रदेश समन्वयक व प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुद्धे यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांचा हा प्रवेश अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. ओबीसी भगवान भगवान छगन भगवान बुद्धजबल पक्ष दोन दिवसापूर्वी भेटलेले बघितले त्यांचा निर्णय कानाना बीसी महानायक यांनी नियुक्त केला आहे. महायुतीच्या नगरसेवकांचा प्रचार करण्यात आला होता. त्यांच्या नेतृत्वाखालील गोल्फ येथे सेलचे भव्य प्रशिक्षण शिबीर पार पाडण्यात आले होते. ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष तयार करण्यात आले होते, मात्र नियुक्तीचा आदेश निघाला होता. नाराज होते. नुकत्याच महामंडळावर नियुक्त्या करताना…
