Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते डहाणू- नाशिककरांचे स्वप्न अखेर साकार होणार, रेल्वे मंत्रालयाने अखेर डहाणू-नाशिक रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचे जाहीर झाल्यानंतर या परिसरातील नागरीक आनंद व्यक्त करत आहेत.या रेल्वेप्रकल्पामुळे या परिसरातील उद्योगधंदे वाढीला चालना मिळणार आहे.गेल्या तीस वर्षांपासून या दोन्ही जिल्ह्यातील नागरिक हा रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यात यावा,अशी मागणी करत होते.मात्र रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प अडगळीत पडला होता.पण आता या प्रकल्पास मंजुरी मिळाल्यामुळे सर्वत्र जोरदार स्वागत करण्यात येत आहे. डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाचा ३० वर्षांपूर्वी सर्व्हे करण्यात आला होता.या सर्व्हेवर सुमारे ७० लाख रु.खर्च देखील झाला होता.मात्र त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी हा प्रकल्प व्यवहारी नसल्याचे सांगून तो बासनात…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” …अन्यथा निवडणुकीत जनता नतद्रष्टाना जोड्याने हाणतील, मालवण – राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेला आता दहा दिवस होऊन गेले,पण उडालेला धुरळा मात्र अद्याप खाली बसू शकला नाही.छत्रपती शिवाजी महाराज,हे मराठी माणसाची केवळ अस्मिताच नाही तर आराध्य दैवत आहे.या घटनेमुळे त्यांच्या मनावर झालेली जखम लवकर भरून येणार नाही,ती भरली तरी त्याचे व्रण मात्र कायम राहणार आहेत.राज्य सरकारने या दुर्घटनेची चौकशी व नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची तयारी,अशा महत्वाच्या कामासाठी दोन समित्यांची नियुक्ती केली आहे.वास्तविक राज्यसरकारच्या गृहविभागाने या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला शोधून काढण्यासाठी सर्वप्रथम पावले उचलायला हवीत.हा शिल्पकार स्वतःहुन फरार झाला आहे कि अज्ञात शक्तीने…

Read More

दीपक मोहिते, मुख्यमंत्री शिंदे यांनी उशीरा का होईना,केसरकरांचे कान चांगलेच उपटले, उशीरा का होईना,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अखेर जाग आली.त्यांनी शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराबद्दल शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे कान चांगलेच उपटले आहेत.पण मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर केसरकर यांनी जे अकलेचे तारे तोडले होते,त्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी होती.पण शिंदे यांच्या मंत्र्यांना सर्व गुन्हे माफ आहेत.त्यामुळे या केसरकरच्या पावलावर पाऊल ठेवत आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत पण धुमाकूळ घालू लागले आहेत.ज्या व्यक्तीला शिक्षण क्षेत्रातील एबीसीडी माहीत नाही,ती शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ करणार नाही तर काय करणार ? त्यांचे दुसरे मंत्री हे डॉक्टर आहेत,पण राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून त्यांचे…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” तानाजी सावंत ” गेमचेंजर,” ठरतात कि काय ? आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी ” आपल्याला उलटी होते,” असे सांगून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वेशीवर टांगले होते.त्यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीच्या घटक पक्षात जोरदार पडसाद उमटले व अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली.या घटनेला काही तास उलटत नाही तोच तानाजी सावंत यांनी पुन्हा,” ऐकून घेतो,म्हणून काहीही ऐकून घेणार नाही,आपल्या औकातीत राहायचं,”अशी गर्भित धमकीच देऊन टाकली.त्यामुळे आता पुन्हा ” तीन पैश्याचा तमाशा,” सुरू होण्याची शक्यता आहे. फटकळ स्वभावाचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे सध्या महायुतीचे आरोग्य बिघडवण्याच्या कामाला लागले आहेत.गेल्या चार दिवसात त्यांनी…

Read More

दीपक मोहिते, “विन्यासलाईन,” तानाजी सावंत ” गेमचेंजर,” ठरवतात की काय ? आरोग्यमंत्री असताना जी सावंत यांनी दोन उलटी “आपण उलटी,” असे अजित पवार राष्ट्रवादीचे घटक सांगत होते, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या या टाकेतल्या महायुतीच्या पक्षाचे सदस्य उमटले आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ गांधी यांची नाराजी व्यक्त केली. तोच तानाजी सावंत यांनी पुन्हा, “एकूण घेतले,म्हणून ऐकून नाही,आपल्या औकाती राहतात,”अशी गर्भित घुसखोरी टाकली. फटकळ स्वभावाचे आरोग्य मंत्री असताना सावंत हे सध्या महाचेती आरोग्य बिघडवायला लागले आहेत. चार दिवसांनी त्यांनी चांगले काम केले आहे. धाडस कसे करू शकतात,यामागे नक्की कोण आहे ? अजित पवार यांनी मुख्याकडे नाराजी व्यक्त केली आहे, असे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वाढवण बंदर ; स्थानिक भूमीपुत्रांसाठीही ” गेमचेंजर,” ठरावा, काल बहुचर्चित वाढवण बंदराच्या भूमीपूजनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.जिल्हा प्रशासन व जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने संयुक्तपणे या कार्यक्रमाची भव्य-दिव्य अशी आखणी केली होती.सुमारे ७६ हजार कोटी रु.खर्च करून या महाकाय बंदराची उभारणी करण्यात येत आहे.या कार्यक्रमात प्रत्येक वक्त्याने आपल्या भाषणात,हा प्रकल्प राज्यासाठी ” गेमचेंजर,” ठरणारे असून हे बंदर राज्याच्या विकासाला गती देणारे आहे,असे सांगितले.या सर्वाच्या म्हणण्यात तथ्य असले तरी येथे राहणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचे काय ? त्यांचे व त्यांच्या मुलाबाळांच्या भवितव्याचे काय ? या दोन प्रश्नांची उत्तरे सरकारकडून मिळायला हवीत. कारण चाळीस…

Read More

पालघर, वाढवण बंदराच्या मार्गात विरोधकांनी अडथळे आणले-पंतप्रधान मोदी, मी शिवरायांच्या चरणी पाया पडून माफी मागतो,तसेच शिवरायांची मनोभावे पूजा करणाऱ्यांचीही माफी मागतो,असे उदगार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण बंदराच्या भूमिपूजन प्रसंगी काढले,यावेळी व्यासपीठावर राज्यपाल पी.राधाकृष्णन,केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल,राजीव शिवरंजन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार,व अन्य मान्यवर उपस्थित होते.मात्र त्यांच्या या माफीला माफी नाही,अशी प्रतिक्रिया शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमाना दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणापूर्वी या सर्वांची भाषणे झाली. आज डहाणू-वाढवण येथे ७६ हजार कोटी रु.खर्च करून उभारण्यात येणाऱ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडले.तत्पूर्वी पंतप्रधानाच्या हस्ते मत्स्यव्यवसाय योजनांचा शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर…

Read More

दीपक मोहिते, ” घाणेरडे राजकारण,” कॅबिनेटमंत्री तानाजी सावंत हे मुख्यमंत्री शिंदे व भाजपच्या मनातील बोलून गेले, सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत.एकनाथ शिंदे गटाचे कॅबिनेटमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेचे जोरदार पडसाद उमटत आहेत.कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादी मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं,ते माझ्या मनाला पटत नाही,त्यामुळे बाहेर आल्यानंतर मला उलट्या होतात,असं वक्तव्य त्यांनी केल्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून कडवट प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतु त्याच्या या विधानानंतर विरोधकांनी मात्र आता तोंडसुख घेत आहेत.तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले ” अजितदादांसारखा एक नेता अशाप्रकारचा अपमान कसं काय सहन करू शकतो ?…

Read More

दीपक मोहिते, “न्यूजलाईन,” नतद्रष्ट राजकारण्यांना अद्दल घडायलाच हवी, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना नामोहरम करण्यासाठी गडकिल्ले उभारले.ते गडकिल्ले आजही डौलात उभे आहेत.हे सारे गडकिल्ले शिवप्रेमी जनतेसाठी पूजनीय आहेत.अशा महाराजांच्या पुतळ्याची अशाप्रकारे विटंबना करणाऱ्या नतद्रष्ट राजकारण्यांना अद्दल घडायलाच हवी, सुमारे ७५० वर्षांपूर्वी तामिळनाडूच्या नैऋत्येस बांधण्यात आलेला जिंजी हा किल्ला अनेक संकटांना तोंड देत आजही अभिमानाने ताठ उभा आहे.या किल्ल्याची तटबंदी १६७७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली होती,आज त्याच महाराजांचा पुतळा आपल्या महाराष्ट्रात अवघ्या आठ महिन्यात जमिनदोस्त होतो,यासारखे दुसरे दुर्देव नसावे.ज्या जिंजी किल्ल्याची तटबंदी महाराजांनी बांधली ती तटबंदी आजही जशीच्या तशी उभी आहे.२००४ साली या तटबंदीने आपल्या अंगावर त्सुनामी देखील घेतली होती…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” पराभवाच्या भितीमुळे अजित पवार आता ” एकला चलो रे,” च्या भूमिकेत, मालवण-राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर तब्बल ९६ तासानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची जाहीर माफी मागितली आहे.तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला दोन दिवसांपूर्वी या प्रकरणी उपरती झाली व त्यांनीही महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेची जाहीर माफी मागितली व त्यानंतर आता त्यांनी ठिकठिकाणी या प्रकरणी आंदोलने करण्यास सुरुवात केली आहेत.सरकारमधील घटक पक्षाने आंदोलन करणे,हे राज्याला काही नवीन नाही.पण अजित पवार गटाला ही अशी उपरती का व्हावी ? या मागची नेमकी कारणे काय आहेत,हे जाणून घेणे गरजेचे आहे. सदर पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये विद्यमान…

Read More