दीपक मोहिते,
” सामाजिक भान, ”
वाचन व संवाद खुंटता कामा नयेत,
वाचन व संवाद,या दोन्ही गोष्टी तुमच्या – आमच्या आयुष्यावर कळत नकळत प्रभाव टाकत असतात.या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी घनिष्ट सबंध असतो.वाचनामुळे अनेक पिढ्यांना मूल्यशिक्षणाचे धडे मिळू शकले.तर संवाद हा पालक आणि मुलांमधला महत्वाचा दुवा आहे.माणसा माणसातील संवादाला पर्याय नाही.पण दुर्देवाने हल्लीच्या काळात वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे.तर एकमेकांशी असलेला संवाद देखील खुंटत चालला आहे.त्याचा परिणाम समाजावर होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.वाचनामुळे विज्ञान,तत्त्वज्ञान,
मूल्यशिक्षण व राजकारण,या महत्वाच्या विषयाची आपल्याला ओळख होत असते.त्यामुळे वाचन व संवाद या दोन्ही संस्कृती टिकून राहणे,गरजेचे आहे.या दोन्ही संस्कृती जेंव्हा थांबतील,त्यावेळी मानवाला जगणंही कठीण होणार आहे.संवाद तुटत चालल्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्यही बिघडत चालले आहे.पालकांचा आपल्या मुलांशी संवाद खुंटत गेल्यामुळे समाजाच्या प्रगतीचा वेग मंदावत चालला आहॆ.अनेक अनिष्ट प्रथा रुजू लागल्या आहेत.त्यांची उत्तम उदाहरणे म्हणजे जागोजागी पाहायला मिळणारी वृद्धाश्रमे होय ….

