दीपक मोहिते,
मराठा महासंघाचा बहुजन विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा,
महाराष्ट्र राज्य मराठा महासंघाचे अध्यक्ष दीपक मोहिते,यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर यांची आज जुने विवा महाविद्यालय येथे भेट घेवून आपले समर्थन व सक्रिय पाठिंबा दिला.यावेळी अध्यक्ष दीपक मोहिते,यांनी विरार,नालासोपारा व बोईसर तालुक्यातील मराठा समाजाच्या मतदारांनी आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर व आ.राजेश पाटील यांना या निवडणुकीत भरभरून मते द्यावीत,असे आवाहन केले.
बहुजन विकास आघाडीला सक्रिय पाठिंबा दिल्यानंतर महासंघाचे पदाधिकारी वसई,नालासोपारा व बोईसर या तीन मतदारसंघातील मराठा मतदारांना प्रत्यक्ष भेटून आपला मराठा तरुण,महिला व ज्येष्ठ मराठा नागरिकांना भेटून आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर व आ.राजेश पाटील यांना विजयी करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन करणार आहेत.तसेच दोन दिवसात कार्यकारिणीची बैठक आयोजित करणार आहेत.

