संजय लांडगे,वाडा
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री गडकरी यांच्या समवेत खा.सवरा यांची जिल्ह्याच्या विविध विकासकामांवर चर्चा,
आज पालघरचे खा. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेच्या भिवंडी-वाडा रस्त्याशी थेट जोडणी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा झाली.
त्याना देण्यात आलेल्या निवेदनात भिवंडी-वाडा हा,राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ असून,औद्योगिक,व्यापारी आणि शेतीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे अगदी जवळून जात असूनही त्यावर थेट प्रवेश उपलब्ध नाही.परिणामी,स्थानिक रहिवासी,शेतकरी,व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते,याकडे लक्ष वेधण्यात आले आहॆ.
भिवंडी-वाडा मार्गाच्या केवळ ८ कि.मी.अंतरावरून एक्स्प्रेसवे जात असूनही थेट प्रवेशद्वार नाही.
स्थानिक नागरिक व व्यवसायिकांना वळसा घालून पर्यायी मार्ग वापरावा लागत आहे,त्यामुळे वेळ आणि इंधनाचा मोठा अपव्यय होत आहॆ.
भिवंडी शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असून प्रवासाचा वेळ आणि नागरिकांना पदरमोड करावी लागत आहॆ.या गैरप्रकारामुळे
औद्योगिक विकासाच्या संधी मर्यादित होत असून अनेक कंपन्या आता अन्यत्र्य स्थलांतरीत होऊ लागल्या आहेत.
त्यासाठी भिवंडी-वाडा मार्गावर,लामज गावाजवळून दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर थेट प्रवेश उपलब्ध करून द्यावा.
रस्ता दुरुस्ती,रुंदीकरण आणि नवीन इंटरचेंज बांधावे, जेणेकरून वाहतूक गतीमान होईल.
व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल व स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल.
५,००० हून अधिक नवीन नोकऱ्या निर्माण होतील, ज्याचा थेट फायदा स्थानिक तरुण आणि कामगारांना होईल.
शेतीमाल वाहतूक जलद होऊन शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळेल.
भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीत लक्षणीय घट होऊन नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात सुलभता येईल.
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे हा देशाच्या दळणवळण आणि औद्योगिक प्रगतीसाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. भिवंडी-वाडा मार्गावर थेट प्रवेशद्वार निर्माण झाल्यास संपूर्ण परिसर वेगाने विकसित होईल आणि स्थानिक नागरिक,व्यापारी तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीला मोठी चालना मिळेल.
यासंदर्भात योग्य ती कार्यवाही व्हावी,अशी विनंती करण्यात आली आहॆ.यावेळी विविध भागातील मान्यवर डॉ.सवरा सोबत होते.

