Author: दीपक मोहिते

सुशील भोईर,वसई, वसई येथे “आयुष्यमान भारत आरोग्यमंदीर,” चे लोकार्पण, प्बोईसरचे माजी आ.राजेश पाटील यांच्या हस्ते फादरवाडी,गोखिवरे येथे “आयुष्यमान भारत आरोग्यमंदीर” या अत्याधुनिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रयत्नांतून साकारलेल्या या आरोग्यमंदीराने स्थानिक नागरिकांसाठी उत्कृष्ट आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर कार्यक्रमास आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, नर्सेस,वॉर्डबॉय,आशा सेविका तसेच स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत उभारलेल्या या आरोग्यमंदीरामुळे स्थानिक नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी राजेश पाटील आपल्या भाषणात म्हणाले , हे आरोग्यमंदीर स्थानिकांसाठी आधार ठरणार आहॆ. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.चव्हाण,डॉ.धनंजय आणि सर्व उपस्थित अधिकारी…

Read More

अनंत भोईर,पालघर, जिल्हा परिषद पालघर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, जिल्हा परिषद पालघर,येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,उपाध्यक्ष पंकज कोरे,समाजकल्याण समिती सभापती मनीषा निमकर,कृषी व पशुसंवर्धन सभापती संदीप पावडे, बांधकाम व आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे, जि.प.सदस्य सारिका निकम, आशा चव्हाण,नीलिमा भोवर, शीतल धोडी,लतिका बालसी,भावना विचारे,पूर्णिमा धोडी,जयेंद्र दुबळा,कृष्णा माळी,हबीब शेख,प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रूपाली सातपुते,सर्व विभाग प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच सर्व अधिकारी आणि पदाधिकारी…

Read More

शुभम सावंत,विरार विरार येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा, ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित ध्वजारोहण समारोह कार्यक्रमात वसई विधानसभा मतदारसंघाच्या आ.स्नेहा दुबे पंडित या सहभागी झाल्या होत्या.या कार्यक्रमात वसई विरार महानगरपालिका आयुक्त अनिल पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी विधानसभा मतदारसंघाचे आ.राजन नाईक वसई विरार महानगरपालिका आयुक्त अनिल पवार व इतर विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी,पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माहिती अधिकार अर्ज स्विकृती विभाग,दिव्यांग कल्याण विभाग,आवक जावक टपाल विभाग,या विभागांचे उदघाटन करण्यात आले.या विभागामुळे नागरिकांना सुलभ सेवा मिळणार आहेत.आजचा हा कार्यक्रम देशाची अस्मिता आणि एकतेचे प्रतीक ठरला आहॆ.देशाचे स्वातंत्र्य,अखंडता आणि…

Read More

दीपक मोहीते, ” न्यूजलाईन, ” हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या मिश्किलपणामध्ये खंत दडली आहे.. गरिबाला गरीब जिल्हा का दिला ? असा सवाल उपस्थित करून हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी आपल्या मनातील खदखदीला मोकळी वाट करून दिली आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे पालकमंत्री पदावरून मंत्र्यांमध्ये हाणामाऱ्या का होत आहेत,याचा उलगडा झाला आहे.मलईदार जिल्हा मिळाला नाही की पालकमंत्री नाराज होत असतात,हे पुन्हा झिरवळ यांच्या या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले आहे. चार दिवसापुर्वी आम्ही पालकमंत्रीपद हे जिल्ह्याच्या आर्थिक लुटीसाठी किती महत्वाचे असते,यावर आपल्या लेखातून प्रकाशझोत टाकला होता.त्यावर नरहरी झिरवळ यांनी एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे.ज्या हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.तो जिल्हा आर्थिकदृष्ट्या मागासलेलाच आहे.मुं…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” ” इमर्जन्सी चित्रपट,” ; हल्लीच्या काळातला सुमार चित्रपट, माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांना बदनाम करणे व पक्षातील वरिष्ठ नेत्यांची खुशामत करणे,असे दोन उद्देश डोळ्यासमोर ठेवून अभिनेत्री कंगना राणावत यांच्या ” इमर्जन्सी,” या बहुचर्चित सिनेमाला प्रेक्षकांनी कचऱ्याचा डबा दाखवला आहे.हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला असून त्या काळात घडलेल्या सत्य घटनांना दाबून टाकणारे कथानक प्रेक्षकांच्या मनाला रुचले नाही.त्यामुळे पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा चांगलाच कोसळला.वास्तवाशी फारकत घेतलेला हा चित्रपट प्रेक्षकाच्या मनाला बिलकुल भावला नाही. महानायिका स्व.इंदिराजी गांधी याना खलनायिका दाखवण्यासाठी निर्मातीने कसे जाणीवपूर्वक प्रयत्न केले,ते या चित्रपटात पाहायला मिळते.खरा इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न या चित्रपटात केल्याचे दिसून आले…

Read More

नवीन पाटील,सफाळे, रस्ता सुरक्षा अभियानातून वाहनचालकांमध्ये जनजागृती, वाहनचालकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने लार्सन अँड टुब्रो लिमिटेड ( एसटीपी-१७ ) प्रकल्प आणि पश्चिम डेडिकेटेड फ्रेंट कॅरिडोर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. काल पालघर तालुक्यातील सफाळे बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर रस्ता सुरक्षा अभियान २०२५ च्या माध्यमातून वाहनचालकांमध्ये विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली. या अभियानातून दुचाकीस्वारांनी सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर करावा, तसेच दुचाकी व चारचाकी वाहनचालकांनी वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा,सुरक्षात्मक बेल्टचा वापर करावा.अपघाताचा धोका टाळण्यासाठी वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा. वाहतूक कोंडी होऊ नये,यासाठी आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे.नागरिकांनी रहदारीच्या रस्त्यांवरून चालताना विशेष काळजी घ्यावी.वाहन…

Read More

शुभम सावंत,विरार, उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात ” वंदे मातरम,” चे समूहगायन भारतमातेला वंदन करणारे राष्ट्रीय गीत ” वंदेमातरम, ” १५० वर्षांपूर्वी कार्तिक शुद्ध नवमीला लिहिले गेले.ही तिथी कुष्माण्डा नवमी,या नावेही ओळखली जाते.या तिथीला देवीने जसा कुष्मांडा नावाच्या राक्षसाचा वध केला आणि देवतांना अभय दिले, त्याचप्रमाणे आपली भारत भूमी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाली.म्हणून तत्कालीन प्रख्यात कादंबरीकार आणि कवी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे राष्ट्रीय गीत लिहिले. बालपणापासून आपण त्याचे एकच कडवं म्हणत आलो आहोत.मात्र चॅटर्जी यांनी त्याच काव्यात मातृभूमीच्या स्तुतीपर आणखी चार कडवी लिहिली आहेत.त्या शब्दांचा परिचय करून घेण्यासाठी सामूहिक गीत गायन करून मातृभूमीला वंदन करण्याचा विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित…

Read More

संजय लांडगे,वाडा, श्रमजीवी संघटनेतर्फे वाडा पंचायत समितीवर हिशोब आंदोलन, श्रमजीवी संघटनेने वाडा पंचायत समितीवर जलजीवन मिशन योजनेचे पाणी ३१ मार्च २०२४ रोजी प्रत्येकाच्या घरात नळाने पाणी पोहोचणे आवश्यक होते.मात्र एप्रिल २०२४ च्या आंदोलनात लेखी आश्वासने देऊनही अजूनही पोहचले नाही म्हणून हंडे – कळशी घेऊन शेकडो महिला हिशोब आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आबिटघर व १७ गावे यांसाठी कामे प्रगती पथावर असलेल्या योजनेचा प्रत्यक्ष लोकांनी हिशोब घेतला. स्वतः ठेकेदार,भोईर उपभियंता जीवन प्राधिकरण उपविभाग विरार उपस्थित होते.मात्र जलजीवन मिशन योजनेचे तालुक्यातील सर्व योजनेचे ठेकेदार अनुपस्थित राहिल्यामुळे चर्चा कोणाशी करायची असा प्रश्न निर्माण झाला होता.जोपर्यंत चर्चे करिता कार्यकारी अभियंता, उपभियंता,कनिष्ठ…

Read More

दीपक मोहीते, कोकण रेल्वे वय वर्षे २७, आज आपली कोकण रेल्वे २७ वर्षाची झाली.पहिली पॅसेंजर ट्रेन आजच्या दिवशी कोकण परिसरातील सर्व किनारपट्टीला स्पर्श करत धावली. सुट्टीमध्ये किंवा सणवारी जर कोकणातल्या मामाच्या घरी जायचं असेल तर आधी बाय रोड जाण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता.बाय रोड जायचं म्हटलं तर रस्ता कठीण आणि वेळ सुद्धा खूप लागायचा. अशा वेळी कोकणातील सर्वांना असे वाटायचे की,आपल्या कोकणाक कधी यायची ही आगगाडी ? १९९३ सालापर्यंत मुंबई ते मंगलोर,कोकण गोवा व कर्नाटक,केरळच्या तसेच दक्षिण भारतातील किनाऱ्यावरच्या गावांसाठी थेट रेल्वेची सोय नव्हती. अखेर आठ वर्षांच्या भगीरथ प्रयत्नांनंतर प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जाने.१९९८ साली पहिली गाडी धावली. कोकण रेल्वे सुरु…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” दुसऱ्यावर टीका करणे,फार सोपे असते… सत्तेच्या बाहेर असताना आपण सत्ताधाऱ्यांवर वारेमाप टीका करू शकतो,पण सत्तेत आल्यानंतर जनतेच्या समस्या व प्रश्न सोडवणे,किती कठीण असते.याचा प्रत्यय वसई तालुक्यातील नवनिर्वाचित आमदार व खासदारांना पावलोपावली घ्यावा लागत आहे.एखाद्यावर टीका करणे फार सोपे असते.” उचलली जीभ लावली टाळ्याला,” असा हा प्रकार असतो.प्रत्यक्षात काम करताना मार्गातील खाचखळग्यात पडून किती रक्तबंबाळ व्हावे लागते,याचा पुरेपूर अनुभव सध्या वसई तालुक्यातील लोकप्रतिनिधींना घ्यावा लागत आहे. वसई तालुक्यातील नालासोपारा शहरातील विजयालक्ष्मी नगर येथील ४१ इमारतीवर सध्या महानगरपालिकेतर्फे तोडक कारवाई सुरू आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी या ४१ इमारती निष्कासित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने जारी केले होते.पण ही कारवाई झाल्यास त्याचा…

Read More