दीपक मोहिते,
आंतरराष्ट्रीय घडामोडी,
हट्टी व आक्रमक डोनाल्ड ट्रम्पमुळे ब्रिक्स देश चिंतेत,
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर जे १०० निर्णय घेतले आहेत,त्या निर्णयामुळे जगभरातील देशाच्या छातीत धडकी भरली आहे.त्यांनी कशाची तमा न बाळगता ” आमच्या वाकड्यात शिरला तर अमेरिकेच्या बाजारात तुमची उत्पादने विकू देणार नाही,असा गर्भित इशारा दिला आहे.राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प,हे एक आक्रमक माथेफिरू जागतिक नेते म्हणून ओळखले जातात.त्यांच्या या अशा आक्रमक स्वभावामुळे जगातील अनेक देश सध्या भितीच्या सावटाखाली आले आहेत.
गेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन उमेदवार ज्यो बायडेन यांच्याकडून पराभूत झाले होते.या पराभवाचे शल्य ट्रम्प यांना कायम टोचत राहिले होते.आपला पराभव हा निवडणुकीतील गैरप्रकारामुळे झाल्याचे त्यांचे म्हणणे होते.त्यामुळे त्यांनी आपल्या समर्थकासह राष्ट्रपतींच्या प्रसादावर हल्ला चढवला होता.या प्रकरणी त्यांच्यावर अमेरिकन सरकारने महाभियोग चालवला होता.पण हट्टी व आक्रमक स्वभावाच्या ट्रम्प यांनी या संकटाला यशस्वीपणे तोंड दिले व पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवली.दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या कमला हॅरिस यांचा पराभव केला.अमेरिकन लोकशाही व्यवस्थेमध्ये केवळ दोनदाच राष्ट्राध्यक्ष होते.पण ट्रम्प यांचा दुसऱ्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्यांची दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी हुकली होती.यंदा झालेल्या निवडणुकीत त्यांनी अमेरीकेच्या उपाध्यक्ष असलेल्या कमला हॅरिस यांना अस्मान दाखवले.अशा या डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी गेल्या महिन्यात पार पडला.राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच समाज माध्यमावर त्यांनी एक पोस्ट व्हायरल केली.या पोस्टमध्ये त्यांनी ब्रिक्स ( ब्राझील,रशिया,इंडिया,
चायना,साऊथ आफ्रिका ) संघटनेतील देशांना थेट धमकी दिली.” ब्रिक्स देश अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देऊ पाहताहेत,माजी राष्ट्राध्यक्ष बायडेन प्रशासनाने त्यांच्या या प्रयत्नाकडे दुर्लक्ष केले.मात्र माझ्या काळात ते खपवून घेतले जाणार नाही.अशा शब्दात त्यांनी उभय देशांना कानपिचक्या दिल्या.ब्रिक्सने आमच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी नवीन चलन तयार करू नये.आमची ही अट मान्य न करणाऱ्या ब्रिक्स देशांवर १०० % कर लावण्यात येईल.जे देश आमची ही अट मान्य करणार नाही,त्या देशाला अमेरिकन बाजाराचे दरवाजे कायमचे बंद होतील,त्यांनी मग त्यांच्या उत्पादनासाठी नवं मार्केट शोधावे,असा इशारा दिला आहे.डोनाल्ड ट्रम्प हे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले मित्र मानतात,पण व्यापार व अमेरिकेची अस्मिता,या दोन मुद्यावर ते भारतावरही तोंडसुख घेतात.ट्रम्प यांच्या या अशा ताठर भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रिक्सचे नवीन चलन डॉलरची जागा घेईल,अशी कोणतीही शक्यता नाही.तसा प्रयत्न झाल्यास आपल्याला अमेरिकेसोबत असलेला व्यापार गुंडाळावा लागेल,अशी भिती या देशांना वाटू लागली आहे.
गेल्या वर्षी रशियाच्या कझान शहरात ब्रिक्स देशाची बैठक झाली होती.या बैठकीत नवीन चलन निर्माण करण्यासंदर्भात मात्र कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत.आता ट्रम्प यांच्या धमकीनंतर रशिया व चीन वगळता अन्य सदस्य देश अशा निर्णयाला पाठिंबा देतील,असे वाटत नाही.ट्रम्प जे बोलतात,त्याची ते त्वरेने अंमलबजावणी करतात,असा अनुभव असल्यामुळे नवीन चलन आणण्याची प्रक्रिया स्थगित होण्याची शक्यता आहे.इस्त्रायल-हमास युद्धात ज्यो बायडेन यांनी जाता जाता युद्धविराम,शस्त्रसंधी व युद्धबंदीची अदलाबदल,करण्यासाठी पुढाकार घेतला,पण त्यांच्या या प्रयत्नात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानेहू यांनी खो घातला होता.पण ट्रम्प यांनी सूत्रे हाती घेताच त्यांना थेट धमकी दिली,जर तुम्ही कराराला मान्यता दिली नाही,तर तुमचा शस्त्रपुरवठा व आर्थिक निधी रोखून धरू व तुमची बँक खाती गोठवू.त्यामुळे नेतान्येहू यांचे विमान क्षणाधार्थ जमिनीवर आले.
अशा या ट्रम्प यांनी उर्वरित जे हे काही निर्णय घेतले आहेत,ते देखील अमेरिकेचे सार्वभौमत्व व अखंडता अबाधित ठेवणारे असे आहेत.

