दीपक मोहिते,
राजेश पाटील यांची प्रचारात आघाडी,मतदारांचा वाढता प्रतिसाद,
बोईसर विधानसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी बोईसर व पालघर पूर्व भागात गेल्या तीन दिवसात धुवांधार प्रचार केला.या प्रचारादरम्यान लोकांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधी पक्षाच्य उमेदवारांचे धाबे दणाणले आहे.राजेश पाटील यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना पुरुष व महिला मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.
बोईसर विधानसभेचे आमदार म्हणून काम करत असताना त्यांनी या परिसरातील प्रत्येक गावात विकासकामांची गंगा आणली आणली. या भागांतील ग्रामस्थांचे दैनंदिन जीवनातील प्रश्न व समस्यांचे त्यांनी निराकरण केले.तसेच विधानसभेच्या पटलावर मांडून सरकारचे वेळोवेळी लक्ष वेधले.त्यामुळें हा संपूर्ण परिसर विकासाच्या मार्गावर मार्गस्थ झाला आहे.गेल्या पाच वर्षात त्यांनी आपल्या मतदारसंघातील गावपाडे पिंजून काढले.लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व आ.हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली त्या सोडवल्या.काल
पालघर तालुक्याच्या पूर्व भागातील ढेकाळे,गांजे,खेरे, वेहरोली,सातीवली,कुडे,बोट, हलोली,साया,दुर्वेश,सावरा, पाचूधारा,सावरखंड, कोसबाड,दापचरी,या गावांचा दौरा करून प्रत्येक गावाला भेट दिली.यावेळी या गावातील मतदारांनी राजेश पाटील यांना मोठा प्रतिसाद देत आपण बहुजन विकास आघाडीच्या पाठीशी असल्याची व राजेश पाटील यांनाच या विधानसभेत बोईसर मधून आमदार म्हणून पाठवणार असल्याचे मतदारांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

