दीपक मोहिते,
ठाणे शिवसेनेचे ( उबाठा गट ) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांचा गोळीबारात मृत्यू,
दोन संशयीत पोलिसांच्या ताब्यात,
ठाणे घोडबंदर परिसरात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात प्रदीप पूर्णेकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्रदीप पूर्णेकर यांच्यावर दोन राऊंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. या हल्ल्यात पूर्णेकर गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत व या हल्ल्यामागे कोण आहेत,याचा तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
ठाणे पश्चिमेस घोडबंदर रोड परिसरात गोळीबाराची ही घटना घडली. या हल्ल्यानंतर घोडबंदर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गोळीबार नेमका कोणत्या ठिकाणी झाला याचा तपशील पोलिसांकडून तपासण्यात येत आहे.
या घटनेत प्रदीप पूर्णेकर यांना गंभीर दुखापत झाली. गोळी लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाली व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या हल्ल्यात हल्लेखोरांनी कोणत्या शस्त्राचा वापर केला, गोळीबार किती अंतरावरून करण्यात आला आणि हल्ल्यानंतर आरोपी कोणत्या दिशेने पसार झाले, याबाबतची माहिती पोलिसाकडून गोळा करण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर पुरावे यावर पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा ठरवल्याचे सांगण्यात येत आहे.
मृत प्रदीप पूर्णेकर हे ठाकरे गटाचे विभागप्रमुख असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेला राजकीय पार्श्वभूमी आहे का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे. हल्ल्याचे नेमके कारण, वैयक्तिक वाद, आर्थिक व्यवहार किंवा अन्य कोणता कारणात्मक संबंध आहे का, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
या घटनेत एकूण ५ हल्लेखोर होते, त्यापैकी पोलिसांनी दोन संशयिताना ताब्यात घेतले आहे.

