संजय लांडगे,वाडा
सेवानिवृत्त ग्रामविस्तार अधिकारी गजानन काशिद यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
सामाजिक कार्यकर्ते संजय काशिद यांचे वडील,वाडा पंचायत समितीचे निवृत्त विस्तार अधिकारी गजानन काशिद यांचे त्यांच्या राहत्या घरी आंबिस्ते ( खुर्द ) येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
दोन दिवसापूर्वी वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांनी पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यात ग्रामविस्तार अधिकारी म्हणून काम केले आहे.
ते अत्यंत शांत,संयमी,प्रेमळ, मितभाषी,अजातशत्रू, मनमिळावू व संवेदनशील व्यक्तिमत्व होते.त्यांच्या पश्चात शोकाकुल पत्नी कमळ काशिद,मुलगा संजय काशिद, मुलगी भारती जाधव,मुलगा राजू काशिद,मुलगा कुंदन काशिद,सुना,जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अंत्यविधीला ठाणे व पालघर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते, शासकीय अधिकारी,कर्मचारी, नागरिक,असा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
पुण्यनुमोदन आणि शोकसभा कार्यक्रम रवि.२ मार्च रोजी वाडा तालुक्यातील त्यांच्या राहत्या घरी अंबिस्ते खुर्द येथे सकाळी १० वाजता संपन्न होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले.

