संजय नेवे,विक्रमगड
विक्रमगड ते मनोर रस्त्यावरील खड्डे कधी बुजवणार ?
विक्रमगड – मनोर हा राज्यमार्ग असून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.या प्रचंड वर्दळीच्या रस्त्याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम मंजूर झाले असतानाही ते का होत नाही असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.या रस्त्यावर अनेक छोटे-मोठे अपघात होत असून आजवर अनेक नागरिकांचा बळी गेला आहॆ.विक्रमगड पासून विक्रमगड,केव भोपोली,पाचमाड,बोराडा,
कोसबाड,जव्हार फाटा,अशा अनेक गावाजवळ या रस्त्याची दुरावस्था झाली असून या भागातील लवकरात लवकर हे खड्डे बुजवण्यात यावे,अशी मागणी विक्रमगड तालुका मनसेचे योगेश पाटील यांनी केली आहे.खड्डे बुजवण्याचे काम मंजूर असतानाही लोकांनी हा त्रास का सहन करावा, दोन दिवसात हे खड्डे बुजवण्याचे काम सुरू न झाल्यास मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहॆ.

