दीपक मोहिते,
रिसॉर्ट्स नियामानुकूल करण्यात यावीत,
पालघर जिल्ह्यातील पश्चिम पट्टय़ातील समुद्रकिनारी असलेल्या रिसॉर्टस आणि हॉटेल मालकांच्या मागे नेहमी खंबीरपणे उभ्या राहणार्या दहिसर विधानसभेच्या आ. मनिषा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य रामदास मेहेर यांनी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांना पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारी असलेली सर्व रिसॉर्ट,हॉटेल,कॅफे आणि लॉज यांना नियमाकूल करण्यासाठी निवेदन दिले.याप्रसंगी पालघर जिल्ह्यातील सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.
या निवेदनात स्थानिकांना रोजगार मिळवून देणाऱ्या या व्यवसायावर अधून मधून कारवाया करण्यात येत असतात.येथील व्यवसायिक सतत भितीच्या सावटाखाली असतात,त्यामुळे ही सर्व रिसॉर्ट्स,कॅफे व हॉटेल्स नियमानुकूल करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.सदर प्रसंगी पालघर जिल्ह्याचे खा.डॉ.हेमंत सावरा,नालासोपारा विधानसभेचे आ.राजन नाईक,वसई विधानसभेच्या आ.स्नेहा दुबे पंडीत आणि वसई विरार जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

