दीपक मोहिते,
आमची बांधिलकी परिसराच्या सर्वांगीण विकासाशी – आ.क्षितिज ठाकूर,
नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार क्षितिज ठाकूर हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.एक अभ्यासू व उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे.आपल्या मतदारसंघाच्या विकासाबाबत कायम दक्ष असणारे आ.क्षितिज ठाकूर विकासाच्या नवनवीन योजना राबवणे,त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळवणे,आदी कामावर त्यांचा कायम भर असतो.असा या तरुण तडफदार व लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वर्षाचे बारा महिने उपस्थित राहणाऱ्या आमदारांकडून त्यांनी केलेली विकासकामे व भविष्यातील त्यांच्या योजना समजून घेण्यासाठी आमच्या प्रतिधीनीने आज त्यांची मुलाखत घेतली.
प्रतिनिधी – गेली पंधरा वर्षे तुम्ही आमदार म्हणून निवडून येत आहात,प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला मिळालेलं मताधिक्य पाहता या मतदारसंघातील नागरिकांनी तुमच्यावर भरभरून प्रेम केले आहे.तसेच त्याची उतराई म्हणून तुम्ही केलेली कामेही प्रशंसनीय अशीच आहेत,त्याबद्द्ल तुम्ही काय सांगाल ?
आ.क्षितिज ठाकूर – गेल्या तीन निवडणूकांमध्ये माझ्यावर प्रेम करणाऱ्या मतदारांनी मला गेल्या तीन निवडणुकीत लाखो मते दिली.त्याची उतराई म्हणून अनेक विकासकामे मी मार्गी लावली.त्यांना भेडसावणाऱ्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवल्या.त्यामध्ये शिक्षण,आरोग्य,रोजगार व महिला विषयक प्रश्नाचा समावेश आहे.
प्रतिधीनी – या निवडणुकीबद्दल काय सांगाल,यावेळी तुम्हाला किती मताधिक्य मिळेल ?
आ.क्षितिज ठाकूर – गेल्या तीन निवडणुकामध्ये सलग वाढते मताधिक्य घेतले,यंदाही मी प्रचंड मताधिक्य घेईन,विरोधक माझ्या आसपासही फिरकू शकणार नाहीत.आमच्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मेहनत व मतदारसंघातील नागरिकांचे प्रेम या बळावर मी चौथ्यांदा बाजी मारीन.
प्रश्न – गेल्या पंधरा वर्षांत तुमच्या मतदारसंघात झालेली विकासकामे थोडक्यात सांगा.
आ.क्षितिज ठाकूर – रस्ते,गटारे,शिक्षण,आरोग्य या क्षेत्रात प्रचंड विकासकामे झाली.दोन वर्षे कोरोना नियंत्रण कामी खर्ची पडली.गोरगरीब जनतेची उपासमार होऊ नये,यासाठी दररोज लाखो लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय आम्ही केली.अनेक भागात कोरोना सेंटर्स उभारली.विशेष म्हणजे कोरोनग्रस्त रुग्णांना आम्ही ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्स कमी पडू दिले नाही.त्यामुळे मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात राहिले.विकासकामांसाठी राज्य व केंद्र सरकारकडून भरीव निधी आणला.या व्यतिरिक्त विविध वित्तीय संस्थांकडून निधी मिळवला.या निधीतून सध्या अनेक विकासकामे सुरू आहेत.माझ्या मतदारसंघात साक्षरतेचे प्रमाण चांगले असून माझ्या वडिलांनी वसई तालुक्यातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे,यासाठी कॉलेजेस उभारली.आज या भागातील मुलांना उच्च शिक्षणासाठी मुंबईला जावे लागत नाही.
प्रतिनिधी – पूर्वीचा वसई – विरार परिसर व सध्याचा ..तुम्हाला काय वाटते ?
आ.क्षितिज ठाकूर – पूर्वी काळी चालायला धड रस्ते नव्हते,पिण्याच्या पाण्याची टंचाई होती.पण आज प्रचंड प्रमाणात रस्ते झाले,पाणीटंचाई संपुष्टात आली.शिक्षणाच्या सोयी – सुविधा उपलब्ध झाल्या.लघु उद्योगाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळाला.विजेचा पुरवठा सुरळीत झाला.लोडशेडिंगचे दुष्टचक्र कायमचे थांबले.या व्यतिरिक्त अनेक विकासकामे झाली.तसेच अनेक विकासकामे प्रस्तावित असून राज्यसरकार वेळेवर निधी देत नसल्यामुळे ती प्रलंबित आहेत,तीही लवकरात लवकर मार्गी लावू.
प्रतिनिधी – प्रचंड प्रमाणात विकासकामे झाली असताना विरोधक मात्र विकासकामे झाली नाहीत,असा आरोप करतात,तुम्ही काय सांगाल ?
आ.क्षितिज ठाकूर – विरोधकांचे कायम ” खोटे बोल पण रेटून बोल,” असे धोरण राहिले आहे.त्यांच्या कडे विकासाचे व्हिजन नाही,” विरोधाला विरोध,” असे धोरण ते गेली तीस वर्षे राबवत आले.त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत सुज्ञ मतदारांनी त्यांना झिडकारले,या निवडणुकीतही तेच होणार आहे.वास्तविक तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा,यासाठी त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे.पण ते न करता विरोधक गेली अनेक वर्षे विकासकामात अडथळे आणत आहेत.पण त्यांची पर्वा न करता आम्ही आमचे काम करत आहोत व आमच्या कार्याला मतदार हे मतपेटीतून सहकार्य करत असतात.

