- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, भितीचे सावट, मोदी व शहा यांचे राज्याचे दौरे ; पराभवाच्या भितीतुन, महाविकास आघाडीला राज्यात मिळणारा प्रतिसाद व शरद पवार यांची रणनिती,लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.या महिन्यात गृहमंत्री तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.आज मुंबईत दाखल झाल्यानंतर शहा हे आमदार,पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत.भाजप व अजित पवार गटातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे या दोन्ही घटक पक्षात चिंतेचे वातावरण पसरले आहे.अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व एकेकाळी शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले दिलीप वळसे पाटीलही आता शरद पवार गटाच्या मार्गावर असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नितीन गडकरी यांनी सरकारची पोल खोलली, काल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात राज्याची आर्थिक स्थिती किती डबघाईला आली आहे,याचे विदारक चित्र राज्यासमोर आणले आहे.” लाडकी बहीण योजनेलाही पैसे द्यावे लागतात,” हे त्यांच्या भाषणातील एक वाक्य खूप काही सांगून गेले.त्यांनी आपल्या या वाक्यातून गुंतवणूकदारांना सरकारच्या भरवशांवर राहू नका,असा सल्ला दिल्यामुळे भविष्यात या सरकारने आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे,यांची कल्पना येते. ते एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना पुढे म्हणाले,”अनुदानाच्या पैशांची आता शाश्वती उरलेली नाही,कारण लाडकी बहीण योजना…”, या त्यांच्या एका वाक्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आयोजित…
दीपक मोहिते, कोकण समुद्रकिनारा विकासाचे अधिकार सिडकोकडे,पर्यावरणाचा सत्यानाश होणार, गेल्या मार्च महिन्यात राज्य सरकारने पालघर,रायगड,सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील सुमारे १ हजार ६३५ गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी नियोजनाचे संपूर्ण अधिकार सिडकोला देण्याचा निर्णय घेतला होता.त्याची अंमलबजावणी आगामी विधानसभा निवडणुकीनंतर करण्याचे संकेत मिळत आहेत.किनारा नियमन क्षेत्र,अभयारण्य,खार व पाणथळ जमिनी,कांदळवन इ.जैववैविध्याने समृद्ध असलेल्या विभागाचा विकास सिडको प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्याचा घाट शासनाने घातला आहे. वसई व नवी मुंबई भागात स्थानिक भूमीपुत्राच्या टीकेचे धनी झालेल्या सिडकोने २०१० मध्ये वसई विरार उपप्रदेशात लोकांच्या विरोधामुळे आपला गाशा गुंडाळला होता.वरील दोन्ही विभागाचा विकास तर होऊ शकला नाही,पण नवी मुंबईमध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांनी खाडीलगत असलेल्या तसेच पाणथळ जमिनी बिल्डरांच्या…
दीपक मोहिते, किल्लारी भूकंप ; भूकंपग्रस्त आजही हलाखीचे जीवन जगत आहेत, ३० सप्टेंबर १९९३ रोजी लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात पहाटे ३.५६ मिनिटाने ६.०४ रीष्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.क्षणार्धात ७ हजार ९२८ माणसे मृत्युमुखी पडली.तर १६ हजारहून अधिक लोक जखमी झाले,सुमारे १५ हजार ८५४ जनावरे आपल्या प्राणाला मुकली.५२ गावातील सुमारे सव्वा दोन लाख घरांना तडे गेले.सर्वात जास्त फटका उमरगा व औसा या दोन तालुक्यांना बसला.या घटनेला काल ३१ वर्षे पूर्ण झाली,पण या गावातील लोक अद्याप या धक्क्यातून सावरू शकलेले नाहीत. या प्रलयंकारी भूकंपाला आज ३१ वर्षे पूर्ण झाली. मृत्यूच्या वेदना कवटाळून नव्या पिढीने पुन्हा जगण्याच्या लढाईला नव्याने सुरुवात केली होती.पण त्यांना…
दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” काँग्रेसच्या नेत्यानी शरद पवार यांच्याकडून शिकायला हवे, एकीकडे महायुती व महाविकास आघाडीच्या शिवसेना ( उबाठा ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये जागावाटप व मुख्यमंत्रीपदावरून दावे-प्रतिदाव्याला उत आला असताना शरद पवार मात्र हूं का चू करताना बघायला मिळत नाहीत.सर्वप्रथम लढाई जिंकणे आवश्यक आहे,असे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे ते या वादात पडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.सध्या ते भाजप व अजित पवार गटाच्या नाराज आमदार व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्याच्या कामात गुंतले आहेत.शत्रूचा गड सर करायचा असेल तर त्याचा पाया पोखरला पाहिजे,अशी रणनिती त्यांनी आखली आहे.त्यांच्या या रणनितीला चांगले यश मिळत आहे.अनेक आमदार व पदाधिकारी आता एकामागोमाग त्यांच्या पक्षात दाखल होऊ…
दीपक मोहिते, इलेक्ट्रो बॉंड प्रकरणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अडचणीत, गेल्या पाच वर्षात वाढलेली भरमसाठ महागाई,जीएसटीमुळे समाजातील प्रत्येक घटक त्रस्त असताना,मूग गिळून बसणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त इलेक्ट्रोल बॉंड प्रकरणी चांगलेच कान उपटले आहेत.या प्रकरणी न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.न्याय दंडाधिकारी यांनी दिलेल्या या निर्णयाने ” ना खाऊंगा,ना खाने दुंगा,” या भाजपच्या घोषणेचा थेट शिरच्छेद झाला आहे. अगोदर सेबी प्रमुख माधवी बूच पुरी आणि आता साक्षात अर्थमंत्री निर्मला सीतारमण या प्रकरणी अडचणीत आल्या आहेत. याप्रकरणी केवळ सेबीप्रमुख माधवी पुरी व अर्थमंत्री निर्मला सीतारमण नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजप देखील अडचणीत आला आहे.…
दीपक मोहिते, सूर्यातीर, नोकरशाहीच्या बुरसट मानसिकतेमुळे ” मनरेगा,” योजनेची वाताहत, ग्रामीण भागातील लोकांच्या हाताला काम मिळावे,त्यांच्या मुलाबाळांना दोन वेळचे पोटभर जेवण मिळावे,यासाठी राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी रोजगार हमी योजना सुरू केली.या योजनेला ग्रामीण जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.आपल्या राज्यात या योजनेला मिळालेले यश पाहून देशातील इतर राज्यांनीही आपले अनुकरण करत ही योजना आपापल्या राज्यात राबवण्यास सुरुवात केली.कालांतराने ही योजना मनरेगा म्हणून ओळखली जाऊ लागली. १९७२ साली राज्यावर आलेल्या दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी हरितक्रांतीचे प्रणेते व तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी या योजनेची पायाभरणी केली.ग्रामीण भागातील लोकांना वर्षातून किमान २०० दिवस काम ( केंद्र सरकार व राज्य सरकार,प्रत्येकी १०० दिवस ) उपलब्ध…
दीपक मोहिते, आगामी विधानसभा निवडणूक २०२४ ; एकूण ९ कोटी ५९ लाख मतदार आपला हक्क बजावतील, केंद्रीय निवडणूक आयोगाने काल आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भातील घेण्यात आलेल्या कामकाजाच्या आढावा विषयी माहिती दिली.या निवडणुकीत एकूण ९ कोटी ५९ लाख मतदार असून ४ कोटी ९५ लाख पुरुष तर महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६४ लाख इतकी आहे.या निवडणुकीत १९ लाख ४८ हजार नवमतदार असून ते पहिल्यांदा मतदान करणार आहेत. येत्या २६ नोव्हे.रोजी विधानसभेची मुदत संपत असल्यामुळे आगामी निवडणूक नोव्हे.महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडतील,असे संकेत या पत्रकार परिषदेतून मिळाले आहेत.तसेच ऑक्टो.महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल.त्यामुळे राजकीय पक्षाच्या हालचालींना चांगलाच…
दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” मनसेचे नेते राज ठाकरे यांना झालंय तरी काय ? मनसे,आगामी निवडणुकीत किती जागा लढवणार,हे अद्याप निश्चित झाले नसले तरी पक्षाचे नेते राज ठाकरे हे गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्याचे दौरे करत आहेत.नाशिक व ठाणे जिल्ह्यात त्यांचा पक्ष फार नाही,पण एखाद दोन जगावर चांगली लढत देईल.पण त्यांना जागा जिंकणे,अशक्य आहे.या निवडणुकीसाठी राज ठाकरे हे सतत दौऱ्यावर आहेत,पण त्यांना अद्याप सूर सापडलेला नाही.त्यांच्या प्रचारात कुठेतरी वैचारिक गोंधळ निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत हेच राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारासाठी मुंबई,ठाणे,कल्याण, नाशिक व पुण्यात प्रचारात जाहीर सभा घेत होते.आज तेच राज ठाकरे महायुतीच्या कारभारावर ताशेरे ओढत सर्वत्र…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” श्रेय उपटण्याच्या नादात गृहखात्याची लक्तरे वेशीला टांगली गेली, बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची पोलिसांकडून एन्काऊंटर झाल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये सुरू झालेली श्रेयवादाची हावरट स्पर्धा ही अत्यंत घृणास्पद अशीच होती.अक्षय शिंदे याला सजा झालीच पाहिजे,अशी प्रत्येक नागरिकांची इच्छा होती,पण ती भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून व्हायला हवी,असे अभिप्रेत होते.पण पोलिसांनी त्याला ज्या पद्धतीने ठार मारले, त्या पद्धतीला लोकांचा विरोध आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपीने आमच्यावर हल्ला केला व आम्ही स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला.या घटनेनंतर शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी आनंद व्यक्त करत पेढे वाटले.तर खा.नरेश म्हस्के यांनी शिंदे या पोलीस अधिकाऱ्याची हॉस्पिटलमध्ये जाऊन अभिनंदन केले.हे शिंदे महाशय,एक…
