- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” सामाजिक भान, ” वाचन व संवाद खुंटता कामा नयेत, वाचन व संवाद,या दोन्ही गोष्टी तुमच्या – आमच्या आयुष्यावर कळत नकळत प्रभाव टाकत असतात.या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी घनिष्ट सबंध असतो.वाचनामुळे अनेक पिढ्यांना मूल्यशिक्षणाचे धडे मिळू शकले.तर संवाद हा पालक आणि मुलांमधला महत्वाचा दुवा आहे.माणसा माणसातील संवादाला पर्याय नाही.पण दुर्देवाने हल्लीच्या काळात वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे.तर एकमेकांशी असलेला संवाद देखील खुंटत चालला आहे.त्याचा परिणाम समाजावर होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.वाचनामुळे विज्ञान,तत्त्वज्ञान, मूल्यशिक्षण व राजकारण,या महत्वाच्या विषयाची आपल्याला ओळख होत असते.त्यामुळे वाचन व संवाद या दोन्ही संस्कृती टिकून राहणे,गरजेचे आहे.या दोन्ही संस्कृती जेंव्हा थांबतील,त्यावेळी मानवाला जगणंही कठीण होणार…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” माध्यमांना कमी लेखून चालणार नाही…… गेल्या दोन दिवसापूर्वी सामना या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या ” रोखठोक,” या सदराने महायुतीची अक्षरशः झोप उडवली आहे.या सदरातून महायुतीमध्ये सध्या काय चालले आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाची घालमेल व ते कसे कोलमडून गेले आहेत.यावर स्तंभलेखकाने चांगलाच प्रकाशझोत टाकला आहे.हा लेख सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागला असून त्यांचे प्रवक्ते सध्या या लेखामुळे हडबडून गेले असून त्यावर तुटून पडत आहेत.परंतु त्यांच्या पोपटपंचीला मात्र जनाधार मिळत नाही. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हसरा चेहरा व उत्साह हा दरे गावच्या जंगलात हरवला आहॆ.त्यांनी जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत केले,तोच प्रकार भाजप आता त्यांच्यासमवेत करत आहॆ.आपल्याला पुन्हा…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” धर्मसत्ता व राजसत्ता यांची युती अराजकाला आमंत्रण देणारी… धर्मसत्ता व राजसत्ता यांची युती होते,तेंव्हा स्वतंत्रपणे विचार करणे,किंवा विवेकाने काही करता येत नाही.कारण,अशावेळी केवळ धर्मभावनेला महत्व आलेले असते आणि हीच भावना जनसमूहाच्या मनावर राज्य करत असते.मात्र या लोकांमध्ये समोरासमोर लढण्याची क्षमता नसते.मात्र रयतेला आपल्या ताब्यात ठेवण्याची प्रचंड ताकद त्यांच्यामध्ये असते.सर्वसामान्य माणसाला पाप-पुण्य व स्वर्ग-नरक,अशा विक्षिप्त कल्पनांच्या जाळ्यात बंदिस्त करणे सहजशक्य असते.हीच युती जनमानसात भयगंड निर्माण करते.आज जगातील अनेक देशात सर्वत्र हेच सुरू आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांनाही पाकिस्तानच्या राजसत्तेने जन्नत मिळेल,असे गाजर दाखवत हल्ल्याचा कट रचला होता.या हल्ल्यानंतर आपल्याला मायदेशी परतता येणार नाही,हे माहीत…
अनिल वैद्य,नाशिक आदिवासी भागाच्या विकासासाठी कौशल्य शिक्षण महत्वपूर्ण- केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन आदिवासी भागातील लोकांना समाजाच्या प्रवाहासोबत आणण्यासाठी मोठया प्रमाणात कौशल्य शिक्षण महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ’एम्स’ नागपूर येथे आयोजित MUHS FIST-25 परिषदेस केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर ( निवृत्त ) समवेत ” एम्स,” नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, MUHS FIST-25 परिषदेचे आयोजक डॉ.संजीव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणात म्हणाले,आदिवासी भागात पायाभूत सुविधा पोहोचणे गरजेचे आहे.त्यासाठी कौशल्य…
अनिल वैद्य,नाशिक सन्मान ” ती,” चा,सन्मान पूर्णागिनींचा… राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे,यांच्या संकल्पनेतून भगूर येथे सन्मान “ ती,” चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुवासिनींसोबत पूर्णागिनी भगिनी ना ही समानतेच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी हा ” हळदी कुंकू,” चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.राष्ट्रवादी महिला काँग्रेस व झेप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. महिला सन्मानार्थ समाजातील सर्व महिलेला समान वागणुक देण्यात यावी काही कारणास्तव ” ती,” च्या आयुष्यात ” ती,” च्या पतीचे निधन झाले असता ” ती,” ला ” विधवा,” म्हणून सम्भोधले जाते तीला शुभकार्यास पुढे न येऊ देणे,कुठलेही कार्य असो अथवा इतर…
दीपक मोहिते, देशभरात भारतीय तटरक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा, भारतीय तटरक्षक दल दिन दरवर्षी १ फेब्रु.रोजी साजरा करण्यात येत असतो.पालघर जिल्ह्यात तो डहाणू तालुक्यातील चिखले गावातील तटरक्षक दलाच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या सागरी क्षमतेसाठी ओळखले जाणारे,तटरक्षक दल भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.सागरी तटरक्षक दल म्हणजेच भारताच्या सागरी किनाऱ्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले लष्करी दल होय.या तटरक्षक दलाचे मुख्य कार्य म्हणजे सागरी किनाऱ्यावर अनधिकृत किंवा अनियमित हालचाली असे काही आढळले तर त्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करणे असे आहे. सागरी तटरक्षक दलाचे मुख्य कार्यालय हे नवी दिल्ली येथे आहे.याशिवाय या दलाचे चार…
संजय लांडगे,वाडा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री गडकरी यांच्या समवेत खा.सवरा यांची जिल्ह्याच्या विविध विकासकामांवर चर्चा, आज पालघरचे खा. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेच्या भिवंडी-वाडा रस्त्याशी थेट जोडणी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा झाली. त्याना देण्यात आलेल्या निवेदनात भिवंडी-वाडा हा,राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ असून,औद्योगिक,व्यापारी आणि शेतीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे अगदी जवळून जात असूनही त्यावर थेट प्रवेश उपलब्ध नाही.परिणामी,स्थानिक रहिवासी,शेतकरी,व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते,याकडे लक्ष वेधण्यात आले आहॆ. भिवंडी-वाडा मार्गाच्या केवळ ८ कि.मी.अंतरावरून एक्स्प्रेसवे जात असूनही थेट प्रवेशद्वार नाही.…
दीपक मोहिते, आयुष्याचं चांगभलं, मनाची शांतता कधी कधी नकोशी व्हावी,असं आपल्या आयुष्यात अनेकदा घडतं.मन शांत असलं की आयुष्याचं मुल्यमापन करण्यासाठी सवड मिळते.काही चांगल्या,काही वाईट,अशा अनेक आठवणींचं गाठोडं,आपल्यापाशी असतं.त्याची एक एक गाठ जस जशी सुटत जाते,तसा तसा ” जगण्याचा,” मांडलेला पसारा समोर अस्ताव्यस्त पसरत जातो. जे जगलो ते आयुष्य हे शिस्तबद्ध असणं किती गरजेचं होतं,याचा हळुवार उलगडा होत जातो.भावनिक, शारीरिक,आर्थिक आणि सामाजिक स्तरावरील संतुलनासाठी आपण काहीच केलं नाही,हे जाणवू लागतं.सारासार विचारांपासून फारकत घेत भावनेत ” वहावत,” जाणं,याला आपण अधिक प्राधान्य देत गेलो.हे आपल्या लक्षात येते,पण तेव्हा उशीर झालेला असतो आणि वेळ निघून गेलेली असते.भानावर येणे गरजेचं असतानाच आपण दुसऱ्या चुका करण्याच्या…
संजय नेवे,विक्रमगड विक्रमगड ते मनोर रस्त्यावरील खड्डे कधी बुजवणार ? विक्रमगड – मनोर हा राज्यमार्ग असून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.या प्रचंड वर्दळीच्या रस्त्याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम मंजूर झाले असतानाही ते का होत नाही असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.या रस्त्यावर अनेक छोटे-मोठे अपघात होत असून आजवर अनेक नागरिकांचा बळी गेला आहॆ.विक्रमगड पासून विक्रमगड,केव भोपोली,पाचमाड,बोराडा, कोसबाड,जव्हार फाटा,अशा अनेक गावाजवळ या रस्त्याची दुरावस्था झाली असून या भागातील लवकरात लवकर हे खड्डे बुजवण्यात यावे,अशी मागणी विक्रमगड तालुका मनसेचे योगेश पाटील यांनी केली आहे.खड्डे बुजवण्याचे काम मंजूर असतानाही लोकांनी हा त्रास का…
दीपक मोहिते, आंतरराष्ट्रीय घडामोडी, हट्टी व आक्रमक डोनाल्ड ट्रम्पमुळे ब्रिक्स देश चिंतेत, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर जे १०० निर्णय घेतले आहेत,त्या निर्णयामुळे जगभरातील देशाच्या छातीत धडकी भरली आहे.त्यांनी कशाची तमा न बाळगता ” आमच्या वाकड्यात शिरला तर अमेरिकेच्या बाजारात तुमची उत्पादने विकू देणार नाही,असा गर्भित इशारा दिला आहे.राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प,हे एक आक्रमक माथेफिरू जागतिक नेते म्हणून ओळखले जातात.त्यांच्या या अशा आक्रमक स्वभावामुळे जगातील अनेक देश सध्या भितीच्या सावटाखाली आले आहेत. गेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन उमेदवार ज्यो बायडेन यांच्याकडून पराभूत झाले होते.या पराभवाचे शल्य ट्रम्प यांना कायम टोचत राहिले होते.आपला पराभव हा निवडणुकीतील गैरप्रकारामुळे…
