दीपक मोहिते,
आ.हितेंद्र ठाकूर हेच आम्हा वसईकरांचे राष्ट्रीय नेते,
पालघर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी आपल्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे.प्रचाराच्या दुसऱ्या टप्यात लहान मोठ्या सभा व जाहीरसभा
पार पडणार आहेत.
जाहीर सभेसाठी राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना पाचारण करण्यात येणार आहे.त्यामध्ये अमित शहा,योगी आदित्यनाथ,राजनाथसिंह,जे.पी.नड्डा,उद्धव ठाकरे,बाळासाहेब थोरात,नाना पटोले,शरद पवार,यांचा समावेश आहे.तसेच अनेक सेलिब्रिटीज देखील हजेरी लावणार आहेत.विविध पक्षाचे रथी – महारथी जिल्ह्यात येत असताना आ.हितेंद्र ठाकूर हे मात्र एकहाती किल्ला लढवणार आहेत.त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर हेच आमचे राष्ट्रीय नेते व सेलिब्रिटीज आहेत.त्यामुळे आम्हाला बाहेरून कोणाला बोलावण्याची गरज नाही.गेली तीस वर्षे आ.हितेंद्र ठाकूर हे प्रचाराची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेत आले व प्रत्येक निवडणूक त्यांनी वसईकरांचे प्रेम व सदभावनेच्या बळावर जिंकल्या.या निवडणुकाही ते त्याच बळावर जिंकतील,यात तिळमात्र शंका नाही.कितीही संकटे आली,तरी हे पितापुत्र डगमगून न जाता विजयस्तंभ हमखास गाठतातच.या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यात प्रचारासाठी कितीही राष्ट्रीय नेते आले तरी वसईची जनता त्याना थारा देत नाहीत,असा आजवरचा अनुभव आहे.तोच अनुभव यावेळीही आमच्या वसईकर जनतेला येणार आहे.

