दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
नितीन गडकरी यांनी सरकारची पोल खोलली,
काल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात राज्याची आर्थिक स्थिती किती डबघाईला आली आहे,याचे विदारक चित्र राज्यासमोर आणले आहे.” लाडकी बहीण योजनेलाही पैसे द्यावे लागतात,” हे त्यांच्या भाषणातील एक वाक्य खूप काही सांगून गेले.त्यांनी आपल्या या वाक्यातून गुंतवणूकदारांना सरकारच्या भरवशांवर राहू नका,असा सल्ला दिल्यामुळे भविष्यात या सरकारने आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे,यांची कल्पना येते.
ते एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना पुढे म्हणाले,”अनुदानाच्या पैशांची आता शाश्वती उरलेली नाही,कारण लाडकी बहीण योजना…”, या त्यांच्या एका वाक्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आयोजित उद्योगांसंदर्भातील एका कार्यक्रमात बोलताना गुंतवणुकदारांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे केंद्र सरकारमधील कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात.त्यांच्या रस्तेबांधणी व वाहतूक व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.त्यांचा स्पष्टवक्तेपणा त्यांच्या पक्षाला अधून मधून त्रासदायक ठरत असला तरी ते आपली मते निर्भीडपणे मांडत असतात. तसेच ते राजकीय विषयांवरही स्पष्टपणे बोलतात आणि परखड भूमिका मांडत असतात.त्यामुळे त्यांच्या विधानावर सर्वत्र चर्चा सुरू होते.आता त्यांच्या आणखी एका विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आयोजित उद्योगांसंदर्भातील एका कार्यक्रमात बोलताना गुंतवणुकदारांना एक सल्ला दिला आहे. ” गुंतवणुकदारांनी सरकारच्या भरवशावर राहू नये,अनुदानाच्या पैशांची शाश्वती नाही,कारण लाडकी बहीण योजनेलाही पैसे द्यावे लागतात,” असे स्पष्ट करत राज्याची आर्थिक स्थिती खूप खालावल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या विधानावर खुलासा करावा लागला.पण त्यांनी केलेला खुलासा हा न पटणारा होता.केवळ कशीबशी वेळ मारून न्यायचा तो प्रयत्न होता.

