Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, पंचनामा, जयदीप आपटे ; अटक कि शरणागती ? पोलिसांची भूमिका संशयास्पद, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी फरार असलेला आरोपी जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी त्याला अटक केली का तो स्वतः हुन शरण आला याविषयी आता गूढ निर्माण झाले आहे.कारण दहा दिवसापासून फरार झालेला आपटे हा अचानक पोलिसांच्या हाती लागतो,यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही.कारण आपटे याच्या वकिलाने या प्रकरणी गौप्यस्फोट केला आहे.त्यांनी,” जयदीप हा स्वतःहून शरण आला असून पोलिसांनी त्याला पकडले नसल्याचे सांगितले.या जयदीपला पकडण्यासाठी पोलिसांनी सात पथके तैनात केली होती.पण त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आले.या काळात जयदीप हा इंदोर येथे होता व तो आपल्या वकिलाच्या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गडचिरोली घटना ; राज्य सरकारला लाज वाटायला हवी, राज्यात सत्तास्पर्धेला सध्या प्रचंड वेग आला असून आरोप-प्रत्यारोपाचा सिलसिला सुरू झाला आहे.नोव्हे.महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याचे गृहीत धरून राजकीय पक्ष आता कामाला लागले आहेत.महाविकास आघाडी व महायुती या दोघांमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.सत्ताधारी महायुतीचे नेते आपली बिघडलेली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.त्यासाठी त्यांनी सरकारची तिजोरी रिकामी करण्यास सुरुवात केली आहे.लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागाचा निधी फस्त केला आहे.पण त्यांच्या या प्रयत्नांवर बदलापूर बलात्कार घटनेने पाणी फिरवले आहे.काल गुलाबराव पाटील यांनी अर्थखात्यावर चांगलेच तोंडसुख घेतले,ते एका कार्यक्रमात काय म्हणाले ते पहा,” अर्थखाते हे नालायक खाते असून…

Read More

दीपक मोहिते, देवेंद्र फडणवीस यांनी शिवचरित्र वाचायला हवं, एका वृत्तवाहिनीने आज आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ” महाराष्ट्राचा महासंकल्प,” हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता.” राज्याचा विकास व राजकीय चढाओढ,” या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,( शरद पवार गट ),भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,छगन भुजबळ यांनी आपली मते दिलखुलासपणे मांडली. सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांना पाचारण करण्यात आले होते.त्यांना लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद झाल्यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला व मी मध्यस्थी केल्याचे मान्य केले व या योजनेचे श्रेय एकट्याने कोणी घेऊ नये,अशा सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्यानंतर मालवण येथील…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” दादाचा वादा,” नाही तर ” दादाचा वांदा,” होणार, महायुतीच्या घटक पक्षात आता बॅनरवॉर सुरू झाले आहे.श्रेयवादाच्या सुतळी बॉम्बची वात अजित पवार गटाने पेटवली आहे.त्यामुळे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांनी भर बैठकीत अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.प्रकरण हातघाईवर येत असल्याचे पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली,त्यामुळे दुर्घटना टळली.फडणवीस यांनी यापुढे एकट्याने कोणीही श्रेय घेणार नाही,असे जाहीर केले.फडणवीस यांच्या मध्यस्थी व दिलेल्या आदेशानंतर अजित पवार गटाच्या मंत्र्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद मिळावे,यासाठी अजित पवार हे सध्या नको ते उपदव्याप करत सुटले आहेत.गुलाबी जाकीट,गुलाबी रंगाच्या गाड्या,गुलाबी फेटे व टोप्या,यांची सध्या उधळण…

Read More

दीपक मोहिते, राजकीय विश्लेषण, उद्धव ठाकरे यांनी आततायीपणा करता कामा नये, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून महायुती व महाविकास आघाडी या दोघांमध्ये सध्या अंतर्गत रस्सीखेच सुरू आहे.कोणाला किती जागा मिळणार,यावरून असलेला वाद पराकोटीला पोहोचला आहे.जागावाटपाचा तिढा समाधानकारकरित्या सुटावा,यासाठी घटक पक्षाचे नेते प्रयत्नांची पराकाष्टा करत असताना शिवसेनेने ( उबाठा ) घेतलेली ताठर भूमिका महायुतीच्या पथ्यावर पडणारी आहे.काल काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी हे सांगलीच्या दौऱ्यावर आले होते.शिक्षणसम्राट कै. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. त्या कार्यक्रमास उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत तसेच त्यांचे फायरब्रॅंड प्रवक्ते हे देखील फिरकले नाहीत.हे दोघे का फिरकले नाहीत,यामागे दोन कारणे होती.गेल्या लोकसभा निवडणुकीत…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्य अधोगतीच्या मार्गावर जात आहे, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.राज्याचे गृह खाते सपशेल अपयशी ठरले असून पुण्यासारखे शहर आता गुंड टोळ्यांचे शहर झाले असून दररोज होणाऱ्या हत्या,कोयता गँगचा हैदोस व अमली पदार्थाचा व्यापार,अशा कारणामुळे पुणे शहर हे ” गुंडाचे शहर,” म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहखात्याची जबाबदारी पेलता आली नाही,त्यामुळे विरोधकाकडून त्यांच्यावर सतत टीकेचा भडिमार होत आहे.बदलापूर बलात्कार व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे,प्रकरणातील आरोपी शोधण्यात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरल्या आहेत.सर्वसामान्य आरोपींना २४ तासात हुडकून काढणारे पोलीस,शाळेचे संस्थाचालक,मुख्याध्यापिका व शिल्पकार जयदीप आपटे,याना शोधू शकत नाहीत.गेल्या पंधरा…

Read More

दीपक मोहिते, त्यामुळे भाजपचे ” मिशन लोटस,” थंडावले… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेले रेशीमबाग सध्या चिंताग्रस्त झाले आहे.महाराष्ट्रात महायुतीची पुन्हा सत्ता येईल,असे संघाच्या धुरीणांना वाटत नाही.त्यामुळे त्यांनी फडणवीस यांच्यासोबत बैठकांचा सपाटा लावला आहे.लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जो पराभव झाला तो केवळ अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळे झाला,असे संघाचे ठाम मत झाले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला ६५ ते ७० जागा मिळतील,असा संघाचा अंदाज आहे.अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बदलापूर बलात्कार व मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे.या दोन घटनांमुळे महायुती सरकारविरोधात निर्माण झालेले वातावरण आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पराभवाला कारणीभूत ठरेल,असे संघाला वाटतं.त्यामुळे भाजप,शिंदे व अजित पवार या तिन्ही गटांनी एकत्र निवडणूक…

Read More

दीपक मोहिते, “हल्लाबोल,” शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांची झोप उडवली, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे चांगलेच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.त्यांनी व त्यांचे विश्वासू सहकारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप व अजित पवार गटातील आमदारांना तसेच जिल्ह्यातील नेत्याना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आहे.दोन दिवसापूर्वी शाहू घराण्याचे वारस व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांची झोप उडवून दिली आहे.घाटगे यांच्या प्रवेशावेळी झालेली सभा ही न भूतो,न भविष्यती,अशी भव्य दिव्य स्वरूपाची होती.त्या सभेला झालेली कागलवासीयांची गर्दी पाहून हसन मुश्रीफ यांच्या पायाखालची जमिनच सरकली आहे.समरजीत घाटगे हे कोल्हापूर जिल्ह्यातील…

Read More

दीपक मोहिते, भाजप,पालघर विधानसभेसाठीही आग्रही, पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा जागांवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. नालासोपारा,विक्रमगड व डहाणू भाजपला तर वसई,पालघर व बोईसर शिंदे गटाला समसमान जागा,असे सूत्र ठरले असताना भाजप पालघरसाठी आता आग्रही आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ.हेमंत सवरा यांनी पालघर विधानसभा मतदारसंघात चांगले मताधिक्य घेतले होते.त्यामुळे भाजप आता शिंदे गटाला दोनच जागा देऊ पाहत आहे.त्यांच्या सर्व्हेनुसार पालघर विधानसभा शिंदे गटाला जिंकता येणे शक्य नाही,असे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी,असे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी लावून धरली आहे.पालघर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पूर्वापार बालेकिल्ला असून केवळ २००९ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता येथे झालेल्या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जम्मू – काश्मीर निवडणूक ; जगाचे लक्ष लागले आहे, जम्मू व काश्मीर राज्याच्या विधानसभा निवडणूकीचा पहिला टप्पा येत्या १८ सप्टें.रोजी पार पडणार आहे.या विधानसभेच्या एकूण ९० जागासाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे.तर ४ ऑक्टो.रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.या निवडणुकीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे अनुक्रमे २५ सप्टें.व १ ऑक्टो.रोजी होणार आहे.या निवडणुकीत सुमारे ८७ लाख ९० हजार मतदार आपला हक्क बजावतील.या विधानसभेच्या निवडणुका तब्बल दहा वर्षानंतर होत आहेत.सध्या या राज्यात राष्ट्रपती राजवट आहे.या राज्याच्या निवडणुका वारंवार पुढे ढकलल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते,त्यानंतर आयोगाने या राज्यासह हरयाणा राज्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…

Read More