Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपची किमया ; कालचे शत्रू,आज जिवलग मित्र, राजकरणात कोणी,कधी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो,या वाक्याचा सध्या वसई तालुक्यात पावलोपावली अनुभव येत आहे.गेली दिन दशके हितेंद्र ठाकूर यांना पराभूत करण्यासाठी एकेकाळी ज्या साऱ्या राजकीय पक्षांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते,त्या पक्षाचे नेते आज हितेंद्र ठाकूर यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले पाहायला मिळतात.हा नियतीने उगवलेला एकप्रकारचा सूडच म्हणावा लागेल.ठाकुर यांचा ” दहशतवाद व टँकर लॉबी,” या दोन शब्दाचा आधार घेत कायम रान उठवणारे विरोधी पक्ष आज आपले अस्तित्व टिकून राहावे,यासाठी जिवाच्या आकांताने धडपडत आहेत.ही सारी किमया भाजपच्या झंझावातामुळे शक्य झाली आहे. भाजपच्या भितीमुळे राजकीय पक्षांना आपली ध्येये व…

Read More

दीपक मोहिते, असंघटित कामगार आणखी कीती वर्षे उपेक्षित जीवन जगणार ? जगभरातील अनेक देशात कामगार क्षेत्र,हे संघटित व असंघटित,अशा दोन भागात विभागले आहे.आपल्या देशात असंघटित कामगाराची संख्या ही संघटीत कामगारापेक्षा अनेक पटीने जास्त आहे.संघटित क्षेत्र म्हणजे ज्या क्षेत्रात रोजगाराच्या अटी,शर्ती मान्य केल्या आहेत,कामाची हमी दिली जाते.मासिक वेतन,बोनस,भविष्य निर्वाह निधी,इ.कायदे लागू केले जातात,ते क्षेत्र संघटित क्षेत्र म्हणून ओळखले जाते.तर असंघटित क्षेत्र,हे ज्याची सरकार दरबारी नोंद नाही,रोजगाराची हमी मिळत नाही,सरकारी कायदे व नियम लागू होत नाहीत व कामाच्या वेळा ठरलेल्या नसतात,ते क्षेत्र म्हणजे असंघटित क्षेत्र होय. अशा या असंघटित क्षेत्रात आजमितीस कोट्यवधी कामगार,आपले हलाखीचे जीवन जगताहेत. अशा या असंघटित क्षेत्रात,नाका कामगार,घरेलू कामगार,ऊसतोड…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मतदानाच्या अगोदरची रात्र ; ” नजर हटी,तो सबकुछ फटी,” येत्या २३ डिसें.पासून नामनिर्देशनपत्रे सादर करण्यास सुरुवात होणार आहे.ही प्रक्रिया तब्बल आठ दिवस म्हणजे ३० डिसें.पर्यंत चालणार आहे.पुढच्या वर्षी म्हणजेच २ जाने.२०२६ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेस लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.राजकीय पक्षाच्या हाती अद्याप पंधरा दिवस आहेत.या पंधरा दिवसात जागावाटप,उमेदवारी निश्चित करणे,उमेदवारी अर्ज दाखल करणे, प्रचाराची दिशा ठरवणे व त्यानंतर निवडणुकीसाठी लागणारी यंत्रणा उभारणे,अशी कामे हातावेगळी करणे,अशा अनेक आव्हानांना राजकीय पक्षांना सामोरे जावे लागणार आहे.निवडणुकीच्या काळातील हे सारे सोपस्कार वर्षानुवर्षे अंगवळणी पडले असल्यामुळे राजकीय पक्षांना ही प्रक्रिया राबवताना कोणत्याही अडचणी येत नाहीत. या सर्व प्रक्रियेत…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आघाडी होण्याऐवजी बिघाडीचीच शक्यता अधिक, एकेकाळचे कट्टर शत्रू आता भाजपच्या भितीमुळे गळ्यात गळा घालून हिंडू लागले आहेत.मात्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपल्या गळ्यात हे ” नको ते घोंगडे,” अडकवून घ्यायला तयार नाही.मागचा इतिहास लक्षात घेऊन काँग्रेसचे नेते या नव्या महाविकास आघाडीपासून लांब राहण्याच्या मानसिकतेत आले आहे.शरद पवार गटाचे शहरी भागात अस्तित्व नगण्य असल्यामुळे त्यांना फारसे कोणी गृहीत धरत नाही. ९० च्या दशकात माजी आ.ठाकूर यांना काँग्रेस पक्षातून निलंबित केल्यानंतर ठाकूर यांनी जुन्या काँग्रेसजनांना हाताशी धरून वसई तालुक्यात आपली वेगळी चूल मांडली.ठाकूर यांनी त्यावेळी केलेल्या खेळीने काँग्रेस पक्षाचा अक्षरशः पालापाचोळा झाला.त्यातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आजही तालुक्यात स्वतःला सावरू…

Read More

दीपक मोहीते, ” हल्लाबोल, ” नॅशनल डेस्क – दिल्ली, मुंबई मनपा निवडणूक ; भाजप – १२५ तर शिंदे गट – ५२, मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी निवडणूक होत असून महायुतीत भाजपची ताकद शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा अधिक आहे.ही निवडणूक आपण एकत्रित व एकदिलाने लढवू असा प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला होता.त्यानुसार दोन्ही पक्षाकडून जागावाटपासंदर्भात काल मुंबईत पहिली बैठक पार पडली.या बैठकीत भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५२ जागांचा प्रस्ताव दिला आहे.त्यामुळे शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपने काही दिवसांपूर्वी थेट आकडेवारी मांडत राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची घोषणा केली होती.मुंबईसह अनेक शहरात एकनाथ शिंदे यांची शिवसेना…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” नॅशनल डेस्क,दिल्लीसाठी, ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी फुटण्याची शक्यता… महायुतीमधील भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपल्यातील मतभेदाना मूठमाती देत स्था.स्व.संस्थांच्या आगामी निवडणुकीत एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.यामागे शिवसेनेच्या ( उबाठा ) आर्थिक नाड्या आवळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.आजच्या घडीला उद्धव ठाकरे हे या दोघांच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याचा बुरखा सातत्याने फाडत आहेत.त्यामुळे या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष सध्या इरेला पेटले आहेत.प.महाराष्ट्र वगळता इतर प्रांतात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फारसे प्राबल्य नसल्यामुळे या गटाला त्यांनी या निवडणुकीत सोबत घेतलेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ( उबाठा ) मुसक्या बांधल्या की भविष्यात आपली…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” लवकरच नवीन गिधाडे भिरभीरू लागणार… अखेर,काल वसई विरारकरांच्या जीवनात उशीरा का होईना,उष:कालाची चिन्हे दिसू लागली.तब्बल दहा वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर या उपविभागातील जनतेच्या हालअपेष्टा संपल्या,असं म्हणता येणार नाही,पण थोड्याफार कमी झाल्या,असं म्हणता येईल.वसई विरार महानगरपालिकेतील अधिकारी,नगरसेवक, कर्मचारी व ठेकेदारांनी गेल्या दहा वर्षात महानगरपालिकेची तिजोरी घुवून पुसून साफ केली.त्यामुळे या संपूर्ण क्षेत्राची अवस्था अश्मयुगातील एका पडक्या गावासारखी झाली.तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार,नगररचना विभागाचे उपसंचालक वाय.एस.रेड्डी व प्रभारी सहा.आयुक्त गिलसन गोंसालवीस व अन्य लोकांनी तर या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या शिखरावर नेऊन ठेवले.ही जी महानगरपालिका स्थापन झाली,ती केवळ लुटीसाठीच,असा गोड गैरसमज येथील राजकारणी,मंत्रालयातून प्रतिनियुक्तीवर आलेले भ्रष्ट अधिकारी,आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी व गिधाडांच्या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मनपा ; निवडणुकानंतरही परिस्थिती बदलणार नाही… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारू सतत हेलकावे खात आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या निवडणुका ३१ जाने.च्या अगोदर घेणे क्रमप्राप्त आहे.त्यामुळे निवडणूक यंत्रणा सध्या जोमाने कामाला लागली आहे.गेल्या दोन महिन्यात निवडणूक आयोगाने निवडणुकीचे अनेक सोपस्कार पूर्ण करत आणले आहेत.आता या निवडणुका लवकरच पार पडतील,अशी मतदारांची अपेक्षा असली तरी दुसरीकडे राजकीय पक्षांच्या मनात याविषयी धाकधूक असल्याचे पाहायला मिळत आहे.ऐनवेळी काहीतरी खुसपट काढून पुन्हा न्यायालयात जाणाऱ्या याचिकाकर्त्यांची या राज्यात कमतरता नाही,हे आपण विसरता कामा नये. वास्तविक,तसं होता कामा नये,अशी मतदारांची अपेक्षा आहे.२०२० पासून तब्बल पाच वर्षे शहरी व ग्रामीण भागाचे प्रशासकीय कामकाज नोकरशाहीच्या हातात…

Read More

दीपक मोहिते, ग्रामीण शिक्षणाच्या आयचा घो, काल अधिवेशनात राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील रिक्त जागांचा मुद्दा चांगलाच गाजला.काँग्रेसचे आ. विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारचे शिक्षण विभागाकडे लक्ष नसल्याचा थेट आरोप केला.अपुरा शिक्षकवर्ग,विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमध्ये सतत होणारी घसरण व शाळा बंद पडण्याचे वाढते प्रमाण,लक्षात घेता राज्य सरकारचे ग्रामीण भागातील शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा जो आरोप सातत्याने सरकार होत असतो,तो वस्तुस्थितीला धरून आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने राज्यातील ६०० जि.प.शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या ६ डिसें.पासून या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.महत्प्रयासाने गेल्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला खरा,पण मराठी माध्यमाच्या शाळांना बळ देण्याऐवजी राज्य सरकार त्या बंद करण्यासंदर्भात…

Read More

दीपक मोहिते, ” शहाणपण,” भाजपने स्वबळाचा हट्ट अखेर सोडला… भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) महायुतीमधील या दोन्ही पक्षानी स्थानिक स्वराज्य समित्यांच्या आगामी निवडणुका युतीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पक्षात उफाळलेल्या अंतर्गत मतभेदाचे पडसाद या निवडणुकीत उमटतील,असे संकेत मिळाल्यानंतर या दोन्ही पक्षांना सुचलेले हे शहाणपण आहे.दुसरीकडे महाविकास आघाडी देखील या निवडणुका एकत्रितपणे लढवणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शिंदे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे काल मुंबईत एकमेकांना भेटले व त्यांनी याविषयी प्रदीर्घ चर्चा केली. त्यांच्या या निर्णयामुळे या निवडणुकांमध्ये विरोधकांना जो मतविभागणीचा फायदा होणार होता,आता तो होण्याची शक्यता नाही. गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गट…

Read More