संजय नेवे,विक्रमगड
तलवाडा विक्रमगड मार्गावर मालवाहु ट्रकचा भिषण अपघात, वाहनचालकाचा मृत्यू,
विकमगड…तलवाडा-सेलवाल येथिल कंपनीतुन लोखंडी ब्लेड घेवुन मालहु ट्रक वाडा येथील कंपनीत जात असतांना तलवाडा-विक्रमगड मार्गावरील दादडे गावानजीक ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक वळणावर असलेल्या रस्त्यांच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडाला धडकला.या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे ट्रकचालक बिपीन राधेश्याम राय रा.खानवेल याला उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यु झाला.
हा अपघात वइतका भिषण होता की ट्रकच्या केबीनचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे.त्यामुळे वाहनांचा फिटनेस तसेच जुन्या झालेल्या ट्रकचा आरटीओ विभागाकडुन तपासला जातोय की नाही,असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

